विक्रम गोखले हे एक प्रसिद्ध मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत.त्यांनी चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून अतिशय उत्तम काम केले आहे, त्यांचा जन्म ३० ऑक्टोबर, १९४७ रोजी महाराष्ट्रातील पुणे येते झाला. त्यांच्या आईचे नाव दुर्गाबाई कामत असे होते. त्या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या होत्या.त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे देखील अभिनय क्षेत्रात नैपुण्य मिळवलेले अभिनेते होते. त्यांनी ७० हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत.
जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले | Vikram Gokhale |
अभिनयासोबतच विक्रम गोखले यांना लेखन आणि दिग्दर्शनची देखील आवड आहे, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले, सन २०१३ साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले, अभिनेते म्हणून त्यांनीअनेक भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. विक्रम गोखले यांना व्हि. शांताराम पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे
.
0 टिप्पण्या