संविधान दिन भाषण | Sanvidhan din marathi bhashan | Indian Constitution day information essay speech in marathi

नमस्कार , आपल्या भारत देशामध्ये भारतीय संविधानाला सर्वात उच्च पद आहे. सरकार, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती, पंतप्रधान यामधील कोणीही संविधानाच्या वरती नाही. सर्वजण संविधानाच्या कक्षेमध्ये राहूनच काम करतात. या सर्वांना तसे बंधन आहे.  दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन अतिशय थाटामाटात साजरा केला जातो.शाळा-कॉलेज  मध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतीय संविधानाविषयी एक अतिशय छान माहिती देणारे भाषण बघणार आहोत.(Indian constitution day speech information essay)

भारतीय संविधान दिन भाषण | Sanvidhan din / divas marathi Bhashan | Indian Constitution day information speech essay in marathi


आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो आज मी तुम्हाला संविधान दिन विषयावर दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही कृपया शांततेत ऐकावे ही माझी नम्र विनंती.

                            ज्या देशात दलितांना शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते त्याच देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे पुस्तक लिहिले ज्या पुस्तकावर आज संपूर्ण भारत देश चालतो ते म्हणजे भारतीय संविधान.

                            भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक कोटी लोकांनी अनेक वर्ष पथक परिश्रम केले आपल्या प्राण्यांची अवती दिली आणि त्यांच्या कष्टाचे संघर्षाचे फळ म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाला एक मजबूत संविधान प्रदान करण्याचे सर्वात मोठे काम होते.

                            त्यासाठी 29 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीची स्थापना करण्यात आली आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची त्या समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल मौलाना अबुल कलाम आझाद आधी या विधानसभेचे प्रमुख सदस्य होते .

                            डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला. त्यांनी सतत दोन वर्ष 11 महिने 18 दिवसात आता परिश्रम करून भारतीय संविधान तयार केले आणि ते राष्ट्राला समर्पित केले 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली.

दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.अनेक शाळा कॉलेजेस मध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.त्यातून संविधानाचे महत्त्व पसरविले जाते.

                        भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान मानले जाते भारत सरकारने 2015 मध्ये प्रथमच संविधान दिन साजरा केला डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि संविधानाचे महत्त्व सर्वत्र पसरविण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो.

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवत आहे 

जय हिंद जय महाराष्ट्र 


भारतीय संविधान दिन भाषण मराठी, संविधान दिन निबंध माहिती भाषण आवडल्यास नक्की कमेन्ट करून कळवा.सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

भारतीय संविधानदिन pdf ,भारतीय संविधान मराठी माहिती


💥💥💥 हे पण वाचा >>>

👉संत ज्ञानेश्वर