संत ज्ञानेश्वर


संत ज्ञानेश्वर महाराज माहिती | Sant Dnyaneshwar Information In Marathi








   





संत ज्ञानेश्वर माहिती

 

" हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा 

पुण्याची गणना कोण करी || "

हरिनामाचे स्मरण करण्यासाठी "राम कृष्ण हरी" मंत्राचा जप सांगणारे संत ज्ञानेश्वर यांनी माणसाचे जीवन सुख-समृद्धीकडे घेऊन जाईल असे अनेक अभंग सुचवले आहेत त्यांच्या अभंगांची भाषा इतकी मधाळ आहे की त्या शब्दांची गोडी एकदा चाखली की कायमचं अंत:करणात भिजत जाते.

संत ज्ञानेश्वरांचा जन्म तेराव्या शतकात आपेगाव येथे, श्रावण कृष्ण अष्टमी शके ११९७ रोजी झाला. विठ्ठल पंत कुलकर्णी त्यांचे वडील तर रुक्मिणीबाई त्यांच्या आई. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी बाई यांना एकूण चार अपत्ये झाली. लहान वयातच वडिलांकडून त्यांना ब्रह्म विद्येचे बाळकडू मिळाले तर आईकडून चांगले संस्कार त्यांनी ग्रहण केले. लोकांनी त्यांना संन्याशाची पोरं म्हणून हिणवले तरीही समाजात त्यांनी प्रबोधन सुरूच ठेवले.

संत ज्ञानेश्वरांनी अनेक ओव्या, अभंग  यातून नेहमीच समाजाचे प्रबोधन केले आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला. रेड्याच्या तोंडून वेद वदवले मिरची उभी चालवून दाखवली. स्वतःच्या पाठीवर अग्नी तयार करून त्यावर संत मुक्ताबाईंनी मांडे भाजण्यासाठी घेतले.

त्यांनी समाज सुधारण्यासाठी वाईट रुढी परंपरा घालवण्यासाठी फार मोठे कार्य केले. जात-पाच न मानता सर्व समाजाला एकत्रित करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.ही कार्य सुरू असताना लोकांनी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु याकडे लक्ष न देता त्यांनी आपले समाजसेवेचे हाती घेतलेले व्रत पूर्णत्वाकडे नेण्यासाठी अतोनात कष्ट घेतले.

धन्यवाद

संत ज्ञानेश्वर मराठी माहिती || Sant Dnyaaneshawar information essay Marathi


माझा आवडता ऋतू - हिवाळा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या