माझा आवडता ऋतू - हिवाळा

 "मंद गार हवेची झुळूक,

त्यात जाणवे शरीर नाजूक |

थंडीची लाट असे ती साजूक,

हिवाळ्याची जाणवे चुणूक || "

              हिवाळा हा अत्यंत आरोग्यदायी आणि सुंदर ऋतू असतो. भारतातील हिवाळ्याचा कालावधी नोव्हेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत असतो. नोव्हेंबर महिन्यात कमी वाटणारी थंडी डिसेंबरमध्ये कडाक्याची जाणवते. या दिवसात रात्री मोठ्या असतात तर दिवसाचा प्रहर कमी असतो.

                या काळात पर्वती भागात पडणारा बर्फ मला फार आवडतो. हिवाळ्यात झाडांची वाढ मंदावते. सकाळच्या वेळी धोक्याची सादर पसरते.दिवसभर थंड वारे वाहतात. हिवाळा म्हणजे उत्साह देणारा मनमोहक ऋतू.

                हिवाळा हा माझा आवडता ऋतू आहे कारण या ऋतूत वातावरण एकदम थंड असते. तापत्या सूर्याच्या उष्णतेपासून सुटका मिळालेली असते याचबरोबर दिवाळी, नाताळ, मकर संक्रांति यासारखे सण या काळात येतात गरम अन्न, मिठाई स्वादिष्ट व्यंजन या ऋतूत खाल्ले जातात बाजारात रंगबिरंगी फळे आणि भाज्यांची अगदी रेलचेल असते.

                 आई आरोग्यदायी हिवाळी लाडू बनवते ज्यात ती खारी सुकामेवा खोबरे असे अतिशय आरोग्यदायी पदार्थ वापरते. तिने प्रेमाने बनवलेले हे लाडू मला वर्षभराची ऊर्जा देऊन जातात खरोखर हिवाळा हा माझा आवडता ऋतू आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या