संगणकाचे प्रकार व त्यांची माहिती

संगणक computer हा आधुनिक काळाची गरज आहे.मानवाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा अविभाज्य घटक बनला आहे.संगणकाचा वापर सर्वत्र केला जात आहे जसे की बँक, आरोग्य, शिक्षण, वित्त, शाळा, कॉलेज, कार्यालये अगदी सगळीकडेच संगणकाने माणसाचे काम सोपे केले आहे. या आधीच्या पोस्टमध्ये आपण संगणक  म्हणजे काय आणि संगणकाचा इतिहास याबद्दल माहिती घेतली आहे.

आता या नवीन पोस्टमध्ये आपण इतक्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या संगणकाचे प्रकार (Types of Computer in Marathi) व त्यांची माहिती पाहणार आहोत. संगणक ज्ञान हे सध्याच्या काळाची गरज म्हणून सर्वात महत्वाचे मानले जात आहे, यामुळे या ब्लॉगमध्ये आपण  संगणकाचे प्रकार आणि त्यांची माहिती बघणार आहोत.Types of Computer in Marathi

संगणकाचे प्रकार

 आपण आपल्या आजूबाजूला नेहमीच बघत असतो की संगणक म्हणजेच कम्प्युटर computer  विविध ठिकाणी आणि विविध कार्यांसाठी वापरले जाते. आता तर संपूर्ण जगच संगणकाने व्यापले आहे.या संगणकाचे वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत. चला तर मग आपण संगणकाचे प्रकार Types of Computer in Marathi पाहूया. 

साधारणपाने संगणकाची विभागणी तीन वैशिष्ट्य आहेत ज्यांच्यावर आधारित आहे.

  • यंत्रणा आधारित
  • आकार आधारित
  • हेतू आधारित

चला तर मग आज आपण या तीनही प्रकारा बद्दल Types of Computer in Marathi माहिती घेऊयात.संगणकाचे भाग आणि माहिती

संगणकाचे प्रकार व त्यांची माहिती | Types of Computer in Marathi

संगणकाचे विविध प्रकार आहेत पण ते कोणते आहेत, What are the types of computer in marathi, हा  प्रश्न आपल्याला पडला असेलच, चला तर मग बघूयात. जसे की आपल्याला माहीतच आहे की संगणक बनवण्यासाठी वेगवेगळी यंत्रणा वापरली जाते म्हणूनच आपण यंत्रणेच्या आधारावरील संगणकाचे प्रकार पाहुयात.

यंत्रणा आधारित – Based on Mechanism

संगणकात वापरल्या जाणाऱ्या यंत्रणेवर आधारित संगणकाचे खालीलप्रमाणे प्रकार पडतात.

१) ऍनालॉग संगणक –

अनालॉग डेटावर प्रक्रिया करण्यासाठी Analog computer चा वापर केला जातो. हा डेटा नेहमी बदलत असतो म्हणजेच Analog डेटा ल ठराविक मूल्य नसते. सतत बदलत्या डेटामुळे किंवा मुल्यामुळे त्यांची संख्या निर्धारित नसते .
उदाहरण : तापमान, वेळ, वेग, दाब हे काही analog डेटा ची उदाहरण आहेत.

   Analog संगणकाची कार्य करन्याची ची क्षमता प्रचंड वेगवान असते. या संगणकामध्ये मिळणार output स्केल , आलेख या स्वरुपात असते. त्याचबरोबर या संगणकामध्ये कोणत्याही प्रकारची digits म्हणजेच संख्या किंवा आकडे साठवले जात नाहीत. input दिलेल्या महितीचे रूपांतर सरळ output मध्ये केले जाते.तंत्रज्ञान, शिक्षण, विज्ञान या क्षेत्रात Analog Computer चा उपयोग सर्वात जास्त केला जातो.

उदाहरण - थर्मो मीटर,स्पीडोमीटर, ई.

२) डिजिटल संगणक –

यंत्रणेवर आधारित संगणकाचा दुसरा प्रकार म्हणजेच डिजिटल संगणक होय. डिजिटल कम्प्युटर इनपुट म्हणून मिळणाऱ्या सूचनांवर अंकांच्या रूपात म्हणजेच डिजिट स्वरूपात प्रक्रिया करते.सूचनांना अंकांच्या रूपामध्ये दाखवण्यासाठी या संगणकामध्ये बायनरी नंबर सिस्टम वापरली जाते. 
विविध प्रकारच्या गणितीय क्रिया करण्यासाठी डिजिटल संगणकाचा वापर केला जातो. Types of computer in Marathi
डिजिटल संगणकात इनपुट म्हणून मिळालेल्या सूचना binary नंबर या स्वरूपात साठवून ठेवण्याची क्षमता असते. परंतु binary नंबर सिस्टीम मध्ये 0 आणि 1 असे दोनच डिजिट्स असतात. अनलॉक कम्प्युटर पेक्षा डिजिटल कम्प्युटर जास्त गतिमान असतात आणि त्यांची अचूकता सुद्धा जास्त असते.
उदाहरण - calculator, हातातले घड्याळ, ई.

३) हायब्रीड संगणक – 

पहिले दोन प्रकार म्हणजेच अनलॉक कम्प्युटर आणि डिजिटल कम्प्युटर या दोघांचे एकत्रित वैशिष्ट्य असणारे कंप्यूटर म्हणजेच हायब्रीड कम्प्युटर होय. संगणक हे पहिल्या दोन संगणकांपेक्षा अतिशय अचूक आणि गतिमान असते.
डिजिटल आणि अनलॉक चे मिश्रण असल्यामुळे या संगणकामध्ये गणितीय क्रिया करण्यासाठी डिजिटल संगणक वापरले जाते तर इनपुट म्हणून दिलेली माहिती आउटपुट म्हणून दाखवण्यासाठी संगणक वापरले जाते.
उदाहरण - पेट्रोल पंप मशीन, स्पीडोमीटर, ई.

उद्देश/ हेतू आधारित – Based on Purpose

संगणक बनवणे त्याचा उद्देश लक्षात घेऊन त्याची काही प्रकार पाडण्यात आलेले आहेत. संगणक संगणकाच्या उद्देशावर आधारित दोन प्रकार types of computer in Marathi आपण बघणार आहोत.

१) सामान्य हेतू संगणक – General Purpose Computer

विशिष्ट उद्देश किंवा हेतूवर आधारित संगणकाचा पहिला प्रकार आहे सामान्य हेतू संगणक. दैनंदिन कामांसाठी शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी आपण जे संगणक वापरतो त्या संगणकांना सामान्य हेतू संगणक असे म्हणतात. आपण हा लेख मोबाईल किंवा लॅपटॉप वर वाचत आहोत हे सुद्धा एक general purpose computer आहे.
या संगणकाचा प्रकारामध्ये अनेक क्रिया करण्याची क्षमता विकसित केलेली असते ज्यांचा वापर आपण घरगुती कामासाठी शिक्षणासाठी किंवा व्यवसाय क्षेत्रात करू शकतो. आज-काल सामान्य हेतू संगणक जवळपास सर्वांकडेच असतो आणि सर्वजण याचा वापर करतात.

२) विशेष हेतू संगणक – Special Purpose Computer

उद्देशावर आधारित संगणकाचा दुसरा प्रकार आहे विशेष हेतू संगणक. Special purpose computer. 
हे संगणक विशेष कार्य करण्यासाठी बनवलेले असतात. या संगणकाचे कार्य ठराविक असते म्हणजेच सर्व प्रकारचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कामे हे संगणक करू शकत नाही. हवामानाचा अंदाज लावणे परिवहन नियंत्रण करणे यासारखे विशेष काम विशेष हेतू संगणकाद्वारे केली जातात. आपण आधी पाहिलेल्या सामान्य हेतू संगणकापेक्षा ही संगणक जास्त गतिमान असतात परंतु यामध्ये अनेक कार्य करण्याची क्षमता नसते.

आकार आधारित – Based on Size

संगणकात संगणक वापरण्याची जागा बघून त्याचा आकार ठरवलेला असतो. मोठी कार्यालय किंवा संस्था यामध्ये वापरले जाणारे संगणक शक्तिशाली आणि मोठे असतात. घरगुती वापरासाठी असलेले संगणक छोटे असतात आणि त्यांची क्षमता सुद्धा कमी असते. चला तर मग संगणकाच्या आकारावर आधारित त्याचे काही प्रकार types of computer in Marathi आपण बघूया.

१) महासंगणक – Supercomputer

जगातील सर्वात वेगवान आणि शक्तिशाली संगणक म्हणजे महासंगणक होय. जगातील मोठमोठ्या संस्था विशिष्ट कार्यासाठी महासंगणकाचा उपयोग करतात. जसे की नासा अमेरिकेची अंतराळ संस्था उपग्रह नियंत्रित करण्यासाठी महासंगणकाचा उपयोग करते.
महा संगणकाचा आकार प्रचंड मोठा असतो. एखादी मोठी इमारत व्यापून जाईल इतका मोठा आकार महासंगणकाचा असू शकतो. जगातील सर्वात पहिले महा संगणक "CDC 6600 "सेमूर क्रे यांनी बनवले होते.

२) मेनफ्रेम संगणक –

आकारावर आधारित संगणकाचा दुसरा प्रकार म्हणजे मेनफ्रेम संगणक. एकाच वेळेस हजारो युजर्स ना नियंत्रित करण्यासाठी मेनफ्रेम संगणकाचा उपयोग केला जातो. एकाच वेळी हजारो प्रोग्राम चालवण्याची क्षमता मॅनेजर संगणकामध्ये असते.
हजारो प्रोग्राम एकाच वेळी चालल्यामुळे या संगणकावर लोड आल्याने ते गरम होतात त्यामुळे त्यांना AC असलेल्या खोलीत ठेवले जाते. विविध सरकारी कार्यालय बँका आणि सोशल मीडिया या संगणकाचा वापर करतात.

३) मिनीफ्रेम संगणक –

संगणकाचा तिसरा प्रकार म्हणजे मिनी क्रीम संगणक जे जवळजवळ मेनफ्रेम संगणकासारखेच असते पण हे संगणक एका वेळी 5-250 नियंत्रित करू शकते. में फिल्म संगणकापेक्षा हे आकाराने लहान असते आणि विविध संस्था विभाग या संगणकाचा वापर करतात.

४) मायक्रो संगणक –

मिनिफ्रेम संगणकापेक्षा लहान संगणक म्हणजे मायक्रो संगणक होय. या संगणकाचा वापर दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत चालला आहे. आजकाल आपण जे डेस्कटॉप, लॅपटॉप,टॅबलेट, स्मार्टफोन वापरतो हे सर्व मायक्रो संगणकाचे प्रकार आहेत. या संगणकाला स्टोरेज, इनपुट, आउटपुट, मेमरी, सीपीयू असे वेगवेगळे वैशिष्ट्य असतात.

निष्कर्ष - 

या लेखामध्ये आपण संगणकाचे प्रकार आणि त्याची माहिती types of computer in Marathi सविस्तरपणे पाहिली. मला आशा आहे की तुम्हाला संगणकाचे प्रकार आणि त्याची माहिती समजली असेल. जर काही अडचण असेल किंवा एखादा मुद्दा राहिला असेल तर कमेंट द्वारे मला नक्की सांगा.
त्याचप्रमाणे आपणास संगणकाचे प्रकार व माहिती types of computer in Marathi हा लेख कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा.






 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या