Christmas: नाताळ विषयी माहिती

 

Christmas: नाताळ विषयी माहिती 


भारत हा विविधतेने नटलेला वैविध्यपूर्ण देश आहे. इथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असे अनेक धर्माचे लोक राहतात. प्रत्येकाचा पोशाख वेगळा, प्रत्येकाचा धर्म वेगळा, प्रत्येकाची भाषा वेगळी. जसे हिंदू लोक दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात, जसे मुस्लिम लोक येत हा सण साजरा करतात त्याचप्रमाणे ख्रिश्चन लोक ख्रिसमस किंवा नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. आज आपण 

Christmas: नाताळ विषयी माहिती  अधिक माहिती जाणून घेणार आहोत.






Christmas: नाताळ विषयी माहिती मराठी

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक ख्रिश्चन लोकांचा सण आहे. दरवर्षी 25 डिसेंबर रोजी भगवान येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून हा सण साजरा केला जातो. फक्त भारतातच नव्हे तर जगातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यात जिथे ख्रिश्चन लोक आहेत तिथे हा सण साजरा केला जातो. या सणात नातेवाईक मित्र मंडळ यांना भेटवस्तू देण्याची प्रथा प्रचलित आहे.


लहान मुलांना विशेषतः सांताक्लॉज चे जास्त आकर्षण असते. कारण सांताक्लॉज ख्रिसमस च्या रात्री येऊन त्यांना भेटवस्तू देऊन जातो. शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस मध्ये क्रिसमस ट्री सजवला जातो.
घरोघरी घराची साफसफाई करून घरात केक, चॉकलेट आणि इतर कोणाचे पदार्थ केले जातात आणि ते एकमेकांमध्ये वाटले जातात. कुटुंबातील सदस्य मित्रमंडळी यांच्यामध्ये शुभेच्छापत्र वाटले जातात. या पत्रांमध्ये बायबल मधील सुविचार, कविता,  नाताळ विषयीच्या शुभेच्छा तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा लिहिलेल्या असतात.

नाताळाच्या दिवशी लोक सकाळी तयार होऊन चर्चमध्ये जातात. भगवान येशू समोर मेणबत्ती लावून पारंपारिक पद्धतीने प्रार्थना केली जाते. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.

ख्रिस्तमस मराठी निबंध, ख्रिस्तमस मराठी माहिती आवडल्यास नक्की कमेन्ट करून कळवा.

ख्रिस्तमस  pdf ,ख्रिस्तमस  मराठी माहिती


धन्यवाद.





.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या