।। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ।।
सुप्रभात आदरणीय प्राचार्य, शिक्षक वृंद, आणि इथे जमलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींनो, आज मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत भाषण करण्याची संधी मिळाली त्याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या शिक्षकांच्या आभार मानू इच्छितो.
"जगामध्ये गरिबी तेथेच आहे
जिथे शिक्षण नाही
म्हणून अर्धी भाकरी खा पण
आपल्या लेकरांना चांगले शिकवा ."
शिक्षणाविषयीचे हे मत आहे भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे. त्यांचे मूळ नाव भीमराव रामजी सपकाळ. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील महू येथे झाला. लहानपणापासूनच ते खूप हुशार होते. घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. रात्री रस्त्याच्या दिव्यांच्या प्रकाशात त्यांनी अभ्यास केला आणि आपली मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुंबईच्या एलफिस्टन महाविद्यालयातून बी ए ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
उच्च शिक्षणासाठी त्यांनी बडोदा सरकारची शिष्यवृत्ती मिळवली आणि अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्र, समाजशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांचे अध्ययन केले. त्यानंतर त्यांनी इंग्लंड येथे जाऊन कायदा आणि अर्थशास्त्राचा अभ्यास पूर्ण केला आणि मुंबई हायकोर्टात वकिली सुरू केली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे पाक्षिक आणि बहिष्कृत भारत हे साप्ताहिक सुरू केले. दलित समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यांच्यामध्ये सामाजिक जागृती घडवून आणण्यासाठी त्यांनी समता समाजाची स्थापना केली. प्रौढांसाठी रात्र शाळा सुरू केली तसेच अनेक वस्तीगृह सुद्धा त्यांनी सुरू केली.
आपल्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केल्यानंतर मानवी हक्कासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अशा चळवळी त्यांनी केल्या. गोलमेज परिषदेचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळे त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले. स्वतंत्र भारतानंतर ते मसुदा समितीचे अध्यक्ष बनले. सतत 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस परिश्रम करून त्यांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची राज्यघटना घटना तयार करण्याचे काम पार पडले.
6 डिसेंबर 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाच्या वृत्ताने सारा देश हळहळला. भारतीय घटनाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कोटी कोटी प्रणाम.
0 टिप्पण्या