Dr Rajendra Prasad information in Marathi - देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची माहिती
Dr. Rajendra Prasad Marathi Essay:
जन्म :
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्म 3 डिसेंबर 884 रोजी बिहार मधील जीरादेई येथे झाला.त्यांच्या वडिलांचे नाव श्रीवास्तव तर आईचे नाव कमलेश्वरी देवी असे होते राजेंद्र प्रसाद ही त्यांच्या भावंडांमध्ये सर्वात लहान होते.
हे पण वाचा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती
शिक्षण
डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले त्यात त्यांनी उर्दू आणि फारसी या भाषा शिकल्या. त्यानंतर त्यांनी कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये कलकत्ता विद्यापीठ अंतर्गत बी. ए. उत्तीर्ण केले. त्यानंतर कला शाखेचा अभ्यास करत त्यांनी अर्थशास्त्रात प्रथम श्रेणीसह एम.ए . पूर्ण करत कलकत्ता विद्यापीठातून एम. एल. देखील झाले. मॅट्रिक पासून एम. एल.पर्यंतच्या अभ्यासक्रमात त्यांनी कधीही पहिली श्रेणी सोडली नाही.
सुरुवातीला त्यांनी काही शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक, प्राध्यापक म्हणून काम केले तर पुढे जाऊन ते प्राचार्य सुद्धा बनले परंतु पुढे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी महाविद्यालय सोडले. 1937 मध्ये त्यांनी कायद्याच्या क्षेत्रात अलाहाबाद विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली.
स्वातंत्र्यसंग्रामातील कार्य
डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात मोठा वाटा होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनऊ अधिवेशनादरम्यान राजेंद्र प्रसाद यांची भेट महात्मा गांधी यांच्याशी झाली. त्यानंतर ते गांधीजी यांच्या बिहारच्या चंपारण्य सत्याग्रहात सामील झाले. महात्मा गांधी यांच्या कार्याने ते प्रचंड प्रभावित झाले आणि त्यांनी वकीलच्या कारकिर्दीतून निवृत्ती घेऊन भारतीय स्वातंत्र्य चळवळीला मदत करण्यासाठी ते सज्ज झाले. 1914 मध्ये पुरामुळे प्रभावित झालेल्या बंगाल आणि बिहार प्रांतातील लोकांना त्यांनी सक्रिय मदत केली.
ऑक्टोबर 1934 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो ठराव मंजूर केल्यावर डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रसाद यांना पाटणा येथे अटक करण्यात आली आणि त्यांना बांकीपुर मध्यवर्ती कार्यालयात भरती करण्यात आले.
हे पण वाचा : हे पण वाचा : संविधान दिन भाषण
राष्ट्रपती कारकीर्द :
भारतीय संविधानाला मान्यता देण्यात आल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद ही भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडले गेले. भारताचे राजदूत म्हणून त्यांनी जगभर भ्रमंती केली परराष्ट्र राष्ट्रांची राजनैतिक संबंध निर्माण केले. यानंतर 1952 आणि 1957 मध्ये ते सलग दोन वेळा पुन्हा राष्ट्रपती म्हणून निवडून आले. 1962 मध्ये त्यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आणि राष्ट्रपती पदाचा त्याग केला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न प्रदान करण्यात आला.
लेखन :
डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी उर्दू आणि फारसी भाषांचा अभ्यास केला असला तरी त्यांनी संस्कृत,बंगाली, हिंदी आणि इंग्रजी या भाषांवर देखील प्रभुत्व मिळवले. त्यांचे बहुतेक लेखन हिंदी व इंग्रजीत आहे. चंपारण में महात्मा गांधी, मेरे युरोप के अनुभव, बापू के कदमों में, भारतीय शिक्षा ही त्यांची काही हिंदी पुस्तके प्रसिद्ध आहे त्याचबरोबर डिवाइडेड इंडिया, इकॉनॉमिक्स ऑफ खादी ही त्यांची काही इंग्रजी पुस्तके सुद्धा प्रकाशित झालेले आहेत.
त्यांच्या लेखनाची मांडणी अगदी साधी सरळ सोपी सुस्पष्ट आणि भाषाशैली ओघवती असे. काही वृत्तपत्रातून त्यांनी स्फुटलेखन देखील केले. याचबरोबर सर्च लाईट या पाटण्याच्या इंग्रजी दैनिकाचे ते संस्थापक होते.त्यांनी देश नावाचे हिंदी साप्ताहिक चालू चालू केले.
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती वकील लेखक एक थोर स्वातंत्र्य सैनिक आणि एक महान राष्ट्रभक्त डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे निधन 28 फेब्रुवारी 1963 रोजी झाले.
0 टिप्पण्या