महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील सासवड जवळ पश्चिम घाटात वसलेला पुरंदर किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारातील असून समुद्रसापासून त्याची उंची सुमारे 1390 मीटर आहे.


छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र म्हणजेच स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थळ असल्याने या किल्ल्याला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे.

या किल्ल्याचा संदर्भ यादवकालीन राजवटीपासून आहे. यादवकालीन राजवटी नंतर पुरंदर निजामशाही कडे गेला आणि पुढे आदिलशाही च्या ताब्यात.

1649 मध्ये जेव्हा आदिलशहा ने छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी राजे यांना कैदेत टाकले तेव्हा महाराजांनी या किल्ल्यात प्रवेश मिळवला. मराठा साम्राज्या साठी हा एक महत्वाचा विजय मानला जातो.

1665 मध्ये औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा पुरंदरला वेढा घातला. किल्लेदार म्हणुन नियुक्ती असलेले मुरारबाजी देशपांडे यांनी मुघल सैन्याविरुद्ध जोरदार प्रतिकार केला पण त्यात त्यांना अपयश आले. या बातमीनंतर छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबत तह केला ज्यात त्यांनीं पुरंदर सह 23 किल्ले आणि 1 प्रदेश त्यांच्या ताब्यात देऊ केला परंतु अवघ्या पाचच वर्षात महाराजांनी पुरंदर पुन्हा स्वराज्यात सामील करुन घेतला.

पुढे ब्रिटिश राजवटीत हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला


रचना : 

हा किल्ला २ भागात विभागला गेला असून खालच्या भागाला माची असे म्हणतात. माचीपासून खालच्या भागाला बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर पुरंदरेश्र्वराचे मंदिर आहे ज्यावरून त्याला पुरंदर असे नाव दिले गेले. मुघलांपासून किल्ल्याचे रक्षण करताना प्राणाची आहुती देणारे सेनापती मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा किल्ल्यावर आहे.