हरिश्चंद्रगड किल्ल्याचा इतिहास || Harishchandragad fort history in Marathi


Harishchandragad fort history in Marathi महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात वसलेला हरिश्चंद्रगड हा एक डोंगरी किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. ठाणे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे तो स्थित आहे. हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून 1424 मीटर उंचीवर आहे.

 Harishchandragad killa mahiti || हरिश्चंद्रगड किल्ला मराठी माहिती

पौराणिक महत्त्व :

हरिश्चंद्रगड या किल्ल्याला दोन हजार वर्षाची पौराणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. सुमारे साडेतीन वर्षाने अधिक प्राचीन असलेल्या चारही बाजूंनी तुटलेल्या रौद्र भीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या गडाचा उल्लेख अग्निपुराणात आणि मत्स्यपुराणात देखील आढळतो. आदिवासी महादेव कोळी या समाजातील लोकांकडून हा किल्ला मोगलांनी घेतला आणि त्यानंतर मराठ्यांनी १७४७-४८ मध्ये मोघलांकडून घेऊन कृष्णाजी शिंदे यांची किल्लेदार म्हणून नियुक्ती केली.

अकराव्या शतकात या किल्ल्याच्या विविध लेण्या कोरल्या गेल्या आहेत. या लेण्यांमध्ये भगवान विष्णूच्या मूर्ती आहे. महान ऋषी चांगदेव हे चौदाव्या शतकात येथे ध्यान करायचे या गुहा त्याच काळातील आहेत. गडावरील बांधकामे आणि आजूबाजूच्या प्रदेशातील विस्तीर्ण संस्कृती अस्तित्वात असल्याचे दर्शवते.


किल्ल्याचे वर्णन :

हरिश्चंद्रगड या किल्ल्याच्या सर्वात उंच टोकाला तारामाची असे म्हणतात. तारामाची वरून जवळच्या परिसराची आणि वनक्षेत्राचे एक सुंदर विहंगम दृश्य आपणास बघावयास मिळते. हा किल्ला समोरून बघितल्यास एखाद्या नागाच्या फण्याप्रमाणे दिसतो. कोकणकडा किंवा त्यालाच कोकण चट्टानाची अर्धवर्तुळाकार खडकी भिंत देखील आहे.

किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरात बरीच मंदिरे व लेणी आढळून येतात. यापैकीच एक म्हणजे केदारेश्वर लेणी येथे एक अद्वितीय गुहा आहे ज्यात पाण्याने वेढलेले मोठे शिवलिंग आहे. याच भागात हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर, नागेश्वर मंदिर आणि विविध लेणी आहेत. एका प्रमुख तलावाव्यतिरिक्त शीर्षस्थानी पाण्याची टाकी देखील आहेत. 

पावसाळ्यात या गडाच्या सौंदर्य अजूनच वाढते. या गडावर वनस्पतींची विविधता आढळून येते ज्यात करवंद, कार्वीच्या जाळी,उक्षी, कुडा, पांगळी, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती आढळतात. तारामती हे गडाचे सर्वोच्च शिखर असून त्यावरून आपल्याला नाणेघाट, रतनगड, कळसुबाई, अलंग, कुलंग, भैरवगड, आजोबाचा डोंगर हा परिसर दिसतो.

गडावर पोहोचण्याच्या वाटा : 

हरिश्चंद्रगडावर पोहोचण्यासाठी सध्या तीन वाटा जास्त प्रचलित आहे.

खिरेश्वर कडची वाट : 

जुन्नर तालुक्यातून येणारी खिरेश्वर कडील वाट सर्वात सोपी असल्याने हरिचंद्र गडावर जाण्यासाठी लोक साधारणपणे ही वाट निवडतात. या वाटेचा रस्ता माळशेज घाटाकडून जातो. हरिश्चंद्रगडावर जाताना सुरेश गावातून साधारण एक किलोमीटर अंतरावर खिरेश्वराचे प्राचीन अकराव्या शतकातील यादवकालीन मंदिर आहे.

नळीची वाट : 

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातून हरिश्चंद्रगडावर येणारी वाट म्हणजेच नळीची वाट. या वाटेत येणारा चढाव खडतर असून वाटेत भलेभले दगड आहेत. रॉक क्लाइंबिंग करून तब्बल दहा-बारा तास प्रवास करून या वाटेने पोहोचता येते.

पाचनईकडील वाट : 

अहमदनगर जिल्ह्यातील पाचनई मार्गे सुद्धा गडावर जाता येते. ही वाट मुंबई नाशिक हम रस्त्यावरील घोटी या गावात त कोण जाते. पाचनई हे गडाच्या पायथ्या जवळचे गाव असून येथून गड गाठण्यास दीड ते दोन तास लागतात.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे : 

महाराष्ट्रातील अहमदनगर प्रदेशातील एक सुंदर डोंगरी किल्ला आणि पश्चिम घाटातील अतिशय लोकप्रिय ट्रेकिंग चे ठिकाण म्हणून हरिश्चंद्रगडाला मोठी पसंती आहे. या गडावरील आकर्षक ठिकाण म्हणजे केदारेश्वर मंदीर, कोकणकडा, तारामती शिखर होय. पावसाळ्यात कोकणकड्यावर आपल्याला नेत्र दीपक दृश्य बघायला मिळते.

 

आपला अमूल्य वेळ काढून हरिश्चंद्रगड किल्ल्याचा इतिहास || Harishchandragad fort history in Marathi  हा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद.

 Thank you so much.


👉 हेही वाचा :

 शेअर मार्केट बेसिक माहिती

संत ज्ञानेश्वर मराठी माहिती / निबंध 

संगणक म्हणजे काय

 ___

व्हिडिओजसाठी फॉलो करा : Kiddos

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: मराठी माहिती

___






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या