Rajmata jijau speech, bhashan and nibandh in Marathi राजमाता जिजाऊ जयंती भाषण 

स्वतंत्र मराठी साम्राज्याचे स्वप्न बघणाऱ्या आणि ते पूर्णत्वास निघणाऱ्या एकमेव राजमाता जिजाऊ म्हणजे एक महान व्यक्तिमत्व होते नंतर कसे होईल. लहानपणापासूनच मुघलांचा जनतेवर होणारा अत्याचार त्यांनी पाहिला होता. त्यामुळे त्यांच्या मनात अन्याय विरुद्ध चीड होती. जनतेला सुख देण्यासाठी त्यांनी आपला पुत्र शिवबा यांना चांगले संस्कार दिले. एका स्वतंत्र मराठी साम्राज्याचे स्वप्न त्यांनी आपल्या मुलासोबत पाहिले आणि त्यांच्याकडून पूर्ण करून घेतले. एक आदर्श आई आणि मुलाचे उदाहरण म्हणून आपण राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराजांच्याकडे बघू शकतो.

rajmata jijau bhashan | राजमाता जिजाऊ भाषण

Rajmata jijau speech 2023 in Marathi राजमाता जिजाऊ भाषण : आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझे सर्व मित्र मैत्रिणी यांना माझा नमस्कार. आज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आपण येथे जमलेलो आहोत. राजमाता जिजाऊ यांच्या विषयी मला आज भाषण देण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी माझ्या वर्ग शिक्षकांच्या आभार मानते आणि भाषणात सुरुवात करते. माझे भाषण तुम्ही शांततेत ऐकावे, अशी मला आशा आहे.

ज्यांनी फक्त स्वराज्याचे स्वप्न पाहिलेच नाही तर ते सत्यात देखील उतरवले अशा स्वराज्यजननी, राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. राजमाता जिजाऊ यांच्या रूपाने जनतेने आदिशक्तीचे दर्शन केले असे म्हटले तर यात वावगे काही ठरणार नाही.

स्वामी विवेकानंद भाषण

राजमाता जिजाऊ यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे 12 जानेवारी 1598 रोजी तिथीनुसार पौष पौर्णिमेला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव होते तर आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई असे होते. 

जिजाऊंनी लहानपणापासून मुघलांचा जनतेवर होणारा अन्याय आपल्या डोळ्यांनी पाहिला होता. मनात अनेक वर्षापासून मुघल सत्ता राज्य करत होती आणि दिनदुबळ्या जनतेला लुटत होती. अनेक मुघल सैनिक येऊन आपल्या आया बहिणीच्या अब्रू वर हात घालत होते. हे सर्व कसं थांबणार? कोण थांबवणार? याबद्दल जिजाऊ नेहमी विचार करायच्या.

या अन्याय विरुद्ध लहानपणापासूनच त्यांच्या मनात चीड होती. या अन्याया विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळणी खेळण्याच्या वयातच हाती तलवार आणि ढाल घेत युद्ध कौशल्याचा सराव केला. स्वराज्याचा विचार आपल्या उराशी धरून त्यांनी युद्ध कौशल्य, तलवार बाजी शिकून घेतली. राजकारणात त्या तरबेज झाल्या. 

इसवी सन 1605 मध्ये त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यांचा थोरला मुलगा म्हणजे संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला.19 फेब्रुवारी 1630 रोजी राजमाता जिजाऊ यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जन्म घेतला आणि त्यांचा आनंद गगनात मावेन असा झाला. आता त्यांना विश्वास वाटत होता की आपण जे स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आहे ते नक्की पूर्ण होणार. त्यासाठी त्यांना फक्त शिवबांना तयार करायचे होते. 

जिजाऊंनी लहानपणापासूनच शिवबांवर तसे संस्कार केले. रामायण , महाभारतातील शौर्याच्या कथा सांगून त्यांच्या धाडस निर्माण केले. याचबरोबर तलवारबाजी, घोडे स्वारी, न्याय निवडे, नेतृत्व, कौशल्य, राजकारण असे एक ना अनेक गुण त्यांनी शिवबांमध्ये विकसित केले.

शहाजीराजांच्या अनुपस्थितीत मुघल राजवटी विरुद्ध बीच बीच बीज शिवबांच्या मनात रोवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम जिजाऊंनी यथासांग पार पाडले. तत्कालीन राजकारण आणि समाजकारणात जिजाऊ जातीने लक्ष घालत. जातीपाती आणि घराण्यांच्या न्याय देण्याच्या बाबतीत त्या अत्यंत निःपक्ष होत्या. शिवबांना देखील त्यांनी हेच शिकवले. प्रत्येक स्त्री ही आपल्या आईप्रमाणे असते हा अत्यंत महत्त्वाचा धडा देखील छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईकडूनच शिकले.

स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचे स्वप्न फक्त राजमाता जिजाऊंमुळे पाहिले गेले आणि साकार सुद्धा झाले. 17 जून 1674 रोजी जिजाबाईंचा मृत्यू झाला.

धन्यवाद

 ___

व्हिडिओजसाठी फॉलो करा : Kiddos

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: मराठी माहिती

___

✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : 

प्रजासत्ताक दिन निबंध