Republic day speech in Marathi : 

वर्ष संपत आले की आपल्याला चाहूल लागते 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाची. भारतीय प्रजासत्ताक दिन जवळ आला आहे आणि संपूर्ण देश 26 जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या तयारीत आहे आहे. यावर्षी 2023 ला भारत 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. प्रजासत्ताक दिन हा भारतीय स्वातंत्र्यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा दिन मानला जातो कारण या दिवशी भारतीय संविधान लागू झाले. अनेक शाळा कॉलेजेस ऑफिसेस मध्ये हा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला जातो. विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते भाषणं दिली जातात. चला तर आज आपण प्रजासत्ताक दिन भाषण मराठी मध्ये पाहूयात.

प्रजासत्ताक दिन भाषण 


आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख अतिथी गण, परमपूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वात आधी भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या महापुरुषांनी आपल्या प्राण्याचे बलिदान दिले त्यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आजच्या या प्रजासत्ताक दिनी मला येथे भाषण करण्याची संधी दिल्याबद्दल मी माझ्या वर्ग शिक्षकांच्या आभार मानू इच्छितो. आज आपण आपला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी इथे मोठ्या उत्साहात जमलेलो आहोत. सर्व प्रथम आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 जसे की आपल्याला माहीतच आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला परंतु भारत देशाचा कारभार चालवण्यासाठी कोणतेही कायदे अस्तित्वात नव्हते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक घटना समिती स्थापन करण्यात आली. त्यांनी दोन वर्षे 11 महिने 18 दिवस कठोर परिश्रम करून भारत देशाला एक मजबूत संविधान प्रदान केले. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात हे संविधान लागू करण्यात आले. याच दिवशी आपला भारत देश लोकशाही, प्रजासत्ताक आणि सार्वभौम देश बनला. म्हणून 26 जानेवारी हा दिवस दरवर्षी भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा भारताची राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे राजपथावर साजरा केला जातो. भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान आणि इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची उपस्थिती या सोहळ्याला आवर्जून असते. या दिवशी राजपथावर औपचारिक परेड होते आणि त्यानंतर राष्ट्रपती पंतप्रधानांनी तर उच्च सरकारी अधिकारी यांची उपस्थिती असते. ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण असते. या दिवशी भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दलाच्या नऊ ते बारा वेगवेगळ्या रेजिमेंट त्यांच्या बँड सह आणि त्यांच्या अधिकृत सजावटीसह राजपथावर मार्च करतात. इथे भारतीय संरक्षण क्षमता प्रदर्शित केली जाते. प्रजासत्ताक दिनी भारतीय संस्कृती आणि सामाजिक वारसा दर्शविला जातो. हा सोहळा विशेष लक्षवेधी असतो.


प्रजासत्ताक दिन शाळा, महाविद्यालय आणि कार्यालयांमध्ये देखील मोठ्या उत्साहाने साजरा होतो. शाळांमध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यात नृत्य, गायन आणि भाषण यांचा समावेश असतो.


आपल्या संविधानानुसार भारत एक समाजवादी,धर्मनिरपेक्ष, सार्वभौम आणि लोकशाही प्रजासत्ताक आहे. त्यानुसार आपल्या देशातील नागरिकांना देशाचे नेतृत्व करण्यासाठ नेता निवडण्याचा विशेष अधिकार मिळतो. भारत उत्तर उत्तर अतिशय विशेष कामगिरी करत आहे आर्थिक सुधारणा देखील भारतात होत आहेत. परंतु या मार्गात अजूनही गरिबी,बेरोजगारी, प्रदूषण यांचे अडथळे आहेतच. एक जबाबदार नागरिक या नात्याने या सर्व आव्हानांना तोंड देणे आणि दुसऱ्या बाजूने अधिक मजबूत होणे हे आपले कर्तव्य आहे. चला तर मग आपण एकमेकांना वचन देऊ की आपण आपल्या देशाची एक चांगली आवृत्ती बनवून या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या राष्ट्राला एक चांगले स्थान बनवण्यासाठी योगदान देऊ.


जय हिंद जय भारत

धन्यवाद



प्रश्न १ : 26 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?

उत्तर - 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.


प्रश्न २ : 2023 मध्ये कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाईल?

उत्तर - 2023 मध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाईल.

 👉 हेही वाचा - डॉ. राजेंद्र प्रसाद मराठी माहिती

 👉 हेही वाचा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर महिती