शाळेची सहल मराठी निबंध - Essay On School Picnic in Marathi
शाळेची सहल म्हणजे मज्जा.. सहल म्हणजे उत्साह.. सहल म्हणजे नुसती धमाल.. मित्रांसोबत मस्ती.. खाणे पिणे आणि बागडणे..जर ही सहल मित्रांसोबत केले तर त्यासारखे सुख नाही. शाळेतील सहल(shaletil sahal marathi nibandh) म्हणजे आपल्या वयातील मुलांसोबत कधीतरी बाहेर पडणे. त्यांच्यासोबत नवनवीन गोष्टी बघणे आणि धमाल करणे. म्हणूनच मुलांना शाळेतील सहल खूप आवडते. आज आपण माझ्या शाळेची सहल मराठी निबंध बघणार आहोत.
शाळेची सहल मराठी निबंध | shalechi sahal marathi nibandh |
आमची शाळा दरवर्षी नवीन ठिकाणी एक सहल काढते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमची सहज जाणार आहे असे आमच्या वर्ग शिक्षकांनी आम्हाला सांगितले. आपल्या शाळेची सहल जाणार हे ऐकून आम्हा सर्व मुलांना अतिशय आनंद झाला. माझं तर आनंद गगनात मावेनासा झाला कारण नेहमीच्या त्याच्या गोष्टींना कंटाळून नवीन काहीतरी घडत होते. सहावीचा विषय जेव्हा वर्गात निघाला तेव्हापासून सगळीकडे तीच चर्चा सुरू झाली. कुणाचेही सरांच्या बोलण्याकडे किंवा शिकवण्याकडे लक्ष नव्हते.
सर्वांची कुजबूज चालू होती की आपण तिकडे जाऊन काय करायचे. कुणाला खूप मज्जा करायची होती, कोणाला पकडापकडी खेळायची होती, कुणाला क्रिकेट खेळायचे होते तर अजून वेगवेगळे कुणाचे प्लॅन निघत होते. सर्वांची उत्सुकता वाढत होती आणि सहज जाण्याची तारीख जवळ येत होती.
अखेर तो दिवस उजाडला आणि वर्ग शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे सर्व मुले ठीक सहा वाजता शाळेत जमली. इतक्या सकाळी उठून तयारी करून आल्यावरही कोणी थकल्यासारखे किंवा झोपेत दिसत नव्हते. सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळाच उत्साह दिसत होता. शाळेच्या बस आमच्या आधीच मैदानावर हजर होत्या. मुली आणि पालक सर्वांनी मिळून मैदानावर एकच गर्दी केली होती. प्रत्येक क्षण आपापल्या पाल्याला वेगवेगळ्या सूचना देत होते. कुणी ओळखपत्र चेक करत होते कुणी डबा चेक करत होते तर कोणी खाऊ चेक करत.
ठीक 6.30 वाचता सरांनी सर्वांचे हजेरी घेतली आणि आम्ही एक एक करून बस मध्ये बसलो. रोज एक किंवा दोन गैरहजर असणारी मुले आज सर्वांची हजेरी लागली होती. पालकांना बाय करून सर्व मुलांनी "गणपती बाप्पा मोरया" चा आवाज दिला आणि बस सुरू झाली. अशाप्रकारे आम्ही रायगडाकडे जाण्यास निघालो.
बस मध्ये गाण्याच्या भेंड्या खेळणे, गप्पा मारणे असे करत करत थोड्याच वेळात आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. शिक्षकांनी आम्हाला रायगडाची माहिती समजावून सांगितली की रायगड समुद्रसपाटीपासून 2851 फूट उंच आहे. सर्वांनी मनाशी विषय केला की आपण हा किल्ला आरामात सोडू शकतो आणि आम्ही किल्ला चढण्यास सुरुवात केली. रायगड चढताना सर्वजण अगदी उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव च्या घोषणा देत होते. साधारण दोन तास चढाई करून आम्ही रायगडाच्या मुख्य द्वारापाशी म्हणजेच महाद्वारापाशी पोहोचलो. तिथेच दुपारचं जेवण करून आम्ही रायगडावरील शिवकालीन वस्तू पाहण्यासाठी निघालो.
पहिल्यांदा चालवलं की हा अगदी मजबूत आणि भव्य किल्ला आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केलेली होती. पुढे आम्ही गंगासागर तलाव आणि नगारखाना पाहिला.नगारखाण्याच्या आतील बाजूस मेघडंबरी म्हणजेच शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची जागा होती.
आसपासची जागा आणि सर्व ठिकाणी पाहून झाल्यावर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाजाच्या जागी पोहोचलो. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी दिसायला किती तरी मोठी भव्य आणि रम्य होती परंतु एक हिंदू धर्म रक्षणाला स्वराज्य रक्षक त्या ठिकाणी अखेरची चिरनिद्रा घेत होता असा विचार करून सर्वच भावनिक होत होते. डावीकडेच वाघाची म्हणजेच महाराजांच्या कुत्र्याची समाधी होती ज्याने महाराजांच्या चितेत उडी मारली होती. समाधी जवळ काही काळ थांबून आम्ही सर्वजण परतीच्या प्रवासाला निघालो.
गडावरून खाली उतरल्यावर बस मध्ये बसलो आणि पुन्हा घराची वाटचाल सुरू झाली. गाण्याच्या भेंड्या गप्पा यामध्ये पुन्हा घरी पोहोचलो ते कळलं नाही. आम्ही जाण्यापूर्वीच पालक शाळेच्या आवारात हजर होते. त्यांच्यासोबत घरी जाऊन विश्रांती घेतली. घरी गेल्यावरही माझं मन रायगडावरच होतं. महाराजांची समाधी, वाघ्याची समाधी आणि रायगड किल्ला डोळ्यासमोर दिसत होता. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर वर्गात सर्वांच्या सहलीच्याच गप्पा रंगात आल्या होत्या.
मला माझी रायगडावरची शाळेची सहल खूप आवडली. त्यावर शाळेची सहल मराठी निबंध सुद्धा मी लिहिला.
तुम्हाला हा शाळेची सहल मराठी निबंध कसा वाटला हे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. शाळेची सहल मराठी निबंध यामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा काही सुचवायचे असल्यास कमेंट करू नक्की सांगा.
0 टिप्पण्या