नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश || new year wishes

 Navin varshachya Hardik shubhechha 

 1 जानेवारीपासून आपण आपले नवीन वर्ष सुरू झाले असे मानतो. ही मान्यता इंग्रजी कॅलेंडर ग्रेगोरियन यावर आधारित आहे. जगभरातच एक जानेवारी या दिवसाला नवीन वर्ष म्हणून मान्यता आहे.


परंतु जगात विविध देश आणि धर्म यांच्यावर आधारित विविध कॅलेंडर आहेत त्यानुसार वेगवेगळ्या तारखांवर नवीन वर्ष साजरे केले जाते. भारतात देखील हिंदू कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात चैत्र शुक्ल प्रतिपदेला मानली जाते तर मुस्लिम धर्माच्या मते मोहरम च्या पहिल्या तारखेपासून नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते.


आपल्यापैकी प्रत्येक जण नवीन वर्षाच्या अतिशय आतुरतेने वाट पाहत असतो. प्रत्येक नवीन वर्षात सर्वांनाच आशा असते की नवीन वर्ष आनंदाचे 600 आणि भरभराटीचे येईल. त्यामुळे प्रत्येकासाठी हा क्षण खास असतो. हे नवीन वर्ष अधिक खास करण्यासाठी प्रत्येक जण आपल्या जवळच्या मित्रांना,नातेवाईकांना, व्यक्तींना शुभेच्छा देतात. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात त्यांना सुखी आयुष्य लाभ घ्यावे अशा प्रकारच्या या शुभेच्छा असतात.

म्हणूनच, आज आपण या नवीन लेखामध्ये नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2023 कशाप्रकारे देऊ शकतो हे बघणार आहोत. हे आपण आपल्या सोशल मीडिया साईटवर शेअर करून इतरांना देखील नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता.


नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश - new year wishes in Marathi


जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवूया,

चला या नवीन वर्षाचे स्वागत आपण करूया.

नववर्षाभिनंदन

navin varshachya hardik shubheccha


गेले ते वर्ष गेला तो काळ,

आता नवीन सुरुवात आणि आनंद 

घेऊन आल नवीन साल 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


तुमची साथ यापुढे अशीच असू द्या

नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हालाही घ्या.


नव्या वर्षात नव्या उमेदीने आपले ऋणानुबंध असे जपुया

नव्या आशेने नव्या उमेदीने नवीन वर्षात पदार्पण करूया.


Navin varshacha Hardik shubhechha 2023



दरवर्षीप्रमाणे डिसेंबर संपत आला की एक जानेवारीची चाहूल लागते आणि नववर्षाच्या स्वागता आपण गुंगून जातो. जगभरात हाऊस अतिशय उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक वर्गातील लोक त्यांच्या पद्धतीने हा दिवस साजरा करतात. खास करून तरुण मुला-मुलींमध्ये या दिवसाचे विशेष आकर्षण असते. वेगवेगळे गेट-टुगेदर आणि कार्यक्रम, पार्टी यांचे आयोजन केले जाते.

नववर्षाच्या नवीन मुहूर्तावर अनेक लोक नवीन कामे सुरू करतात, येणाऱ्या नवीन वर्षात आपली उद्दिष्टे ठरवतात,नवीन निर्णय घेतात आणि पूर्वीपेक्षा स्वतःला अजून चांगले बनवण्याचे संकल्प करतात. अनेक जण त्यांच्या आयुष्यातील काही वाईट गोष्टी किंवा व्यक्तींपासून दूर राहण्याचा संकल्प करतात.

नवीन वर्ष प्रत्येकासाठी वेगवेगळे आहे. ते आपल्या मध्ये एक नवीन ऊर्जा आणि उत्साह भरते. आयुष्याला नवीन मार्गाने जाण्याचा संदेश देते. एकमेकांना वेगवेगळे सुविचार, शायरी किंवा संदेश देऊन लोक स्वतःतील सकारात्मकता, उत्साह वाढवण्याचे काम करतात.


नवीन वर्ष आपणास सुखा समाधानाचे,

आरोग्याचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे जावो.

आपले जीवन सुखमय होवो,

हीच श्री चरणी प्रार्थना.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


नवीन वर्षी आपली संस्कृती जपूया,

थोरांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया.



दुःख सारी विसरून जाऊ ,

आपले सुख देवाच्या चरणी वाहू,

स्वप्न उरलेली या नवीन वर्षी पाहू,

नव्या नजरेने नववर्षाला सामोरे जाऊ

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


नवीन वर्षाचा आनंद उत्साह वेगळाच असतो. मागच्या वर्षाची सर्व नकारात्मकता संपवून आता सकारात्मक पाऊल टाकण्याची वेळ आली आहे अशी शिकवण नवीन वर्ष आपल्याला देते. आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणात जणू हे वर्ष घेऊन येते. जुन्या सर्व वाईट गोष्टी वाईट काळ मागे सारून आपले भविष्य सुधारण्यासाठी नवीन वर्ष आपल्याला खुणावत असते. प्रत्येकासाठी नवीन वर्ष खूप विशेष असते. प्रत्येक जण आपल्या प्रियजनांना नातेवाईकांना जवळच्या मित्रांना या नवीन आनंदात सहभागी करतात. स्वतःसाठी आणि सर्वात देवाजवळ प्रार्थना करतात आणि एकमेकांना नवीन वर्षाचे शुभेच्छा संदेश पाठवतात.



बघता बघता कॅलेंडर संपले डिसेंबर सरला.

वर्ष संपले ते कळलच नाही.

आपण सर्व या वर्षात माझ्या सुखदुःखात 

माझ्यासोबत उभे राहिलात 

त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे,

या वर्षात माझ्याकडून कळत नकळत

कुणाचे मन दुखले असेल तर

मला माफ करा आणि पुढेही असेच

आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असू दया.

आपणास व आपल्या परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.



नवीन वर्ष येत आहे,

आयुष्यातील एक वर्ष सरत आहे,

जुन्या आठवणी मागे पडत आहेत,

जुनी माणसे सोबत घेऊया आणि

नववर्ष साजरे करूया.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी काही शुभेच्छा संदेश बघितले आहेत जे आपण आपल्या मित्र मंडळी नातेवाईक यांना पाठवू शकता. या सर्व सुविचारांनी मधून आपण एक सकारात्मक आनंद पसरवणारा आहोत. मला आशा आहे की नवीन वर्षांवर लिहिलेले हे सर्व कोट्स आपल्याला खूप आवडले असतील. आपल्याला लाईक आवडला असल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि मला कमेंट मध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन लेखांसाठी आपला ब्लॉगला व्हिजिट करा.

आपला अमूल्य वेळ काढून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद.

 Thank you so much.


👉 हेही वाचा : संगणक म्हणजे काय

👉 हेही वाचा : शेअर मार्केट बेसिक माहिती

👉 हेही वाचा : संत ज्ञानेश्वर




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या