नवीन वर्षाचे संकल्प || New year resolution in Marathi

 नवीन वर्षाचे संकल्प | new year resolutions in Marathi | resolutions idea in Marathi


New year 2023 resolution in Marathi : मित्रांनो डिसेंबर संपत आला की आपल्याला वेध लागतात नवीन वर्षाचे. प्रत्येक नवीन वर्ष आपल्या साठी सुखा समाधानाचे आणि आरोग्य संपन्न असे असावे अशी आपली इच्छा असते. प्रत्येक नवीन वर्षी आपण काहीतरी संकल्प करतो आणि तो पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करतो. आजच्या या लेखात आपण नवीन वर्षाचे संकल्प new year resolutions 2023 बघणार आहोत.

 Health is wealth असे आपल्या कानावर नेहमी पडत असते. हे ऐकायला जितके छान आहे तितकेच आरोग्यासाठी फायदेशीर देखील आहे. आपण आपल्या हेल्थ आणि वेल्थ बद्दलच नवीन वर्षाचे संकल्प करणार आहोत. ही संकल्प करून ते नक्की पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नवीन वर्ष 2023 मध्ये तुमच्या जीवनातील काही in Marathi resolution ideas for new year 2023 आपण बघूयात.

नवीन वर्ष 2023 साठी संकल्प | new year resolutions in Marathi

लहानपणापासूनच आपण प्रत्येक नवीन वर्षी काहीतरी हेतू पूर्वक संकल्प करतो आणि प्रत्येक वेळी हे संकल्प पूर्णत्वास जात नाहीत. हे आपल्या सोबत नेहमीच होत असतं. जर्नल ऑफ क्लीनिकल सायकॉलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, खूप कमी लोक त्यांचे नवीन वर्षाचे संकल्प पूर्ण वर्षभर पाळण्यात आणि त्या अंगीकारण्यास सक्षम राहतात असा अंदाज आहे. याचा अर्थ असा की नवीन वर्षासाठी नवे ध्येय प्रत्येक जण ठरवतो पण सगळेच यशस्वी होतात असे नाही. आपल्यातील खूप कमी लोक यात यशस्वी होतात.

आज आपण अतिशय सोपे स्वतःला फायदेशीर असणारे आणि तुम्ही नेहमी करू शकणारे या नवीन वर्षाचे सर्वोत्तम संकल्प घेऊन बघणार आहोत. तुम्हीच आत्मविश्वास ठेवून स्वतःवर कंट्रोल करून पुढील नवीन वर्ष 2023 साठीचे संकल्प नक्की पूर्णत्वास न्याल अशी मला आशा आहे.

New year resolution


१. नियमितपणे व्यायाम करा : 

आपल्यापैकी अनेकांना व्यायाम करणे नेहमीच कंटाळवाणी वाटत आहे त्यामुळे व्यायाम करण्याचे काम ते पुढील ढकलतात. तुम्ही तुमच्या आयुष्यात डोकावून बघा तुम्ही किती वेळा ठरवले असेल की नियमित व्यायाम करायचा आहे परंतु हे आपल्याकडून कधीही पूर्ण होत नाही. सुरुवात छान होते पण यात नियमितपणा येत नाही. चला तर यावर्षी रोज निदान अर्धा तास सायकलिंग, योगा,चालणे, डान्स किंवा जिम करणे कोणताही एक योगा प्रकार करण्याचा संकल्प करूया.


२. चांगली झोप चांगली आरोग्य : 

आपला मेंदू आणि मन यांच्या संतुलनासाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत फायदेशीर आहे. आपली झोप पूर्ण झाली तर आपल्या आरोग्याच्या सर्व समस्या आपण टाळू शकतो. त्याची लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे हा एक अतिशय महत्त्वाचा नियम आपल्याला यात अंगीकरावा लागणार आहे. त्यामुळे आजपासून आपण संकल्प करूयात की आपण आपली चांगली झोप पूर्ण करूयात आणि त्या मार्फत आपल्या आरोग्य देखील सुधारू यात.

 👉 हेही वाचा - नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश || new year wishes


३. नियमित आरोग्य तपासणी करा : 

आपण बऱ्याचदा काही त्रास व्हायला लागल्यावर किंवा तब्येत खराब झाल्यावर अस्वस्थ वाटायला लागल्यावर डॉक्टर कडे जातो आणि उपचार घेतो. परंतु या उलट आपण जर वर्षातून एकदा आपल्या संपूर्ण शरीराची तपासणी करून घेतली तर काही आजार आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यातच लक्षात येतील आणि आपण त्यानुसार उपचार घेऊ शकतो. आजकाल अनेक प्रकारची हेल्थ पॅकेजेस उपलब्ध आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही अधिक जाणून घेऊ शकता आणि त्यांचा लाभ घेऊ शकता. असे करून आपण आजारांना आपल्यापासून दूर ठेवू शकतो.


४. भरपूर पाणी प्या : 

माणसाच्या शरीरात 70 टक्के पाणी असते हे सर्वांनाच माहित आहे. हे पाणी आपल्या शरीरासाठी इंधन म्हणून काम करते. आपण अनेकदा ऐकलं असेल की दिवसातून कमीत कमी आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे, परंतु आपल्याकडून हे कधीही शक्य होत नाही. जेव्हा आपल्याला तहान लागते किंवा आपण जेवण करतो त्याचवेळी आपण पाणी पितो.

आजपासून ही चुकीची सवय बंद करूयात आणि दिवसातून अनेक वेळा थोडे थोडे पाणी पिण्याची सवय लावूयात. मुख्यतः सकाळी रिकाम्या पोटी आपण पाणी प्यायला तर अनेक आजार टाळता येतात. याने आपले पोट साफ होते तसेच आपली त्वचाही चमकते त्यामुळे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भरपूर पाणी पिण्याचा संकल्प करूया.


५. तणावाला बाय म्हणा : 

आपल्या आयुष्यात तणाव हा अविभाज्य घटक झाल्यासारखे आपण वागतो. सर्वात मोठा शत्रू असूनही आपण नेहमीच तणावात राहतो. यामुळे तुमची मानसिक स्थिती खराब होते किंवा तुमच्या शरीरावर घातक परिणाम होतात. चला तर मग आज पासून संकल्प करूया या सरत्या वर्षा सोबत तणावालाही आपण निरोप देऊया.


६. नियमित व योग्य आहार घ्या :

योग्य व्यायामासोबतच आपल्याला नियमित आहार घेणे सुद्धा खूप आवश्यक आहे. आपल्या आहारात पोषक तत्वांचे प्रमाण जास्त हवे. तेलकट पदार्थ आणि जंक फूड पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

नवीन वर्षाचे संकल्प 2023 मध्ये आपण हा देखील संकल्प करू की आजपासून आपण नियमित आणि योग्य तोच आहार घेऊ आणि आपले शरीर मजबूत बनवू.


७. व्यसनापासून दूर राहा : 

आजच्या धावपळीच्या जगात तणावासोबतच व्यसनाचे संकट अधिक बळकट होताना दिसत आहे. अनेकांना दारू, सिगारेट, तंबाखू यासारख्या गोष्टींचे व्यसन असते आणि जे त्यांच्या आरोग्यासाठी खूपच घातक असते. अशा प्रकारच्या वाईट सवयीमुळे किंवा व्यसनांमुळे आपले शरीर हळूहळू कमकुवत होत आहे हे आपल्या लक्षात येत नाही.

 आज या नवीन वर्षात आपण संकल्प करूयात की आपण कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहू आणि आपल्या आरोग्य सांभाळू.


८. वजनावर नियंत्रण ठेवा : 

व्यसनामुळे किंवा बदललेल्या जीवनशैलीमुळे शरीरात लठ्ठपणा येतो म्हणजेच अतिरिक्त चरबी वाढते. यामुळे स्थूलता येते आणि उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकास सांधेदुखी यासारख्या समस्या उद्भवण्याचा संभव जास्त वाढतो. माणसाच्या शरीर कमकुवत बनत जाते आणि आपण उपचाराच्या अधीन होतो.

त्यामुळे यावर्षी नियमित व्यायाम योग्य आहारासोबतच लठ्ठपणा कमी करण्याचा देखील आपण संकल्प करूया.


९. आपल्या आर्थिक नियोजन करा : 

धावपळीच्या जगात माणूस पैसा कमवायला बाहेर पडला आहे परंतु आपण जो कमावलेला पैसा आहे त्याचे नियोजन करण्याचा तो विसरत आहे. आजकाल प्रत्येक जण हेच बोलताना दिसतो की आपण कमावतो तो पैसा कुठे जातो हे कळत नाही. परंतु आलेला पैसा कोणत्या प्रकारे वापरायचा, कशासाठी वापरायचा हे आपण ठरवले पाहिजे.

काळानुसार आपण आर्थिक नियोजन करायला शिकले पाहिजे. त्यासाठी आपला येणारा पैसा किती आहे आणि त्यातून आपण किती बचत करतो आणि किती खर्च करतो याचा हिशोब आपण ठेवला पाहिजे. भविष्यासाठी आपल्याला आर्थिक नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


१०. भविष्यासाठी तरतूद करा : 

आज आपले कितीही चांगले दिवस चालू असतील तरी आपल्याला भविष्य काळ माहित नाही. आपल्या भविष्यासाठी जर आपण आजच तरतूद केली तर तेव्हाचा तणाव आपल्याला राहणार नाही. कुणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.

त्यामुळे आपल्या भविष्याची तरतूद आपण आत्ताच करायला घेतली पाहिजे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या