मकर संक्रांत का साजरी करतात? जाणून घेऊया धार्मिक व वैज्ञानिक कारण

 ___

व्हिडिओजसाठी फॉलो करा : Kiddos

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: मराठी माहिती

___

जानेवारी महिन्यात साजरा केला जाणारा मकर संक्रांत हा सण भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याचा 14 किंवा 15 तारखेला मकर संक्रांत साजरी केली जाते. जेव्हा सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण येतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीनंतर हा सर्वात पहिला सण आहे. भारतातील विविध भागांमध्ये विविध प्रकारे हा सण साजरा केला जातो. प्रत्येकाच्या साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि वेगवेगळ्या नावांनी देखील हा सण ओळखला जातो. पश्चिम बंगाल मध्ये उत्तर संक्रांति, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश मध्ये उत्तरायण किंवा खिचडी, पंजाब आणि हरियाणा मध्ये लोहरी, केरळ कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये संक्रांति, तामिळनाडू मध्ये पोंगल आणि आसाम मध्ये बिहू म्हणून ओळखले जाते.

मकर संक्रांत माहिती

मकर संक्राती महत्व

सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाला वैज्ञानिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्त्व देण्यात आलेले आहेत. सूर्याचे दक्षिणायन संपूर्ण उत्तरायण सुरू झाले की मकर संक्रांत हा सण साजरा करतात. आध्यात्मिक दृष्ट्या देखील हा मुहूर्त खूप शुभ मानण्यात आलेला आहे. या मुहूर्तावर लोकांनी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून आपली पापडतात आणि सूर्य देवाची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतात. या दिवशी केलेले दान दुप्पट होते आणि मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर दान कर्माला जास्त महत्त्व देण्यात आलेले आहे.

दक्षिणायन संपूर्ण उत्तरायण सुरू झाल्याचा मुहूर्त देखील मकर संक्रांतीचा आहे. हे आरोग्याच्या दृष्टीतून फलदायक मानले जाते. या दिवसापासून दिवस मान मोठे होते तर रात्र छोटी होते.

महाकुंभमेळ्याचे आयोजन

मकर संक्रांतीला अध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्व देण्यात आलेले आहे.या दिवशी लोक अनेक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि आपली पापी धुतात तसेच सूर्य देवाची पूजा देखील करतात. पवित्र नद्यांच्या काठावर मेळ्याच्या स्वरूपात कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. याच कुंभमेळ्याला अर्ध कुंभ किंवा महा कुंभमेळा असे नाव दिले आहे. वाराणसी मध्ये दरवर्षी अर्ध कुंभमेळा भरतो तसेच प्रयागच्या संगमावर महा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हा महा कुंभमेळा अनुक्रमे प्रयाग, हरिद्वार,उज्जैन आणि नाशिक येथील घाटांवर साजरा केला जातो.
महा कुंभमेळ्यात स्नान केल्यास तुमचे सर्व पापी धुवून तुम्हाला मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते त्यामुळे लोक मोठ्या संख्येने यात सहभाग घेतात.


पतंग उडवणे 

भारतातील अनेक भागात मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. विशेषता गुजरात राज्यामध्ये लहान पोरांमध्ये पतंग उडवण्याचा प्रचंड उत्साह असतो. आकाश रंगबिरंगी पतंगांनी भरून गेलेले असते. काही ठिकाणी तर पतंग उडवण्याच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात.
पतंग उडवणे आरोग्याच्या दृष्टीने खूपच हितकारक आहे. असे म्हणतात हिवाळ्यात सर्दी खोकला आणि इतर संसर्गजन्य आजारांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. सूर्यापासून निघणारी किरणे मानवी शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहेत. पतंग उडवण्यासाठी घराबाहेर निघाल्यावर या सूर्यप्रकाशाचा आपल्याला फायदा होतो आणि आपले शरीर निरोगी राहते. त्यामुळे पतंग उडवण्याची प्रथा रूढ झाली आहे.

दान देण्याची प्रथा

भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये साजरा केलेले जाणारा मकर संक्रांति हा सण वेगवेगळ्या प्रतीनुसार देखील साजरा केला जातो. यातीलच काही प्रथांमध्ये दान देण्याची प्रथा प्रचलित आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये धर्मदान वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. उत्तराखंड, उत्तरांचल प्रदेशात तांदूळ,मसूर गरिबांना दान केले जातात. बाहेरून आलेल्या संतांना लोक पैसा आणि अन्नदान करतात. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते त्यामुळे काही राज्यांमध्ये गरिबांना अन्नदान केले जाते. तसेच आपल्या शेतात उत्पादन होणारे पीक गोरगरिबांना आणि संतांना दान करून सर्वत्र आनंदाचे वाटप केले जाते.


मकर संक्रांतीला खिचडी चे महत्व

भारतातील काही राज्यांमध्ये मकर संक्रांतीला खिचडीचे विशेष मंत्र देण्यात आलेले आहेत. पौराणिक कथांमध्ये आणि ज्योतिष शास्त्रांमध्ये देखील उडदाची डाळ शनिदेवाची संबंधित मानली जाते. या दिवशी उडीद डाळ खिचडी खाऊन दान केल्यास सूर्यदेव आणि शनि देवाची कृपा होते असे मानण्यात आलेले आहे. तसेच तांदूळ, मीठ, हळद आणि हिरव्या भाज्या वेगवेगळ्या ग्रहांशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्यामुळे या सर्व भाज्या एकत्र करून उडीद डाळ खिचडी बनवली तर ती अतिशय शुभ मानली जाते. 


पारंपारिक हलव्याचे दागिने

मकर संक्रांतीला पारंपारिक हलव्याचे दागिने घालण्याची पद्धत रूढ आहे. नव्या नवरीची पहिली संक्रांत असेल किंवा मुलांचे बोलणं नसेल यासाठी हलवायचे दागिने आवश्यक आणले जातात. काळा रंग घातलेल्या कपड्यांवर हे दागिने छान उठून दिसतात. घरात आलेल्या नवीन सुनेचा, जावयाचा किंवा लहान बाळाच्या कोड कौतुक करण्यासाठी हलव्याचे दागिने तयार केले जातात. जन्मभर संसारातील गोडवा टिकून राहावा म्हणून लग्नातील पहिला  संक्रांतीला विवाहित जोडप्याला हलव्याचे दागिने दिले जातात. हे त्यामागील शास्त्रीय कारण.

काळा रंग का वापरतात ? 


मकर संक्रांतीला काळा रंग घालण्यामागील शास्त्रीय कारण म्हणजे हिवाळा ऋतू. इतर सणासुदीला वर्ष केलेला काळा रंग मकर संक्रांतीला आवश्यक घातला जातो कारण या रंगात उबदारपणा असतो. काळा रंग उष्णता शोषून घेतो. संक्रांतीच्या वेळी असलेली थंडी कमी करण्यासाठी काळा रंग म्हणजेच उबदार कपडे घातले जातात.


धन्यवाद

मकर संक्रांत का साजरी करतात, मकर संक्रांतीचे महत्त्व यावर आधारित लेख आज आपण पहिला.मला अशा आहे की, तुम्हाला मकर संक्रांतीचे महत्त्व लेख तुम्हाला नक्की आवडला असेल. आपल्याला या माहितीबद्दल काही शंका असल्यास किंवा काही अजून माहिती हवी असल्यास कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की लिहा.

Thank you so much for reading


प्रश्न. १ सन 2023 मकरसंक्रांत कधी आहे?

उत्तर- 14 जानेवारी 2023, शनिवार रोजी.

प्रश्न.२ मकरसंक्रांत हा सण कोणत्या ऋतुत येतो ?

उत्तर- मकरसंक्रांत हा सण हिवाळा ऋतूच्या शेवटी येतो.

प्रश्न.३ मकर संक्रांत हा सण का साजरा केला जातो?

उत्तर- मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीमधील, 'मकर' हा शब्द 'मकर राशीचे' प्रतीक आहे व 'संक्रांती' म्हणजे संक्रमण. मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या