नवीन वर्षी (2023) मध्ये सुट्ट्याच सुट्या ! आत्ताच करा लॉंग विकेंड साठी नियोजन

 Holidays in New year 2023 : डिसेंबर महिना नुकताच संपला आहे आणि 2022 चा सूर्य मावळला आहे. नवीन वर्ष 2023 सुरू होऊन आणखी काही तास झाले आहेत. हे नवीन वर्ष प्रत्येकासाठी नवीन उषा उत्साह आणि त्याचबरोबर आव्हान देखील घेऊन येत आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने या नवीन वर्षात काय काय करायचं, कधी करायचं, कसं करायचं याचं प्लॅनिंग करत असतो. किती तरी लोकांनी आपल्या जुन्या वाईट सवयी सोडून जीवनात चांगल्या मार्गावर चालण्यासाठी चांगल्या गोष्टी अंगी करण्याचा नवीन वर्षाचा संकल्प केला असेल.

 ___

व्हिडिओजसाठी फॉलो करा : Kiddos

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: मराठी माहिती

___

नवीन वर्ष सुरू झाले की प्रत्येक जण अधिकारी मोठ्या आशेने बघत असतात. कोणत्या दिवशी कोणता सण येत आहे (holidays in 2023) हे ते शोधतात. सर्वांना नवीन वर्षात येणाऱ्या सुट्ट्यांचे वेध लागलेले असतात कारण या सुट्ट्यांवर अवलंबून त्यांचे वर्षभराचे नियोजन असते. या वार्षिक नियोजनासाठी वर्षाच्या सुरुवातीलाच प्रत्येक जण आपापले प्लॅन करत असतो. जर जास्तीत जास्त सुट्ट्या आठवड्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी येणार असतील तर लॉन्ग विकेंड से चे प्लॅनिंग केले जातात.









या लॉंगविकेंड ची नियोजन आधी केले तर प्रत्येकालाच आपल्या रोजच्या रुटीन आयुष्यातून बाहेर पडून मोकळा श्वास घ्यायला वेळ मिळतो. नवीन वर्ष 2023 मध्ये तुम्हाला जवळजवळ प्रत्येक महिन्याला भरपूर सुट्ट्या मिळणार आहेत त्या तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने वापरल्या तर तुम्ही त्याचा योग्य फायदा उठवू शकता. अनेक ठिकाणी दोन ते तीन दिवसाच्या सुट्ट्यांचे रूपांतर तुम्ही आरामात पाच ते सहा दिवसाच्या लांब सुट्ट्यांमध्ये करू शकता.




✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : प्रजासत्ताक दिन निबंध

चला तर मग आज आपण पुढील वर्षाच्या सुट्ट्या पाहुयात. इथे आपण लागून येणाऱ्या सुट्ट्यांचे संपूर्ण यादीच पाहुयात.





Holidays in New year 2023 : (डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023):

31 डिसेंबर 2022 शनिवार
1 जानेवारी 2023 रविवार (नवीन वर्ष)
जर तुम्हाला शक्य असेल तर 30 डिसेंबर 2022 शुक्रवार किंवा दोन जानेवारी 2023 सोमवार या दिवशी सुट्टी घेतली तर तुम्हाला लागोपाठ चार दिवसाचा लॉन्ग विकेंड नियोजित करता येऊ शकतो.

जानेवारी 2023 :

14 जानेवारी 2023 - शनिवार - लोहरी, मकर संक्रांत
15 जानेवारी 2023  - रविवार - पोंगल
13 जानेवारी 2023 शुक्रवार किंवा 16 जानेवारी 2023 सोमवारची सुट्टी घेतली तर निदान 4 दिवसाची मोठी सुट्टी नियोजित करता येईल.
26 जानेवारी 2023 गुरुवार प्रजासत्ताक दिन
28 जानेवारी 2023 शनिवार
29 जानेवारी 2023 रविवार
या दिवसांमध्ये जर 27 जानेवारी शुक्रवारची सुट्टी टाकल्यास तुम्हाला चार दिवसाची सुट्टी नियोजन नियोजित करता येईल.

✍🏻 हे पण 🙏👉 वाचा :शेअर मार्केट म्हणजे काय?

फेब्रुवारी 2023:

18 फेब्रुवारी 2023 शनिवार  - महाशिवरात्री
19 फेब्रुवारी 2023 रविवार
शक्य असल्यास 17 फेब्रुवारी 2023 शुक्रवार किंवा 20 फेब्रुवारी 2020 सोमवार अशी एक सुट्टी घेतली तर फेब्रुवारीमध्ये देखील 3 दिवस सुट्टी नियोजित करता येईल.


मार्च 2023:

8 मार्च 2023 बुधवार होळी
11 मार्च 2023 शनिवार
12 मार्च 2023 रविवार
जर 9 मार्च 2023 गुरुवार आणि 10 मार्च 2023 शुक्रवार सुट्टी मिळाली तर 5 दिवसाच्या पिकनिक नक्की होऊ शकते.


एप्रिल 2023:

4 एप्रिल 2023 मंगळवार महावीर जयंती
7 एप्रिल 2023 शुक्रवार शुभ शुक्रवार
8 एप्रिल 2023 शनिवार
9 एप्रिल 2023 रविवार
दरम्यान 5 एप्रिल 2023 बुधवार आणि 6 एप्रिल 2023 गुरुवार अशी दोन दिवसाची सुट्टी मिळाली तर हा देखील 6 दिवसाचा लॉन्ग विकेंड होऊ शकतो.


मे 2023:

5 मे 2023 शुक्रवार बुद्ध पौर्णिमा
6 मे 2023 शनिवार
7 मे 2023 रविवार
जर 8 मे 2023 सोमवार ची सुट्टी मिळाली तर 4 दिवसाचा काहितरी प्लान करता येईल.


जून 2023 आणि जुलै 2023

29 जून 2023 गुरुवार बकरी ईद
1 जुलै 2023 शनिवार
2 जुलै 2023 रविवार
जर 30 जुलै 2023 शुक्रवार ही सुट्टी घेतली तर 4 दिवस विकेंडचा आनंद घेऊ शकता.


ऑगस्ट 2023:

12 ऑगस्ट 2023 शनिवार
13 ऑगस्ट 2023 रविवार
15 ऑगस्ट 2023 मंगळवार स्वातंत्र्य दिन
16 ऑगस्ट 2023 बुधवार पारशी नवीन वर्ष
दरम्यान सोमवार 14 ऑगस्ट 2023 रोजी सुट्टी घेतल्यास 5 दिवसाचा मोठा विकेंड नियोजित करता येणार आहे.
26 ऑगस्ट 2023 शनिवार
27 ऑगस्ट 2023 रविवार
29 ऑगस्ट 2023 मंगळवार ओणम 
30 ऑगस्ट 2023 बुधवार रक्षाबंधन
जर 2023 सोमवार ही एक दिवसाची सुट्टी मिळाली तर पाच दिवसाच्या लॉंग विकेंड प्लॅन करण्याची संधी आहे.


सप्टेंबर 2023 :

7 सप्टेंबर 2023 गुरुवार जन्माष्टमी
9 सप्टेंबर 2023 शनिवार
10 सप्टेंबर 2023 रविवार
जर ८ सप्टेंबर 2023 शुक्रवार ही एक सुट्टी मिळाली तर चार दिवसाचा विकेंड एन्जॉय करू शकता.
16 सप्टेंबर 2023 शनिवार
17 सप्टेंबर 2023 रविवार
19 सप्टेंबर 2023 मंगळवार गणेश चतुर्थी
दरम्यान जर 18 सप्टेंबर 2023 सोमवार ही एक सुट्टी मिळाली तर 4 दिवसाची मोठी सुट्टी मिळू शकते.


सप्टेंबर ऑक्टोबर 2023 :

30 सप्टेंबर 2023 शनिवार
1 ऑक्टोबर 2023 रविवार
2 ऑक्टोबर 2023 सोमवार गांधी जयंती
दरम्यान 29 सप्टेंबर 2023 शुक्रवार किंवा 3 ऑक्टोबर 2023 मंगळवार यापैकी एक सुट्टी घेतल्यास 4 दिवसांचा लॉंग विकेंड प्लॅन करता येऊ शकतो.


ऑक्टोबर 2023 :

21 ऑक्टोबर 2023 शनिवार
22 ऑक्टोबर 2023 रविवार
24 ऑक्टोबर 2023 मंगळवार दसरा
या दिवसांमध्ये 23 ऑक्टोबर 2023 म्हणजे सोमवारी एक सुट्टी मिळाली तर 4 दिवसाची सुट्टी होऊ शकते.


नोव्हेंबर 2023 :

11 नोव्हेंबर 2023 शनिवार
12 नोव्हेंबर 2023 रविवार दिवाळी
13 नोव्हेंबर 2023 सोमवार गोवर्धन पूजा
जर दहा नोव्हेंबर 2023 शुक्रवार किंवा 14 नंबर 2023 मंगळवार यापैकी एक सुट्टी मिळाली तर चार दिवसाची सुट्टी एन्जॉय करू शकता.
25 नोव्हेंबर 2023 शनिवार
26 नोवेंबर 2023 रविवार
27 नोव्हेंबर 2023 सोमवार गुरुनानक जयंती
यादरम्यान जर 24 नोव्हेंबर 2023 शुक्रवार किंवा 28 नोव्हेंबर 2023 मंगळवारी यापैकी एक सुट्टी घेतली तर 4 दिवसाच्या सुट्टीचा आनंद तुम्ही घेऊ शकता.


डिसेंबर 2023 :

23 डिसेंबर 2023 शनिवार
24 डिसेंबर 2023 रविवार
25 डिसेंबर 2023 सोमवार ख्रिसमस
वर्षाच्या शेवटी मिळणारी या सर्वात जास्त सुट्टी असतील जिथे जर 22 डिसेंबर २०२३ शुक्रवार किंवा 26 डिसेंबर २०२३ मंगळवार अशी सुट्टी टाकली तर चार ते सहा दिवसात चा लॉंग करता येऊ शकतो.

निष्कर्ष :

या लेखामध्ये आपण नवीन वर्षी (2023) असणार्‍या सुट्ट्या  Holidays in New year 2023 यांची सविस्तरपणे माहिती पाहिली. मला आशा आहे की नवीन वर्षांत 2023 मध्ये असणार्‍या सुट्ट्या यांची माहिती समजली असेल. जर काही अडचण असेल किंवा एखादा मुद्दा राहिला असेल तर कमेंट द्वारे मला नक्की सांगा.
त्याचप्रमाणे आपणास नवीन वर्षी (2023) असणार्‍या सुट्ट्या  Holidays in New year 2023  हा लेख कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा.

✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : संगणक म्हणजे काय?

















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या