डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण | 6 december mahaparinirvan din speech in marathi

 

डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण | 6 december mahaparinirvan din speech in marathi 10 lines


Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाज सुधारक, लेखक, दलितांचे कैवारी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर रोजी महानिर्वाण झाले. त्यानिमित्त या दिवशी प्रशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय इत्यादी ठिकाणी महापरिनिर्वाण दिन आयोजित केला जातो. या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जाते. वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा कार्यक्रमाप्रसंगी भाषण दिले जाते. आज आपण महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाषण बघणार आहोत.



"बुद्धिमत्तेचा विकास हे 

मानवी अस्तित्वाचे

अंतिम लक्ष असले पाहिजे."


असा संदेश लोकांमध्ये देऊन लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय पाहुणे, प्राचार्य, गुरुजन वर्ग आणि उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो, असा डिसेंबर म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. त्यांना अभिवादन करण्यासाठी आज आपण येथे जमलेलो आहोत त्या निमित्त मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐका अशी मी आशा करतो.

भीमराव रावजी आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांच्या वडिलांचे रामजी तर आईचे नाव भिमाबाई होते. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले. आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण दापोली आणि सातारा येथे झाले. त्यानंतर मुंबईत राहायला आल्यावर त्यांनी एल्फिस्टन्स स्कूल मधून मॅट्रिकची परीक्षा दिली. पुढे बडोदा संस्थानाकडून शिष्यवृत्ती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषय घेऊन पदव्या संपादन केल्यावर बीए आणि नंतर एम ए ची परीक्षा सुद्धा ते उत्तीर्ण झाले.आता परिश्रम करत त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून पीएचडी पदवी मिळवली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, साहित्यिक, औद्योगिक,सांस्कृतिक क्षेत्रात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे . ते थोर अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञानी, समाज सुधारक, न्याय शास्त्रज्ञ होते. अस्पृश्य आणि दलित लोकांवर होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी चळवळी उभारल्या. महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कासाठी अनेक समर्थन केले. 

शेतीचे राष्ट्रीयकरण करण्याची संकल्पना त्यांनी मांडली. पीक पद्धती, पाणी उपलब्धता, उत्पादनात वाढ, साठवण्याची व्यवस्था शेतमालाचे भाव यासंदर्भात स्पष्ट नियम करावे अशी मागणी त्यांनी केली. 

भारतीय स्वातंत्र प्राप्तीनंतर सतत दोन वर्ष 11 महिने आणि 17 दिवस अहोरात्र मेहनत करून त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय तत्त्वावर आधारित समाज रचना घडवण्यासाठी भारताची राज्यघटना लिहिली. त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात.

6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली त्यांच्या निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण झाले.

“आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असावयास हवे”

ही मोलाची शिकवण देऊन ते गेले.



मला आशा आहे की हा महापरिनिर्वाण दिन | डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र  | Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi माहिती पर निबंध तुम्हाला आवडला असेलतर मग  तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका

नोट : महापरिनिर्वाण दिन || Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट मध्ये नक्की लिहा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या