स्वामी विवेकानंद यांची संपूर्ण मराठी माहिती- स्वामी विवेकानंद यांची माहिती मराठीमध्ये - Swami Vivekananda info Marathi | Swami Vivekananda biography in Marathi
स्वामी विवेकानंद जीवन परिचय
स्वामी विवेकानंद हे आपल्या देशात जन्मलेले एक थोर संन्यासी संत होते ज्यांना आपल्या तरुणांचे प्रेरणास्थान सुद्धा म्हटले जाते. आपल्या कार्यामुळे त्यांना अतिशय कमी काळात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. फक्त भारतातच नाही तर इतर देशातही आपल्या ध्येयाचे आणि ज्ञानाचे मूल त्यांनी पसरवले. (स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण मराठी माहिती). ते रामकृष्ण परमहंस यांचे लाडके शिष्य होते. परमहंसनीच त्यांना घडवले आणि त्यांचे विवेकानंद असे नामकरण केले. ( Swami Vivekananda information in Marathi).
संपूर्ण जगात आपल्या धर्माचा आणि हिंदुत्वाचा प्रसार करण्यात आणि हिंदू धर्माचे वेगळे स्थान निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. स्वामी विवेकानंद यांची थोडक्यात माहिती : Swami Vivekananda short biography in Marathi
स्वामी विवेकानंद मराठी माहिती |
परिचय :
स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे होते. त्यांना घरी नरेंद्र किंवा नरेन असे बोलले जायचे. विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरीदेवी तर वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त असे होते. पारंपारिक बंगाली कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आजोबा पार्शियन आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक होते. धार्मिक आणि शिक्षित वातावरण घरातच मिळाल्यामुळे नरेंद्र यांचे व्यक्तिमत्व फुलले.
बालपण :
नरेंद्र हे लहानपणापासूनच अभ्यासात अतिशय हुशार होते. अभ्यासाबरोबरच खेळातही ते नेहमी पुढे असायचे. गायन, वाद्य वादनाचे शिक्षण घेत असतानाच ते ध्यानधारणा ही करत असत.त्यांना देवाचे अस्तित्व, विविध प्रथा, जातीवाद याबद्दल नेहमीच कुतूहल असायचे. शिक्षण आणि दीक्षा नरेंद्र आठ वर्षाचे असताना त्यांना ईश्वरचंद्र विद्यासागर इन्स्टिट्यूट मध्ये दाखल करण्यात आले. 1879 मध्ये नरेंद्रची परीक्षा उत्तीर्ण केली आणि कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी एका वर्षानंतर ते कलकत्ता येथील स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला सुरुवात केली. याच कॉलेजमध्ये त्यांनी पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आणि युरोपीय देशांचा अभ्यास सखोल जाणून घेतला. नरेंद्र धर्म,इतिहास, तत्त्वज्ञान,सामाजिक विज्ञान,कला, हिंदू, धर्म, ग्रंथ, वेद, उपनिषदे,रामायण,महाभारत अशा वेगवेगळ्या साहित्यांचा अभ्यास करायचे. त्यांची बुद्धिमत्ता अतिशय तीक्ष्ण होती. अभ्यासासोबतच तेच दररोज व्यायाम शाळेत सुद्धा जात होते तिथे त्यांनी आपले शरीर मजबूत आणि सुदृढ बनवले.
मोठे झाल्यावर नरेंद्र ब्राह्मण समाजात जाऊ लागले त्या ठिकाणी जे वातावरण होते ते बघून त्यांना देवाविषयी प्रश्न उपस्थित होऊ लागले.'खरोखरच या जगात देव आहे का? आणि जर तो खरंच अस्तित्वात असेल तर कुठे भेटेल?' असे प्रश्न नरेंद्रांना सतावत होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पुढे ते रामकृष्ण परमहंस यांना भेटले. परमहंस यांना नरेंद्रने गुरु म्हणून स्वीकारले. परमेश्वर सर्वत्र आहे पण परमहंस यांनी नरेंद्रला दिली. त्यांनीच विवेकानंदांना हिंदुत्वाचा प्रसार करण्यासाठी आणि धार्मिक तत्त्वज्ञान सगळ्या जगाला सांगण्यासाठी निर्देशित केले. आपल्या गुरुच्या सांगण्यानुसार त्यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदुत्वाचा जगभर प्रसार करण्याचे ठरवले.
हिंदू हा असा धर्म आहे जो व्यापक,विशाल, सहिष्णु, सर्वसमावेशक आहे हे त्यांनी लोकांना पटवून दिले. स्वामी विवेकानंद यांच्या सहवासात लोकांना ते प्रत्यक्ष अनुभूती येऊ लागली. त्यांच्या व्याख्यानातल्या अनेक गोष्टी लोक आचरणात आणू लागले.
शिकागो येथील सर्वधर्म परिषद आणि जगभरात धर्मप्रसार
1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे सर्वधर्म परिषद झाली होती तिथे स्वामी विवेकानंद हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून गेले. यावेळी इथे भाषण करताना 'सभ्य स्त्री पुरुषहो' असे न संबोधता त्यांनी सर्वांना 'माझ्या प्रिय बंधू भगिनींनो' असे म्हणून उपस्थितांची मने जिंकली. या सभेत स्वामी विवेकानंदांनी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांची मने जिंकलीच पण सर्वांना हिंदू धर्माचे महात्म्य पटवून दिले. या सर्वधर्म परिषदेतील भाषण ऐकून सर्व लोक मंत्रमुक्त झाले. त्यांच्या या भाषणामुळे स्वामी विवेकानंद जगभर प्रसिद्ध झाले.
स्वामी विवेकानंद यांचे भारतभ्रमण | Swami Vivekanand Bharat Bhraman |
हिंदू धर्माचा आणि भारतीय संस्कृतीचा प्रचार आता संपूर्ण जगात झाला होता. अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेनंतर स्वामी विवेकानंद भारतात परतले आणि त्यांनी भारतभर फिरून भारतीय संस्कृती आणि हिंदुत्वाचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला.
आपल्या ज्ञानाने ते संपूर्ण भारतातील लोकांना जागृत करू लागले. यावेळी आजूबाजूच्या लोकांचे अज्ञान आणि दारिद्र्य बघून नरेंद्र खूप खूप दुःखी होत असत. भारतीय समाज निर्भीड आणि स्वावलंबी बनला पाहिजे असे त्यांना मनोमन वाटे. मानवाच्या सामाजिक स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणे जेवढे महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे आध्यात्मिक विकास करणे देखील गरजेचे आहे हे त्यांना समजले होते. त्यामुळे विवेकानंदांनी भारताच्या गौरवशाली युगाची पुनश्च एकदा स्थापना केली. संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा तेज मार्ग त्यांनी खुला केला. त्यामुळेच स्वामी विवेकानंद यांना 19 व्या शतकातील अध्यात्मक क्रांतीचे जनक असे म्हटले आहे.
राजाराम मोहन रॉय यांच्या प्रमुख समाजाच्या आकर्षण नरेंद्र ना नेहमीच वाटे. जातिभेद नष्ट करण्याचा त्यांचा संकल्प असेल किंवा स्त्री पुरुष समानता असेल, सामाजिक शब्दा आणण्याचा प्रयत्न असेल किंवा भूतदया असेल या सर्वांची अनामिक ओढ स्वामी विवेकानंद यांना होती. याचबरोबर रामकृष्ण परमहंस यांच्या बोध वाचण्यात भरलेला गूढ अर्थ नरेंद्र यांना नेहमीच दिसे. आपल्या गुरूंची शिकवण म्हणजेच भूतदया,ईश्वरसेवा, गरिबांची, मानव जातीची सेवा हे स्वामी विवेकानंद यांनी आपल्या आयुष्यभर आपल्या परीने केले.
स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू | Swami Vivekananda Death |
स्वामी विवेकानंद यांनी अत्यंत कमी वयात खूप महान कार्य केले. सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी खूप काम केले.वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी त्यांनी 4 जुलै 1902 रोजी रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी समाधी घेतली.भारतातील कन्याकुमारी येथे स्वामी विवेकांनंद यांचे स्मारक आहे.
मित्रांनो तुम्हाला स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल हा लेख कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा.
स्वामी विवेकानंद मराठी निबंध खाली दिलेल्या विषयांवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.
विश्व प्रसिद्ध स्वामी विवेकानंद.
भारतीय थोर पुरुष स्वामी विवेकानंद.
नरेंद्रनाथ दत्त मराठी निबंध.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला आणि जर आपल्याला कोणत्या इतर विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली कमेंट करुन सांगा
. धन्यवाद।
प्रश्न.१ स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते?
उत्तर- श्री रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते.
प्रश्न.२ स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी झाला?
उत्तर- स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ रोजी झाला.
प्रश्न.३ स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय?
उत्तर- स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त होते.
प्रश्न.४ स्वामी विवेकानंदांचा मृत्यू कधी झाला?
उत्तर- स्वामी विवेकानंदांचा मृत्यू ४ जुलै, १९०२ रोजी झाला.
0 टिप्पण्या