Makar Sankranti 2013 : यावर्षी मकर संक्रांत सर्वांसाठी आनंद घेऊन येईल, जाणून घ्या योग्य तिथी आणि पुण्यकाळ
Makar Sankranti date : सांग म्हटलं की नवीन आनंदा नवीन उत्साह आपल्यात संचारतो. विशेषत: नववर्ष सुरू झाले की आपल्याला वेध लागतात वर्षातील पहिल्या सणाचे म्हणजेच मकर संक्रांती चे. नवीन वर्षात येणारा हा पहिला पहिला सण सर्वांसाठीच खास असतो. यंदा मकर संक्रांति कधी आहे तिचा योग्य पुण्यकाळ, योग्य तिथी कोणती, शुभ वेळ, मुहूर्त,महत्व हे सर्व काही आपण आज या लेखातून जाणून घेऊयात.
![]() |
मकर संक्रांती तिथी आणि पुण्यकाळ |
मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे हा सण साजरा केला जातो. प्रत्येकाच्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रथा आहेत आणि अनेक नावे सुद्धा या सणाला दिलेली आहेत. काही ठिकाणी पतंग उडवून तर काही ठिकाणी तीळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेत तसेच एकमेकांना तिळगुळ वाटून संक्रांत साजरा केला जातो.
बऱ्याचदा संक्रमण 14 जानेवारीला असते परंतु यंदा तिथीनुसार संक्रांत 15 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार 2023 मध्ये मकर संक्रांत रविवारी म्हणजेच 15 जानेवारी 2023 रोजी साजरी केली जाईल.
ग्रहांच्या स्थितीनुसार 14 जानेवारी रोजी रात्री आठ वाजून 21 मिनिटांनी सूर्य धनु रास सोडून मकर राशीत प्रवेश करेल आणि मकर संक्रांत प्रारंभ होईल. 15 जानेवारी 2023 रोजी उदय स्थितीनुसार मकर संक्रांत सर्वत्र साजरी केली जाईल. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्ग्य देण्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याच दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ घालण्याची पद्धत रूढ आहे तसेच तीन आणि गुळ दान करण्याची देखील परंपरा आहे.
यावेळेस संक्रांत पुण्यकाळ मुहूर्त सकाळी 7 वाजून 15 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 30 मिनिटांपर्यंत आहे. संक्रांतीचा एकूण कालावधी पाच तास 14 मिनिटे असून महापुण्यकाळ मुहूर्त 7 वाजून 15 मिनिटे ते 9 वाजून 15 मिनिटांपर्यंत असेल. महापुण्यकाळ कालावधी एकूण 2 तासांचा असणार आहे.
हेही वाचा :
मकर संक्रांती का साजरी करतात ?
0 टिप्पण्या