Republic Day Speech in Marathi: 

यंदा 2023 या वर्षी भारत 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. आपल्याला माहीतच आहे की, भारताला अथक प्रयत्नांनंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले परंतू १९५० पर्यंत स्वत:चे संविधान नव्हते. २६ जानेवारी १९५० या दिवशी भारताचे संविधान लागू झाले. २६ जानेवारी ला भारतीय प्रजात्ताक साजरा केला जातो. हा राष्ट्रीय कार्यक्रम साजरा करण्यासाठी देशभरातील सर्व शाळा आणि महाविद्यालये जय्यत तयारी करतात. विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात, भाषण दिले जातात.आज आपण प्रजासत्ताक दिन भाषण मराठी बघणार आहोत.


प्रजासत्ताक दिन भाषण 

उत्सव तीन रंगांचा,

आभाळी सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांना,

ज्यांनी भारत देश घडवला.

आदरणीय व्यासपीठ,व्यासपीठावरील प्रमुख अतिथी,आजच्या कार्यकमाचे माननीय अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो…भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या सर्व वीरांनी, महापूरुषांनी बलिदान दिले त्यांना वंदन करुन मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो / करते.

आज प्रजासत्ताक दिन. हा आपल्या भारताचा राष्ट्रीय सण आहे. प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारत वर्षात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, परंतु हा सण साजरा केला जातो ते आज आपण बघूया.

मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर भारताला आपल्या राज्य कारभार सुरळीत चालवण्यासाठी सगळ्यात जास्त गरज होती ती भारतीय संविधानाची. देशाचा राज्यकारभार सुरळीत चालावा, एक सार्वभौम राज्य निर्माण व्हावे आणि सर्वांना समान अधिकार असावे यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती व्हावी असे सर्वांना वाटत होते.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा समिती स्थापन करण्यात आली. या मसुदा समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अखंड परिश्रम करून एक सार्वभौम संविधान तयार केले. या संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले.

26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान अंमलात आणले. या दिवशी भारत एक स्वतंत्र प्रजासत्ताक आणि सार्वभौम देश बनला.भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे हस्तलिखित संविधान आहे. या संविधानाने आपल्याला सर्व हक्क दिले आहेत त्याचबरोबर काही कर्तव्य सुद्धा दिलेली आहेत.

भारतीय प्रजासत्ताक दिन विविध शाळा कॉलेज तसेच कार्यालयांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच भाषणे, देशभक्तीपर गीते यांचा वेगळाच उत्साह असतो. भारतीय राष्ट्रध्वज अभिमानाने छातीवर लावून प्रभात फेरी काढली जाते. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते.


भारत हा एक लोकशाही देश आहे जिथे लोकांना देशाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांचा नेता निवडण्याचा अधिकार आहे. डॉ राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. 1947 मध्ये ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या देशाने खूप विकास केला आहे आणि त्याची गणना सर्वात शक्तिशाली देशांमध्ये केली जाते.

भारताचे संविधानाने भारताला एक लोकशाही राष्ट्र बनवले आहे ज्यात लोकांना स्वतःचा नेतृत्व करण्यासाठी नेता निवडून देण्याची अनुमती असते. ब्रिटिश राजवटी पासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पण या उल्लेखनीय कामगिरी बरोबरच आपल्या भारत देशात काही उनिवाही तयार झालेले आहेत जसे की बेरोजगारी, भ्रष्टाचार, गरिबी, विषमता इत्यादी. जर आपल्या भारत देशाला जगातील सर्वोत्तम देश बनवायचा असेल तर समाजातील या समस्या सोडवणे खूप महत्त्वाचे आहेत. या समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवत आहे.

जय हिंद जय भारत