ऋतुराज गायकवाड बायोग्राफी मराठी



ऋतुराज गायकवाड बायोग्राफी मराठी


नमस्कार, क्रिकेट हा प्रत्येक भारतीय चा अगदी आवडता खेळ आहे. आवडता खेळ म्हटलं की आवडता खेळाडू येणारच. आज आपण भारतीय क्रिकेटमधील अशाच एका प्रतिभावान खेळाडूची माहिती बघणार आहोत. तो खेळाडू म्हणजे ऋतुराज गायकवाड. महाराष्ट्रातील पुणे येथे जन्मलेल्या प्रतिभावान खेळाडूची माहिती बघूया.




ऋतुराज गायकवाड बायोग्राफी मराठी







बालपण आणि शिक्षण : ऋतुराज गायकवाड हे एक प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू असून ते मूळचे महाराष्ट्रतील आहेत. त्यांचा जन्म 31 जानेवारी 1997 रोजी महाराष्ट्रातील पुणे शहरात झाला. त्यांच्या आई सविता गायकवाड या शिक्षिका असून वडील दशरथ गायकवाड हे संरक्षण संशोधन विकास अधिकारी आहेत. त्यांची प्राथमिक शिक्षण पुण्यातील सेंट जोसेफ शाळेत झाले तर महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयातून झाले.

करियर :

वयाच्या तेराव्या वर्षी ऋतुराज यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. ऑक्टोबर 2016 मध्ये रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राच्या बाजूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

पुढे फेब्रुवारी 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय  20-20 स्पर्धेत महाराष्ट्राकडून पदार्पण केले.

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत ते भारत अ, भारत ब, महाराष्ट्र, इंडिया ब्लू, आणि भारत अंडर 23 कडून खेळले आहेत. 

जून 2021 मध्ये ऋतुराज यांना भारताच्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय आणि ट्वेंटी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले.

डिसेंबर 2021 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी एक दिवसीय संघात स्थान देण्यात आले तर जानेवारी 2022 मध्ये भारताच्या एक दिवसीय संघात स्थान देण्यात आले.इंडियन प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्स संघासोबत खेळून चांगली कामगिरी केली.



ऋतुराज गायकवाड बायोग्राफी मराठी, ऋतुराज गायकवाड माहिती आवडल्यास नक्की कमेन्ट करून कळवा.

ऋतुराज गायकवाड  pdf ,ऋतुराज गायकवाड मराठी माहिती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या