संत तुकाराम मराठी माहिती

संत तुकाराम मराठी माहिती || Sant Tukaram Marathi Mahiti 


महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. इथे अनेक संत होऊन गेले त्यांचे कार्य खरोखर खूप महान आहे.संतांनी आपल्या समाजातील अनेक व प्रथा बंद करण्यासाठी खूप महत्त्वाचे कार्य बजावले आहे. आज आपण अशाच एका थोडं संतांबद्दल माहिती बघणार आहोत ते म्हणजे संत तुकाराम.


संत तुकाराम मराठी माहिती || Sant Tukaram Marathi Mahiti 


जन्म : 

संत तुकाराम महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेल्या देहू या छोट्याशा गावामध्ये सन 1608 मध्ये झाला. त्यांचे मूळ नाव तुकाराम आंबिले असे आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना संत तुकाराम या नावाने ओळखले जाते. वडिलांचे नाव बोल्होबा तर आईचे नाव कनकाई असे होते. आठवड्यांपासून विठ्ठलाचे उपासना त्यांच्या घरात परंपरेने चालत आली होती आणि संत तुकारामांनी ही त्यात खंड पडू दिला नाही.

तुकारामांचे बालपण अगदी सुखात गेले घरात नेहमी कीर्तन भजन चालू असे, नकळत विठ्ठल भक्तीचे संस्कार तुकारामांवर पडत होते. तुकारामांचे कुटुंब कुणबी समाजाचे होते. पारंपारिक शेती आणि किरकोळ पैसे उधार देण्याचा त्यांचा व्यवसाय होता.


आयुष्यातील कठीण काळ : 

किशोर वयात असताना तुकोबांच्या आई वडीलांचे निधन झाले. तसेच दुष्काळात त्यांची पत्नी रखमाबाई व मुलगा मरण पावले. धंद्यात मंदी आली. संसार चालवण्यासाठी सुरू केलेले दुकानही पुढे बंद पडले सावकाराने घरातल्या सगळ्या वस्तू विकल्या. संपूर्ण घरावर दुःखाची छटा पसरली. या सगळ्याचा संत तुकारामांवर मोठा परिणाम झाला.

संत तुकाराम विठ्ठल भक्ती कडे ओढले गेले. त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. पांडुरंगा शिवाय आता आपले कोणीही नाही यावर त्यांचे मन ठाम झाले. आपल्या सगळा वेळ ते ईश्वर भक्ती घालवू लागले. अलिप्त राहू लागले.

विठ्ठल मंदिराची झालेली पडझड त्यांनी दुरुस्त केली आणि त्या ठिकाणी ते कीर्तन करू लागले. ते स्वतः अभंग रचना करू लागले आणि स्वतःचे अभंग कीर्तनात गाऊ लागले. भागवत संप्रदायाची तत्वज्ञान सर्वांना सोप्या सुलभ आणि स्पष्ट भाषेत ते सांगू लागले त्यामुळे जनमानसे त्यांच्याकडे आकर्षित झाली. त्यांच्या भोवती सगळे गोळा होऊन त्यांच्या सोबत विठ्ठल भक्ती दंग होऊ लागले.

सामाजिक कार्य : 

सर्वसामान्य लोकांची वैचारिक मानसिकता बदलून अधोगती थांबवणे हे महत्त्वाचे कार्य संत तुकारामांनी आपल्या कीर्तनातून केले आहे. त्यांच्या अभंगात ईश्वर भक्तीचे गोडवे असायचे याचबरोबर समाजप्रबोधनाची मुहूर्तमेढ देखील आपल्या अभंगातून त्यांनी रोवली. सतराव्या शतकात समाजात असलेल्या अंधश्रद्धा दूर करण्याचे आणि लोकांना योग्य दिशा दाखवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य तुकाराम महाराजांनी केले.

समाजातील ढोंगीपणा त्यांनी उघड केला आणि खरा धर्म काय आहे माणसाचे हित कशात असते हे वेळोवेळी लोकांना समजावून सांगितले. त्यांची वाणी कधी मधाळ असायची तर कधी कठोर झालेली असायची. सिद्धी, चमत्कार, गंडेदोरे या सगळ्याविषयी करमटपणा त्यांना अजिबात मान्य नव्हता. 

संत तुकारामांना लोक जगद्गुरु म्हणून ओळखू लागले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज देखील संत तुकाराम महाराजांना गुरु मानत. आत्मिक सुखापेक्षा तुकोबांनी जनकल्याणाकडे नेहमी लक्ष दिले. अशा या महान समाज प्रबोधनकार कवी आणि विठ्ठल भक्त संत तुकाराम यांचे फाल्गुन वद्य द्वितीयेला वैकुंठ गमन झाले असे मानले जाते. हा दिवस 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो.


संत तुकाराम महाराजांचा जन्म कधी झाला ?

22 जानेवारी 1608

तुकाराम बीज म्हणून कोणता दिवस ओळखला जातो ?

फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन झाले असे मानले जाते हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो.

संत तुकाराम महाराजांचे गाव कोणते ?

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील देहू हे संत तुकाराम महाराजांचे गाव आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या