Good Friday 2023 गुड फ्रायडे मराठी माहिती, महत्त्व, इतिहास

 गुड फ्रायडे : 

गुड फ्रायडे हा ख्रिश्चन् मध्ये याचा एक मुख्य सण आहे. सर्व ख्रिश्चन धर्म लोक हा एक काळा दिवस म्हणून साजरा करतात. ख्रिस्ती धर्मातील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे गुड फ्रायडे ज्याला काळा शुक्रवार, पवित्र शुक्रवार देखील म्हटले जाते. ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांसाठी हा दिवस खूप खास असतो. आज आपण गुड फ्रायडे या ख्रिश्चन बांधवांच्या महत्त्वाच्या सणाबद्दल माहिती बघणार आहोत.

what is good friday

बायबल नुसार या दिवशी येशू ख्रिस्तांना क्रॉस वर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्रिस्ती धार्मिक लोकांमध्ये हा दिवस शोक दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. काही ठिकाणी तर राष्ट्रीय दुखवट्याप्रमाणे हा दिवस साजरा केला जातो.

जागतिक स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने गुड फ्रायडे साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवशी कोणत्याही चर्चमध्ये घंटानाद केला जात नाही. लाकडी काठीने केवळ छोटा आवाज केला जातो. या दिवशी ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात.

गुड फ्रायडे या सणाला ब्लॅक फ्रायडे किंवा ग्रेट फ्रायडे असे देखील म्हणतात.

आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असा समज असतो की, गुड फ्रायडे या दिवशी सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयांना सुट्टी असते म्हणजे हा ख्रिश्चन धर्मातील लोकांचा एक आनंदाचा सण असेल परंतु असे नाही. हा आनंदाचा दिवस नसून दुःखाचा दिवस आहे.

गुड फ्रायडे याला ब्लॅक फ्रायडे असे म्हणतात कारण या दिवशी बायबलनुसार भगवान येश ुुख्रिस्त यांना क्रॉस वर चढवण्यात आले होते . त्यामुळे गुड फ्रायडे हा दिवस एक दुःखाचा दिवस म्हणून ख्रिश्चन बांधव पाळतात. या दिवशी ख्रिश्चन धर्मातील लोकांकडून एक दुखवटा तसेच शोक व्यक्त केला जातो. अनेक ख्रिस्ती पारंपारिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय दुखवटा म्हणून देखील पाळला जातो. ख्रिश्चन धर्मातील लोक कुठलाही आनंदाचा कार्यक्रम या दिवशी साजरा करत नाही. या उलट सर्व ख्रिस्ती चर्चमध्ये जाऊन भगवान इशू यांच्या बलिदानाकरिता कृतज्ञता तसेच आभार व्यक्त करतात.


गुड फ्रायडे या दिवसाच्या निमित्ताने अनेक ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. याचबरोबर भगवान येशूच्या स्मरणार्थ काही देशांमध्ये उपवास केला जातो आणि उपवासानंतर गोड भाकरी देखील खाल्ली जाते. दरवर्षी इस्टर संदेशा आधी येणाऱ्या शुक्रवारी गुड फ्रायडे हा ख्रिश्चन धर्मियांचा सर्वात महत्त्वाचा सण केला जातो. हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे साजरा करण्याची प्रथा आहे. किशन या धर्मावर मनापासून विश्वास ठेवणारे लोक गुड फ्रायडे साजरा करतात कारण या दिवशी प्रेम आणि शांतीचा मसीहा भगवान येशू ख्रिस्त यांना वरस्तंबावर खिळवले गेले होते.

संपूर्ण जगाला करुणा आणि प्रेम यांचा संदेश देणाऱ्या प्रभू येशूला त्यावेळच्या धर्मांधूनच्या कार्यकर्त्यांकडे तक्रार केल्यानंतर वधस्तंभावर लटकवले होते, मात्र या घटनेनंतर बरोबर तीन दिवसांनी प्रभू येशू यांचे पुनरुत्थान झाल्याचे सांगितले जाते. याच्या स्मरणार्थ अनेक क्वेश्चन लोक या दिवशी चर्चमध्ये जाऊन विशेष प्रार्थना करण्यावर भर देतात. या दिवशी चर्चमध्ये घंटा वाजवली जात नाही तर लाकडी काठीने आवाज केला जातो. लोक चर्चमध्ये क्रॉस चे चुंबन घेऊन येशू ख्रिस्ताचे स्मरण देखील करतात.

अनेक लोक भगवान इशू यांनी सांगितल्याप्रमाणे सत्य विश्वास आणि प्रेमाच्या मार्गावर चालण्याची शपथ घेतात तसेच प्रभू येशूच्या बलिदान दिनाचा दुखवटा पाळतात. गुड फ्रायडे च्या दिवशी अनेक परोपकाराची कामे देखील केली जातात.

ईस्टर संडे

असे म्हटले जाते की गुड फ्रायडे च्या दिवशी भगवान येशू यांना क्रॉसवर चढवण्यात आले. मात्र यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी भगवान येशू यांनी गाढवावर बसून जेरुसलेममध्ये प्रवेश केला होता आणि लोकांनी पामच्या फांद्या देऊन त्यांचे आगमनाचे स्वागत केले होते त्यामुळे या दिवसाला पाम संडे असे देखील म्हणतात.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या