मॉनिटर म्हणजे काय?  | Monitor Information In marathi

आजच्या आधुनिक युगात कोणतेही काम करायचे असेल तर आपण संगणक वापरतो. संगणकाशिवाय कोणतेही काम करणे म्हणजे आता आपल्या कल्पनेबाहेर आहे. प्रत्येक कामाच्या ठिकाणी प्रत्येक वेळी आपल्याला संगणकाचीच गरज पडते. संगणक या विषयावर आपण सविस्तर माहिती आधी जाणून घेतलेली आहे. त्यामुळे आपल्याला संगणकातील विविध भागांची माहिती आहेच. आज आपण संगणकातील असाच एक महत्त्वाचा घटक म्हणजेच मॉनिटर याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. 

मॉनिटर म्हणजे काय? | Monitor meaning in marathi


मॉनिटर म्हणजे काय? Monitor meaning in Marathi

मॉनिटर हा संगणकातील एक अतिशय महत्त्वाचा घटक असून त्याला आपण संगणकाचा चेहरा म्हणून देखील ओळखू शकतो. हार्डवेअर प्रकारात मोडणाऱ्या या घटका मार्फत आपण आउटपुट घेऊ शकतो. म्हणजेच मॉनिटर हे एक प्रकारच्या आऊटपुट डिव्हाईस असून या मार्फत आपण संगणकामध्ये जे काम करतो ते आपल्याला टीव्ही सारख्या स्क्रीनवर दिसते.

सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि युजर या दोघांमध्ये इंटरफेस म्हणून मॉनिटर काम करतो. या साखळीमध्ये युजर इनपुट देतो, सीपीयू त्याच्यावर काम करतो आणि मॉनिटर आपल्याला किंवा युजरला त्याचे आउटपुट दाखवतो. संगणकाच्या भाषेत सांगायचे झाले तर मॉनिटरला व्हिज्युअल डिस्प्ले युनिट VDI (Visual Display Unit) असे म्हटले जाते. User experience वर प्रभाव पाडणारा महत्त्वपूर्ण घटक हा आपण वापरत असलेल्या मॉनिटरचे उच्च ग्राफिक्स क्वालिटी असा आहे. 

तंत्रज्ञान विकसित होण्यापूर्वी जेव्हा LDC किंवा LED स्क्रीन चा शोध लागला नव्हता तेव्हा मॉनिटरची डिस्प्ले क्वालिटी ही खूप कमी दर्जाची होती. परंतु जसजसे तंत्रज्ञान प्रगत झाले तसतसे LCD आणि LED स्क्रीन बाजारात उपलब्ध झाले आणि यात ग्राफिक्स क्वालिटी सुद्धा सुधारत केली.

मॉनिटर चे कार्य | monitor function in Marathi

युजर जेव्हा माऊस आणि कीबोर्ड यांच्या सहाय्याने संगणकावर काही काम करतो आणि सीपीयू जेव्हा ते प्रोसेस करतो त्या कामाचे प्रत्यक्ष आऊटपुट आपल्याला मॉनिटरच्या स्क्रीनवर बघायला मिळते. स्क्रीनवर दिसणारे आउटपुट जर आपल्याला अपेक्षित नसेल तर आपण त्यात आपल्या आवश्यकतेनुसार बदल करून तशा सूचना पुन्हा देऊ शकतो. संगणकामध्ये केलेले काम आपल्याला मॉनिटरवर सॉफ्टकॉपीच्या स्वरूपात पाहायला मिळते.

मॉनिटर बद्दल माहिती | monitor in Marathi

  • मॉनिटर हनी सीपीयू या दोन्ही हार्ड डिव्हाइसेस ला जोडण्याचे काम केबल करते.
  • आपल्याला हवे असलेले आउटपुट चित्र दस्तऐवज आणि व्हिडिओ यांच्या स्वरूपात मॉनिटर स्क्रीनवर दाखवण्यासाठी मॉनिटर मध्ये ग्राफिक्स कार्डचा वापर केला जातो.
  • ग्राफिक्स कार्ड मॉनिटरला सिग्नल देण्याचे काम करते.
  • मॉनिटर वर उच्च दर्जाचे ग्राफिक्स बघण्यासाठी उच्च प्रतीच्या ग्राफिक्स कार्ड ची आवश्यकता असते.

आधुनिक काळातील तंत्रज्ञान विकसित होण्यापूर्वी पूर्वीच्या काळी मॉनिटरचे मोठमोठे डबे असायचे. त्यावेळी कॅथोड रे ट्युब (CRT) च्या सहाय्याने मोठ मोठ्या मॉनिटरच्या स्क्रीन बनवल्या जात असत. या स्क्रीनचा आकार खूप मोठा आणि त्या वजनाने खूप जड असत. तसेच या डब्यांना हीच पुरवठा देखील खूप मोठ्या प्रमाणात लागत असेल त्यामुळे विजेचे बिल खूप जास्त येई. 

हे सगळे तोटे कमी करण्यासाठी एलसीडी आणि एलईडी स्क्रीन बाजारात आल्या. पूर्वीच्या मोठ्या मॉनिटरच्या तुलनेत आजचा एलसीडी किंवा एलईडी स्क्रीन चा आकार कमी आहे. तसेच त्या वजनाने हलक्या असून अत्यंत पातळ आहेत. त्यांना लागणारा वीज पुरवठा देखील कमी असतो त्यामुळे विजेचे बिल कमी येते. 

मॉनिटर चा इतिहास | history of monitor in Marathi

आपण आज संगणक डोळ्यासमोर बघतो तो संगणक पूर्वी असा नव्हता. संगणकाचा शोध लागला तेव्हा त्याचे चित्र काहीतरी वेगळे होते. महत्त्वाची बाब अशी की मॉनिटर चा शोध लागण्यापूर्वी सुद्धा संगणक अस्तित्वात होते. संगणकच्या वापरायला सुरुवात झाल्यानंतर इनपुट आउटपुट दोन्ही सूचना मिळवण्यासाठी पंच कार्डचा वापर केला जात असे. आता सारख्या मॉनिटर स्किन चा वापर केव्हा केला जात नसे. 

सर्वप्रथम कॅथोड रे टयुब चा शोध लागला आणि त्यानंतर सीआरटी मॉनिटर स्क्रीन बनवण्यास सुरुवात झाली. मॉनिटर ची स्क्रीन सुरुवातीला सर्व बाजूने बंद असलेल्या एखाद्या डब्याप्रमाणे दिसत असे. या स्क्रीनच्या तंत्रज्ञानात इलेक्ट्रॉनचा वापर प्रकाश निर्माण करण्यासाठी केला गेला. आणि मॉनिटर स्क्रीनवर इलेक्ट्रॉनच्या सहाय्याने प्रकाश दिसण्यास सुरुवात झाली. त्यावेळचे मॉनिटर रंगहीन होते परंतु कालांतराने सीआरटी मॉनिटर स्क्रीन मध्ये रंगांचा वापर करण्यात आला. 


नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

मॉनिटर चे प्रकार कोणते? Types of monitor in Marathi

  • कॅथोड रे ट्युब
  • लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले
  • लाईट इमीटिंग डायोड
  • ऑरगॅनिक लाईट इमीटिंग डायोड मॉनिटर
  • प्लाजमा मॉनिटर


मॉनिटर कोणते उपकरण आहे?

मॉनिटर हे एक आउटपुट डिवाइस किंवा उपकरण आहे. 


मॉनिटर चे कार्य काय आहे? 

माऊस किंवा कीबोर्डच्या सहाय्याने संगणकाला दिलेले इनपुट जेव्हा सीपीयू प्रोसेस करतो त्याचे आलेले आऊट मॉनिटर स्क्रीनवर देण्याचे काम मॉनिटर करतो. 


निष्कर्ष |  मॉनिटर बद्दल संपूर्ण माहिती

आजच्या या लेखामध्ये आपण संगणकातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे मॉनिटर बद्दल संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न केला. तरी जर तुम्हाला या माहितीमध्ये काही समस्या असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचप्रमाणे जर मॉनिटर बद्दल हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना तसेच विविध शिष्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नक्की शेअर करा.