1 May Maharashtra din : 1 मे महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा होतो?

1 May Maharashtra din : दरवर्षी 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 

1 May Maharashtra din : 1 मे महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा होतो?


1 मे महाराष्ट्र दिन इतिहास 

21 नोव्हेंबर 1956 रोजी राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे फ्लोरा फाउंटन च्या परिसरात तणावाचे वातावरण होते. अनेक मराठी माणसे खूप चिडलेली होती. छोट्या मोठ्या सभांमधून सर्वत्र या निर्णयाचा निषेध करत होती. याच कारणामुळे कामगारांचा एक विशाल काय मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन समोरील चौकात येण्याचे नियोजित झाले होते. 

त्यानंतर चर्चगेट स्थानकाकडून एका बाजूने तर बोरीवंदर करून दुसऱ्या बाजूने गगनभेदी घोषणा देत एक प्रचंड मोठा जनसमुदाय फ्लोरा फाउंटेन कडे जमला. पोलिसांनी आपली ताकद लावून हा मोर्चा उडवून देण्यासाठी लाठी चार्ज केला. मात्र मोर्चात अनेक आढळ  सत्याग्रही होते त्यामुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले. मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. यानंतर झालेल्या गोळीबारात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलनकर्त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. 

हुतात्म्यांनी दिलेल्या या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने त्यांचे धोरण मागे घेतले आणि नमते होऊन 1 मे 1960 रोजी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्याचा आदेश काढला. याच जागी 1965 मध्ये हुतात्मा स्मारकाची स्थापना करण्यात आली.

महाराष्ट्रात मुंबई कशी समाविष्ट झाली?

15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला परंतु आता सारखे सर्व राज्यांची सीमा निश्चित नव्हती. राज्य विक्री केली होती. भारताचा राज्यकारभार चालवण्यासाठी राज्यव्यवस्था स्थापन करण्याची गरज होती. 

ही राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी भारत सरकारने 1956 मध्ये राज्य पुनर्घटन अधिनियम आणला. या अधिनियमानुसार भाषेच्या आधारे राज्यांच्या सीमा निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार आज आपल्या भारत देशात 28 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. परंतु त्यावेळी महाराष्ट्राचा विकास झाला त्यावेळी मुंबईचा विचार केल्यास मराठी गुजराती कच्ची आणि कोकणी अशा भाषेच्या गटांमुळे महाराष्ट्र राज्यामध्ये विसंगती तयार झाली. महाराष्ट्रातील मुंबई गुजराती तसेच मराठी अशा दोन भाषांमध्ये संघर्ष करत होती. त्यामुळे मुंबईला या दोन राज्यांमध्ये विभागण्यासाठी एक सर्वात सुरू झाली आणि या चळवळीमध्ये दोन प्रामुख्याने भाषिक लोकांचा समावेश होता त्यामध्ये एक गुजराती आणि कच्छी बोलणारे लोक तर दुसरा गट म्हणजे कोकणी आणि मराठी भाषा बोलणारे लोक. 

याचाच परिणाम म्हणून 25 एप्रिल 1960 रोजी संसदेमार्फत बॉम्बे पुनर्घटन अधिनियम 1960 अस्तित्वात आणला गेला. या कायद्यानुसार महाराष्ट्र आणि गुजरात असे दोन वेगवेगळे राज्ये निर्माण करण्यात आले आणि महाराष्ट्राला मुंबई मिळाली.

महाराष्ट्र दिन कसा साजरा केला जातो? 

दरवर्षी एक मे रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शाळा, निम शाळा, कॉलेजेस आणि कार्यालयांना सुट्टी असते. लोक एकत्र येऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठे उत्साहाने हा दिवस साजरा करतात. 

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दादर येथील शिवाजी पार्क येथे परेड आयोजित केल्या जातात. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यादी वनाच्या निमित्ताने भाषण देऊन महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करत असतात.