शेअर मार्केट म्हणजे काय मराठी माहिती । Share Market Information in Marathi

शेअर मार्केट म्हणजे काय मराठी माहिती  | Share market information in marathi :

भारतीय शेअर बाजार हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग आहे. देशातील अनेक उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी लागणारा पैसा जमवण्याकरिता कंपन्या शेअर बाजारात आपल्या कंपनीचे नाव नोंदवतात. आज आपण या लेखात शेअर मार्केट म्हणजे काय मराठी माहिती आणि share market information in marathi याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. यासोबतच तुम्ही सुद्धा कश्या प्रकारे शेअर बाजारात गुंतवणूक करू शकता हे देखील बघणार आहोत.

शेअर मार्केट म्हणजे काय मराठी माहिती | Share Market Information in Marathi


शेअर मार्केट म्हणजे काय मराठी माहिती | Share Market Information in Marathi

Share market information in Marathi : शेअर या शब्दाचा मराठी अर्थ भाग असा होतो म्हणजेच जर आपण एखादा शेअर विकत घेतो म्हणजेच आपण त्या कंपनीच काही भाग विकत घेतो. या व्यवहारात गुंतवणुकदार काही पैसे कंपनी ला देतो आणि कंपनी त्या बदल्यात काही शेअर म्हणजेच कंपनीची काही हिस्सेदारी त्याला देते.

जर एखाद्या कंपनीचे 100 शेअर आहेत आणि तुम्ही त्यातील पाच शेअर विकत घेतले तर तुमची त्या कंपनीत पाच टक्के हिस्सेदारी होते. जर कंपनीला भविष्यात चांगला फायदा झाला तर तुम्हाला नवीन शेअरच्या भावानुसार तुमचे शेअर विकता येतात आणि झालेला नफा तुमच्या खात्यावर जमा होतो.

शेअर मार्केटच्या मदतीने अतिसामान्य माणूस सुद्धा चांगल्या आणि मोठ्या कंपन्यांमध्ये स्वतःची हिस्सेदारी मिळवू शकतो. परंतु मार्केटमध्ये व्यवस्थित अभ्यास करून योग्य ठिकाणी पैसे गुंतवणे गरजेचे असते. मार्केटचे पुरेशी माहिती नसताना अयोग्य ठिकाणी अयोग्य वेळी पैसे गुंतवणे नुकसानीचे ठरू शकते. त्यामुळे या क्षेत्रात उतरताना नवीन लोकांना नेहमीच गुंतवणुकीमध्ये आर्थिक असा सल्ला दिला जातो. इंट्राडे ट्रेडिंग किंवा रोजच्या रोज मार्केट मधून पैसे काढणे या प्रकारापेक्षा लॉन्ग टर्म ट्रेडिंग कधीही फायदा करते.

शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी | How to invest in share market marathi

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. या प्रकारांमध्ये वेगवेगळे कालावधी दिलेली असतात त्यानुसार आपण आपली गुंतवणूक करू शकतो. आपल्याला जर गुंतवणूक एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये आणि खात्रीचे रिटर्न देणारी हवी असेल तर लॉन्ग टर्म ट्रेडिंग म्हणजे जास्त कालावधीची गुंतवणूक कधीही चांगली.

शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी काही प्रसिद्ध वेबसाईट आहेत त्या खालील प्रमाणे.

या लिंक शिवाय शेअर बाजारात गुंतवणुकीचे विविध मोबाईल ॲप देखील आता उपलब्ध आहेत. भारतीय बाजारात Zerodha, Grow, Upstox यासारखे वेगवेगळ्या एप्लीकेशन आहेत ज्याद्वारे तुम्ही ऑनलाईन घरी बसल्या ट्रेडिंग करू शकता. या सर्व ॲप मधून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने शेअर खरेदी किंवा विक्री करू शकता. तुम्ही घेतलेल्या शेअर चा परफॉर्मन्स देखील तुम्ही इथे ट्रॅक करू शकता.

शेअर मार्केट विषयी माहिती - Share market basic information in marathi

भारतीय शेअर बाजारात प्रामुख्याने दोन स्टॉक एक्सचेंज मध्ये ट्रेडिंग केली जाते. 

  • Bombay stock exchange

BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा सेन्सेक्स इंडेक्स आहे त्यात 30 कंपन्या असतात.

  • National stock exchange

NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हा निफ्टी चा इंडेक्स असतो ज्यात 50 कंपन्या समाविष्ट असतात.

निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन इंडेक्स मधून आपण अगदी सहजपणे टॉप 30 किंवा टॉप 50 कंपन्या निवडू शकतो. त्यांचे परफॉर्मन्स रिपोर्ट, प्रॉफिट रिपोर्ट सहजपणे अनेक वेबसाईटवर आपल्याला बघायला मिळतात. जर कंपनी चांगले काम करत असेल तर त्याचा सरळ प्रभाव आपण शेअरच्या किंमतीवर बघू शकतो आणि अशी कंपनी आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी नेहमीच योग्य असते.

ब्रोकर म्हणजे काय?

भारतीय शेअर मार्केट मध्ये आपण डायरेक्ट ग्राहक ते कंपनी म्हणजेच customer to company असा व्यवहार करत नाही. हे सर्व व्यवहार ब्रोकर म्हणजेच शेअर खरेदी विक्री करणारा दलाल याच्या मार्फत होतात. जर आपल्याला एखादा शेअर विकत घ्यायचा असेल तर त्याआधी आपल्याला ब्रोकरची आवश्यकता असते. 

आपण जेव्हा एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करतो किंवा विकतो तेव्हा या व्यवहारात दरम्यान हा ब्रोकर त्याची कमिशन काढून घेऊन कोणत्याही कंपनी किंवा व्यक्तीचे शेअर खरेदी किंवा विक्री करण्याचे काम करतो. शेअर बाजारात लवकर स्टॉक एक्सचेंज सदस्य कार्यरत असतात आणि त्यांच्याशी संपर्क करून आपण स्टॉक खरेदी किंवा विक्री करू शकतो.

पूर्वी या सर्व कार्यवाहीला पेपरवर्क असायचे परंतु आता ऑनलाइन च्या जगात तुम्ही घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या सहाय्याने अगदी सोप्या पद्धतीने स्टॉकची देवाणघेवाण करू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. वेगवेगळे मोबाईल ॲप्लिकेशन आणि वेबसाईटचा वापर करून तुम्ही घरबसल्याच तुमची ट्रेडिंग सुरू करू शकतात. यातील खूप एप्लीकेशन सुरुवातीला कोणताही ब्रोकरे चार्ज न घेता तुम्हाला इन्वेस्ट करण्याची सुविधा पुरवतात.

 share market information in marathi या लेखामध्ये आता आपण शेअर बाजार ट्रेडिंग चे प्रकार बघूयात.

शेअर बाजार ट्रेडिंग चे प्रकार - Types of trading in share market marathi

शेअर मार्केट इन्फॉर्मशन इन मराठी | share market information in Marathi या लेखामध्ये आता आपण शेअर बाजाराचे वेगवेगळे प्रकार कोणते आणि ते कशा नुसार केले जातात याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

1. इंट्रा डे ट्रेडिंग

ज्या दिवशी आपण शेअर विकत घेऊन त्याच दिवशी दुपारी मार्केट बंद होण्यापूर्वी ते शेअर विकून जो काही फायदा किंवा तोटा आपल्याला झाला आहे तो आपल्या खात्यात समाविष्ट करून घेणे या प्रकारच्या ट्रेडिंगला इंट्राडे ट्रेडिंग असे म्हणतात. या प्रकारचे ट्रेडिंग करण्यासाठी खूप अभ्यासाची गरज असते. एक्सपर्ट लोक यामध्ये चांगला नफा कमवू शकतात परंतु जर तुम्ही नवीन असाल आणि तुमची आत्ताच ट्रेडिंग journey सुरू झाली असेल तर हा प्रकार तुमच्यासाठी नाही.

    2. स्कॅल्पर ट्रेडिंग 

या प्रकारच्या ट्रेनिंग मध्ये शेअर विकत घेतल्यानंतर पाच ते दहा मिनिटाच्या आत ते विकून टाकले जातात आणि आपल्याला झालेला नफा किंवा तोटा मान्य केला जातो. हा प्रकार सर्वात जखमीचा ट्रेडिंग प्रकार मानला जातो. एखाद्या शेअर मध्ये काही बातमी असेल तर त्याची किंमत जास्त वेळा कमी जास्त होत असते, अशा शेअरमध्ये स्कॅल्पिंग ट्रेडिंग जास्त प्रमाणात चालते.
 

   3. स्विंग ट्रेडिंग

या ट्रेडिंगच्या प्रकाराला शॉर्ट टर्म ट्रेडिंग देखील म्हटले जाते. शेअर विकत घेतल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी त्याची डिलिव्हरी आपल्या अकाउंट मध्ये केली जाते. यानंतर पुढचे काही आठवडे किंवा महिने शेअरच्या किंमतीच्या वाढीची प्रतीक्षा करत ते शेअर आपल्याजवळ ठेवले जातात आणि योग्य किंमत आल्यास ते विकून नफा कमवला जातो. या प्रकारात गुंतवणुकीची जोखीम जरा कमी असते.

   4. लॉन्ग टर्म ट्रेडिंग

हा ट्रेडिंग चा प्रकार सर्वात सुरक्षित मानला जातो. यात चांगला परफॉर्मन्स असलेल्या कंपनीचे शेअर विकत घेऊन दीर्घकाळासाठी आपल्याजवळ ठेवले जातात. आणि आपल्याला अपेक्षित किंमत आली की ते विकले जातात आणि नफा कमवला जातो. काही गुंतवणूकदार सहा महिन्यापासून ते दहा किंवा त्यापेक्षाही जास्त वर्ष इतक्या मोठ्या कालावधीसाठी शेअर आपल्याजवळ ठेवतात. या दरम्यान जर कंपनीच्या व्यवसायामध्ये चांगली वाढ झाली तर या प्रकारात गुंतवणूकदाराला चांगला नफा होऊन जातो. या प्रकारात जोखीम अत्यंत कमी असल्यामुळे नवीन गुंतवणूकदारांना लॉंग टर्म ट्रेडिंग मध्ये पैसे इन्वेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो.

आजपर्यंत अनेक गुंतवणूकदारांनी यात पैसे इन्व्हेस्ट करून चांगले रिटर्न्स मिळवलेले उदाहरण आपल्याकडे आहेत.

शेअर मार्केट म्हणजे काय मराठी PDF | Share Market Information Marathi PDF

तर अशाप्रकारे आपण शेअर मार्केट म्हणजे काय व stock market/ share market मध्ये ट्रेडिंग करण्याबद्दलची माहिती पाहिली. हा लेख वाचल्यानंतर तुमच्या share market basics शंका दूर झाल्या असतील अशी मला खात्री आहे. आज आपण Share market marathi mahiti पाहिली आहे. यामुळे Share market basic information in marathi तुम्हाला मिळाली असेल अशी अपेक्षा आहे. 


share market information in marathi व शेअर बाजार संबंधी अजुनही काही शंका तुमच्या मनात असतील तर खाली कमेंट करून तुम्ही कधीही विचारू शकतात. धन्यवाद...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या