ब्लॉग कसा तयार करावा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

 ब्लॉग कसा तयार करतात | How to Create a Blog in Marathi

ब्लॉगिंग या क्षेत्राकडे आजकाल एक नवीन संधी म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे नवीन लोक जे या क्षेत्राकडे वळत आहे त्यांना ब्लॉग कसा तयार करतात याबद्दल अनेक प्रश्न मनात असतात. आज आपण याबद्दलच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 

ब्लॉग कसा तयार करतात | How to Create a Blog in Marathi


एखाद्या वेबसाईटवर माहिती लिहिणे म्हणजे ब्लॉग लिहिणे असा याचा बेसिक अर्थ होतो. ब्लॉक मध्ये सतत नवीन माहिती जोडली जात असते परंतु वेबसाईट मध्ये असे नसते. वेबसाईट ची माहिती ही स्थिर या प्रकारात मोडते.

एखाद्या विषयाबद्दल आपल्याकडे असलेली माहिती आपल्या शब्दात इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठीचे ब्लॉग हे महत्त्वाचे साधन आहे. याचबरोबर आपण लोकांना पोहोचवलेल्या माहितीबद्दल आपण मुबलक प्रमाणात पैसे देखील कमावू शकतो. हा ब्लॉग कसा तयार करतात याबद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.

 ब्लॉग कसा तयार करावा

जेव्हा जगभरात कोरोना वायरस च्या साथीमुळे लॉक डाऊन झाले आणि सर्व लोकांना घरून काम करावे लागले त्या काळात ब्लॉगिंग या क्षेत्राला प्रचंड चालना मिळाली. हजारो लोक आता या क्षेत्रात आपला जम बसवायचा प्रयत्न करत आहेत. अनेकजण आपला ब्लॉग बनवून पैसे कमवायच्या उद्देशाने याकडे बघत आहेत. चला तर मग आजच्या या लेखात आपण ब्लॉग कसा तयार करावा याबद्दल सविस्तर माहिती बघूया, How to Create a Blog

ब्लॉग कसा तयार करावा, जाणून घ्या संपूर्ण माहिती | How to Create a Blog in Marathi


ब्लॉगिंग कसे करतात?


ब्लॉग चे लिखाण सुरू करण्यासाठी Blogger.com, वर्डप्रेस, विक्स, अशा अनेक वेबसाइट इंटरनेट वर उपलब्ध आहेत. यामध्ये ब्लॉगर एक प्रभावी आणि मोफत असा प्लॅटफॉर्म गूगल ने आपल्याला उपलब्ध करुन दिलेला आहे. या प्लॅटफॉर्मच्या लोकप्रियतेमागे महत्त्वाची कारण म्हणजे: 


  • हा प्लॅटफॉर्म मोफत वापरायला मिळतो.

  • लिखाण अतिशय सोपे होते.

  • किचकट नसल्याने वेळ वाचतो.

  • Hosting ची आवश्यकता नसते.

  • Blogpost.com हे सबडोमेन मिळते.

  • Custom domain ची सोय देखिल आहे.


  1. ब्लॉग कसा लिहावा


ब्लॉगिंग बद्दल बेसिक माहिती आपण जाणून घेतली. आता या ब्लॉगर साईटवर ब्लॉक कसा बनवायचा याची प्रोसेस आपण पाहूयात. अतिशय सोपी पद्धत आहे फक्त काही निवडक गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते.


  • सर्वप्रथम आपल्याला ब्लॉगरच्या अधिकारीक वेबसाईटवर म्हणजेच  www.blogger.com वर जायचे आहे.
  • यानंतर ब्लॉग तयार करण्यासाठी Create New Blog या बटन वर क्लिक करावे. समोर विचारलेली माहिती म्हणजेच ब्लॉग चे नाव लिहावे. इथे तुम्ही ज्या विषयावर लिहिणार असाल त्या रिलेटेड नाव लिहिणे गरजेचे असते. हे नाव तुम्ही पुढे बदलू शकता.

  • पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला ब्लॉगचा पत्ता म्हणजेच Domain name लिहायचे आहे. इथे तुम्ही खरेदी केलेले डोमेन चे नाव देखील जोडू शकता किंवा तुम्हाला जे हवे ते नाव देखील ठेवू शकता.

  • नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला स्वतःचे नाव किंवा तुमच्या ब्लॉग चे नाव लिहायचे आहे. जर तुम्हाला स्वतःच्या नावाने लिखाण करायचे नसेल तर तुम्ही जी माहिती लिहिणार आहात त्यात रिलेटेड एखादे चांगले नाव लिहावे.

  • अशाप्रकारे आपली फ्री ब्लॉगिंग साईट तयार झालेली आहे आणि यावर आपण आपले लेख लिहून ते प्रकाशित करण्यास सुरुवात करू शकतो.


  1. ब्लॉग डिझाईन

आपण जो ब्लॉग तयार करणार आहोत तो आकर्षक असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ब्लॉक आकर्षक बनवण्यासाठी त्याच्या डिझाईन निवडण्यासाठी ब्लॉगर च्या डॅशबोर्ड मध्ये सेटअप हा एक पर्याय आपल्याला दिसेल. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे widgets आपल्याला दिसतील. आपल्याला हवे ते widgets आपण जोडू शकतो किंवा काढू शकतो.


Widgets ची निवड आपण आपल्या ब्लॉगिंग साईट वर असलेल्या आवश्यकतेनुसार करावी. गरज नसलेले widgets वेळीच काढून टाकल्यामुळे आपल्या ब्लॉगचा स्पीड वाढण्यास अतिशय मदत होते.


याचबरोबर थीम हा एक असा पर्याय आहे जो तुमचा ब्लॉग आकर्षक करण्यास मदत करतो. ब्लॉगरच्या अधिकृत वेबसाईटवर अनेक प्रकारचे थीम आहेत, जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार customize करू शकता. याशिवाय इंटरनेटवर असंख्य टेम्प्लेट किंवा थीम असतात ज्या तुम्ही डाऊनलोड करून तुम्हाला हवे तसे बदल करून वापरू शकता. यांना कस्टम थीम असे म्हणतात. या थीम फ्री किंवा पेड असू शकतात.

3) Blog चे Setup and Settings

जेव्हा आपण नवीन ब्लॉग सुरू करतो तेव्हा सुरुवातीला ब्लॉग सेटअप आणि सेटिंग करणे गरजेचे असते.             एकदा की तुम्ही ब्लॉग सेटिंग केलात की परत परत याकडे बघण्याची गरज नाही.


  ब्लॉक सेटअप मध्ये आपल्याला आपला ब्लॉग Google Search Console ला जोडावा लागतो. Google Search Console ब्लॉगचा performance दाखवतो, ज्यामध्ये आपल्या ब्लॉगला किती इम्प्रेशन किंवा  क्लिक आले, कुठून आले याबद्दल सविस्तर माहिती असते.

  • ब्लॉक सेटअप मध्ये आपण आपल्या ब्लॉगला  Google Analytics ला जोडू शकतो हे देखील गुगलचे साधन आहे. आपल्या ब्लॉगवर रहदारी म्हणजेच ट्राफिक नक्की कुठून आले, किती वेळ राहिले यासारखी महत्त्वपूर्ण माहिती Google Analytics आपल्याला पुरवते.

ब्लॉगर सेटिंग हा एक महत्त्वाचा पर्याय आहे जो तुमचा ब्लॉग गुगलमध्ये दाखवण्यास मदत करतो. ब्लॉगरच्या डॅशबोर्ड मध्ये हा पर्याय उपलब्ध असतो. इथे काही SEO Friendly बदल करून आपण ब्लॉगला टेक्निकली स्ट्रॉंग बनवू शकतो. या सेटिंग मध्ये मुख्यत्वे Meta description, Robot tags, Site map या सेटिंग करणे गरजेचे असते.

4) First Blog Post

 तुमचा ब्लॉग बनवून झाल्यानंतर आणि त्याची डिजाईन सेट करून तयार झाला असेल तर आता ब्लॉगवर content टाकणे गरजेचे आहे. Content म्हणजे ब्लॉग वर माहिती लिहिणे किंवा ब्लॉग publish करणे. 

ब्लॉगिंग वेबसाइट तयार करण्यापूर्वी तुम्ही कोणत्या टॉपिक वर लिहिणार आहात याबद्दल विचार केलाच असेच. नसेल केला तर पहिली blog post लिहिण्यापूर्वी याचा विचार करावाच लागेल. बर्‍याच नविन bloggers ना topic शोधताना अडचण येते. कोणत्या विषयावर post लिहावी हे त्यांना सुचत नाही..

ब्लॉग बनवण्यापूर्वी असा टॉपिक निवडा ज्यात तुम्हाला इंट्रेस्ट असेल, ज्या विषयावर तुम्हाला भरपूर knowledge पण असेल. तुमच्या आवडीचा विषय असेल तर तुम्ही आवडीने कितीही लिहू शकता. टॉपिकस देखील सुचत जातात. नेहमी काय लिहु असा प्रश्न पडत नाही. 

ब्लॉग पोस्ट म्हणजे काय ?

ब्लॉग पोस्ट म्हणजे आपण जे लेख लिहून publish करणार आहोत ते. ब्लॉग पोस्ट साठि एकदा का subject नक्की झाला की त्याबद्दल माहिती जमवायला सुरवात करावी. ब्लॉग पोस्ट लिहिताना नेहमी लक्षात ठेवावे की ती एकदम टापटीप आणि सूटसुटीत असावी. मुद्देसूद माहिती लिहावी. वाचक आपल्या साईट वर येतील तेव्हा त्यांना ती माहिती आवडेल अशी असावी. उगीचच सुचेल ते भरमसाठ लिहू नये. 

ब्लॉग पोस्ट लिहताना अजून एक गोष्ट लक्षात असू द्यावी ती म्हणजे तुमच्या पोस्ट मध्ये  Keyword Placement, Keyword Research, हे SEO चे घटक समाविष्ट असावेत. पोस्ट लिहल्यावर पोस्ट ला योग्य Permalink द्यावी लागते, योग्य Labels जोडावे लागतात व Meta description टाकावे लागते. ब्लॉगर वर SEO Friendly पोस्ट कशी लिहावी हे आपण नंतर च्या लेख मध्ये पाहुयात.

निष्कर्ष

    एक ब्लॉग कसा तयार करावा, याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेतली | How to Create a Blog in Marathi हे आपल्याला आता चांगलेच समजले आहे. आपल्याला आजचा लेख सविस्तररीत्या समजला असेलच परंतु तरीही जर तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा.

 ब्लॉगिंग, SEO यासंबंधित अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आपल्या ब्लॉगला वारंवार भेट देत राहा आणि मित्रांनाही या ब्लॉगबद्दल नक्की सांगा. धन्यवाद!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या