रायगड किल्ला मराठी माहिती | Raigad fort information in Marathi

 रायगड किल्ला मराठी माहिती | Raigad fort information in Marathi

आजच्या या लेखात आपण महाराष्ट्रातील एका भव्य किल्ल्याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. तो किल्ला म्हणजे दुर्गदुर्गेश्वर रायगड. रायगड किल्ल्याचा इतिहास, वास्तु कला आणि त्याचे महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. 

रायगड किल्ला मराठी माहिती | Raigad fort information in Marathi 


रायगड किल्ल्याचा इतिहास | history of Raigad fort

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सन १६५६ मध्ये हा किल्ला चंद्रराव मोरे यांच्याशी झालेल्या लढाई जिंकला. या किल्ल्याचा विशाल काय आकार, त्याला असलेला तीव्र उतार, त्याचा मुख्य भूभाग या कारणांमुळे रायगड महाराजांच्या मनात भरला. समुद्री दळणवळणाच्या दृष्टीने देखील हा किल्ला महत्त्वाचा आहे हे महाराजांच्या लक्षात आले. त्यामुळेच १६६२ मध्ये रायगड आपली राजधानी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी घोषित केले. 


रायगड किल्ल्याचे बांधकाम

वास्तु विशारद हिरोजी इंदुलकर यांना या किल्ल्याच्या सार्वजनिक इमारतींना सुशोभित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आज्ञा केली. त्यांच्या सांगण्यानुसार इंदुलकरांनी सुमारे 300 दगडी घरे, राजवाडे, कार्यालय, सुमारे दोन हजार माणसे बसतील इतकी मोठी चौकी, बाजारपेठ, पाण्याचे साठे, बुरुज, सामान्य नागरिकांची आणि अनेक प्रतिष्ठितांची निवासस्थाने गडावर बांधली.

किल्ल्याच्या तटबंदीकडे विशेष लक्ष देण्यात आले होते कारण सुरक्षेच्या कारणासाठी ते अत्यंत महत्त्वाचे होते. आजही रायगडावर या वास्तूंचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. दरबार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ल्याच्या मुख्य भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाल्याचे ठिकाण आहे.

गडावर पाण्याची सोय व्हावी यासाठी पाण्याचे विशेष टाके बांधून घेण्यात आल्याचे दिसते. याचबरोबर गंगासागर म्हणून ओळखला जाणारा एक मोठा जलसाठा देखील आहे. त्यापासूनच काही दूर अंतरावर बाजारपेठ दिसते. भंडार गृहे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही रचना देखील इथे बघायला मिळतात.

किल्ल्याचे सर्व बांधकाम पूर्ण होण्यास अनेक वर्षांचा कालावधी केला. यात हजारो कामगारांची मदत झाली. किल्ल्यामध्ये टकमक टोक, जगदीश्वर मंदिर, हिरकणी बुरुज, दरबार, राजमाता पॅलेस असे महत्त्वाच्या ठिकाणांची अवशेष बघायला मिळतात.


रायगड किल्ल्याचे स्थान

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात डोंगरांच्या मालिकेत रायगड किल्ला मोठा दिमाखात उभा आहे. चंद्रराव मोरे यांनी १०३० मध्ये हा किल्ला बांधल्याची नोंद आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे २७०० फूट उंचीवर वसलेला हात किल्ला सण सोळाशे 74 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. पूर्वी रायरी या नावाने ओळखला जाणाऱ्या या किल्ल्याचे बांधकाम करून महाराजांनी त्याला रायगड असे नाव दिले. 


रायगड किल्ल्याची रचना

  • रायगड किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी मुख्यत्वे पाच दरवाजे आहेत. त्यांना अनुक्रमे महादरवाजा, नागरी दरवाजा, पालखी दरवाजा, वाघ दरवाजा, मैना दरवाजा अशी नावे आहेत. 
  • गडावर राणी वसा म्हणजेच राणीचा महाल ही एक बघण्याजोगी जागा आहे. या ठिकाणी खाजगी कमोड आणि अंघोळीची सुविधा असलेल्या सहा खोल्या आपल्याला बघायला मिळतात. ज्यांचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राहण्या करत असत.
  • गडावर चारही बाजूंनी खडकांनी वेढलेला एक मला मोठा होत आहे त्याला बदामी तलाव म्हणून ओळखले जाते.
  • गंगा आणि यमुना नावाचे दोन पिण्याच्या पाण्याचे स्रोत देखील गडावर आहेत.
  • राणीच्या चौथऱ्याचे अस्तित्व आजही आपल्याला भगनावस्थेत गडावर बघायला मिळते. 
  • टेहाळणी करण्यासाठी बांधलेले बुरुज, बालेकिल्ला आणि दरबार यांचे अवशेष अस्तित्वात आहेत.
  • कैद्यांना मृत्युदंड देण्याचे ठिकाण म्हणजेच टकमक टोक होय जे १२०० फूट उंचीवर आहे.
  • पालखी दरवाजासमोर धान्याची भंडार आपण पाहू शकतो जी तीन काळ्या खोल्यांची रांग आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले जगदीश्वराचे मंदिर देखील येथे अस्तित्वात आहे. या हिंदू मंदिरावरील घुमट मुघल स्थापत्यकलेचे प्रतिबिंब असल्याचे बघायला मिळते. 

रायगड वस्तुसंग्रहालय

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात उभ्या केलेल्या या वस्तू संग्रहालयात हिंदवी मराठा साम्राज्याचा इतिहास आणि संस्कृतीचे प्रदर्शन करणारे अनेक शस्त्रे, कलाकृती, चिलखत आणि मराठा साम्राज्याची निगडित दस्तऐवज आपल्याला पाहायला मिळतो.

इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आई जिजामाता यांच्या जीवन काळात घडलेल्या अनेक प्रसंगांबद्दल आणि महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल आपण जाणून घेऊ शकतो.


नेहमी वियचारले जाणारे प्रश्न:

प्रश्न १. रायगड किल्ला कुठे आहे?

उत्तर - महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात रायगड किल्ला वसलेला आहे.


प्रश्न २. रायगड किल्ला कोणी बांधला?

चंद्रराव मोरे यांनी इसवी सन १०३० मध्ये रायगड किल्ला बांधला. परंतु हिरोजी इंदुलकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून सन १६५६ मध्ये रायगड किल्ल्याचा पुनर्विकास केला.


रायगड किल्ला हा हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून अनेक वर्ष दिमाखात उभा राहिला. आजही भारताच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा देत तो आपले अस्तित्व टिकवून आहे. या लेखामध्ये आपण रायगड किल्ल्याचा इतिहास | रायगड किल्ल्याची मराठी माहिती आणि त्याचे महत्त्व | Raigad fort information in Marathi याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

वरील माहितीत काही सुधारणा करायची असल्यास किंवा माहिती आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर खरंच या माहितीचा उपयोग होणार असेल तर तुमच्या मित्रांना नक्की पाठवा.


हरिश्चंद्रगड किल्ल्याची माहिती |  Harishchandragad fort information in Marathi


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या