आषाढी एकादशी व्रत | देवशयनी एकादशी कथा आणि पूजा विधि | ashadhi ekadashi | Ashadhi ekadashi status

आषाढी एकादशी महत्त्व, व्रत कथा, आणि पूजा विधि

आषाढी एकादशीचा दिवस महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी लाखोच्या संख्येने लोक पायी दिंडी करून आपल्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला पोचतात. आज आपण आषाढी एकादशीचे व्रत कथा आणि पूजा विधी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.


आषाढी एकादशी व्रत  | देवशयनी एकादशी व्रत | Ashadhi ekadashi 

आषाढी एकादशी महत्त्व

देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी हा हिंदू  पंचांगातील एक महत्त्वाची तिथे आहे. वारकरी संप्रदायासाठी हा सर्वात मोठा उत्सव असतो. वैष्णवांसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व असल्याचे पाहायला मिळते. या दिवशी लाखोंच्या संख्येने भक्त आणि वारकरी पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होतात. एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी असते. धार्मिक दृष्ट्या आणि अध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे कारण याच दिवशी चातुर्मासासाठी देव निद्रिस्त होतात अशी धारणा आहे.

ब्लॉग कसा तयार करावा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

आषाढी एकादशी कथा 

पूर्वीच्या काळी म्रुदुमान्य या दैत्याने भगवान शंकर यांचे आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले. त्यांच्याकडून वर मागितला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण येणार नाही तर तो फक्त एका स्त्रीच्या हातून मरेल. 

भगवान शंकर यांनी प्रसन्न होऊन त्याला तो वर दिला. या वराच्या जोरावर म्रुदुमान्य दैत्याने हैदोस घातला, सर्व देवांना जिंकून घेतले आणि शेवटी भगवान श्री विष्णू यांना जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला.

भगवान श्री विष्णू आणि म्रुदुमान्य यांच्या लढाईत विष्णू यांचा पराभव होऊन ते भगवान शंकर यांच्याकडे गेले. परंतु आपण दिलेल्या वरामुळेच हे होत आहे हे माहीत असलेले भगवान शंकर हताश झाले होते. काही उपाय मिळेना म्हणून ब्रह्मा विष्णू महेश आणि सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपले. ते काही दिवस तिथेच लपून राहिले. काही काळ गेल्यानंतर भगवान ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्या श्वासा मधून एक देवी उत्पन्न झाली ती म्हणजे देवी एकादशी होय. 

 या देवी एकादशीनेच देवांना अभय देऊन म्रुदुमान्य दैत्याला ठार मारले. सर्व देवांनी तिची तोंड भरून स्तुती केली. या देवीने सांगितले की माझे एकादशीचे प्रत जे लोक मनापासून करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील. ही होती देवी एकादशीची कथा. 

हिंदू पंचांगानुसार दोन एकादशींना अत्यंत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे त्या म्हणजे आषाढ शुक्ल ११ आणि कार्तिक शुक्ल ११. त्यांना महाएकादशी म्हणून देखील संबोधले जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते तर कार्तिकी एकादशीला प्रबोधनी एकादशी असे संबोधले जाते.

असे मानले जाते की, आषाढी एकादशी म्हणजेच आषाढ शुक्ल ११ या दिवशी भगवान श्री विष्णू हे शयन करतात म्हणजेच झोपतात ते कार्तिकी एकादशी पर्यंत याच अवस्थेत झोपलेले असतात. या पूर्ण काळाला चातुर्मास असे म्हणतात जो आषाढ शुक्ल ११ ला सुरू होऊन कार्तिक शुक्ल ११ ला संपतो. जवळपास चार महिने चालणारा हा चातुर्मासाचा काळ अनेक सणासुदीनी भरलेला असतो. अनेक जण हे चार महिने व्रतस्थ राहण्याचा संकल्प घेतात.

शेअर मार्केट म्हणजे काय मराठी माहिती । Share Market Information in Marathi

आषाढी एकादशी पूजा विधि

आषाढ शुक्ल ११ म्हणजेच देवशयनी एकादशी च्या व्रताची सुरुवात दशमीच्या रात्रीपासूनच होते. दशमीला रात्री केलेल्या जेवणात मीठ टाळावे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपले नित्य कार्य आटपून व्रत संकल्प करायला घ्यावा.

विठू माऊली ची मूर्ती स्वच्छ आसनावर विराजित करावी आणि त्यांची मनोभावे विधीपूर्वक पूजा करावी. त्यांना पंचामृताने स्नान घालावं आणि देवाची धूप, दीप, पुष्प, उदबत्ती आणि इतर सामुग्रिने यथासांग पूजा करावी. 

भगवान विठ्ठलांना समस्त पूजन सामग्री, फळे फुले आणि सुकामेवा अर्पित करून मंत्र द्वारा त्यांची स्तुती करावी. हे सर्व करताना शास्त्रात नमूद केलेले सर्व नियम पाळावे.


आषाढी एकादशीची धार्मिक मान्यता

आषाढी एकादशी बद्दल अशी मान्यता आहे की, भगवान श्री विष्णू या दिवशी शेषनागावर झोपी जातात. आणि धार्मिक मान्यतेनुसार दक्षिणायन ही देवांची रात्र असते तर उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढी महिन्यात उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते. त्यामुळे आषाढ महिन्यातील शुक्लपक्षात येणाऱ्या एकादशीला म्हणजेच देवयानी एकादशीला हरी एकादशी असे म्हटले जाते. यानंतर भगवान विष्णू चार महिने निद्रावस्थेत असतात आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधनी एकादशीला ते जागे होतात. 


पंढरपूर वारी

वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशी म्हणजे विठुरायाला भेटण्याची पर्वणीच. महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भावी विठू नामाचा गजर करत आषाढी एकादशीच्या दिवशी पायी चालत पंढरपूरला येतात. यालाच आषाढी वारी असे देखील म्हणतात. चंद्रभागा नदी स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपली पापं नष्ट करतात. या दिवशी पंढरपूर येथे वेगवेगळ्या संतांची पालखी येते त्यात शेगाव वरून गजानन महाराजांची, देहू वरून तुकाराम महाराजांची, आळंदी वरून ज्ञानेश्वरांची, पैठण वरून एकनाथांची, त्र्यंबकेश्वर वरून निवृत्तीनाथांची, एकला बाद येथून मुक्ताबाई यांची आणि उत्तर भारतातून संत कबीर या पालख्यांचा समावेश असतो. 


नेहमी विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न १. आषाढी एकादशी का साजरी केली जाते?

उत्तर - आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी म्हणजेच आषाढी किंवा देवशयनी एकादशी हिला अध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. याच दिवशी भगवान विष्णू शेषनागावर निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.


प्रश्न २. आषाढी एकादशी शुभ असते का?

उत्तर - आषाढी एकादशी ही हिंदू दिनदर्शिका नुसार अतिशय शुभ आणि महत्त्वाचा दिवस असतो.


प्रश्न ३. आषाढी एकादशीला कोणाची पूजा करतात?

उत्तर - आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्र राज्यातील लाखो जनसमुदाय आणि वारकरी मंडळी पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शनाची आस धरतात आणि व्रत करून त्यांची पूजा करतात. 


आजच्या या लेखात आपण आषाढी एकादशी व्रत  | देवशयनी एकादशी कथा आणि पूजा विधि | ashadhi ekadashi | Ashadhi ekadashi status बद्दल मराठी माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि त्याचा तुम्हाला उपयोग होईल अशी मी आशा करते.

वरील माहिती काही सुधारणा करण्याची गरज असल्यास मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच माहिती आवडली असेल तर आपले मित्र आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या