गूगल वरुन ऑनलाईन पैसे कमावण्याचे 5 मार्ग | 5 Ways To Make Money Online with Google

ऑनलाईन पैसे कमावण्याचे 5 मार्ग ( 5 Ways To Make Money Online with

 Google)

आजच्या या आधुनिक युगात जवळपास सर्वांकडेच इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे आणि इंटरनेटवर हजारो कामे आपण शोधू शकतो. आज आपण असेच ऑनलाईन पैसे कमावण्याचे 5 मार्ग ( 5 Ways To Make Money Online with Google) बघणार आहोत.

आज अनेक नोकऱ्या देखील ऑनलाईन उपलब्ध आहेत आणि भविष्यातही त्या कायम राहतील अशी अपेक्षा आहे. असेच काही वर्क फ्रॉम होम जॉब किंवा नोकऱ्या करून आपण स्वतःचा ऑनलाईन बिजनेस सुरू करू शकतो आणि त्यात चांगला जम बसू शकतो.

गूगल वरुन ऑनलाईन पैसे कमावण्याचे 5 मार्ग | 5 Ways To Make Money Online with Google 


ऑनलाइन पैसे कमवण्याची गरज काय ?

महागाईच्या युगात फक्त एका नोकरीवर अवलंबून राहून भागत नाही अशावेळी एकापेक्षा जास्त उत्पन्नाच्या संधी तयार करणे आपल्या हातात असते. जर आपल्या रुटीन जॉब सोबतच एखादा नवीन करिअर मार्क तुम्ही शोधत असाल तर या लेखांमध्ये आपण ऑनलाईन पैसे कमावण्याचे 5 मार्ग ( 5 Ways To Make Money Online with Google) बद्दल अतिशय उपयुक्त माहिती घेणार आहोत त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. लॉकडाऊन नंतर आपल्या हातात जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वेबसाईट आणि साधने आलेले आहेत त्यांचा पुरेपूर वापर करून आपण ऑनलाइन पैसे कमावण्यास सुरुवात करू शकतो.

ऑनलाइन पैसे कमवताना घेतली जाणारी काळजी

ऑनलाइन पैसे कमावणे सहज शक्य आहे परंतु ते करताना काळजी घेणे देखील महत्त्वाचे असते. त्यासाठी खालील गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.


  • डेटा एन्ट्री जॉब मध्ये आपल्याला अनेक आमिष दाखवले जातात, परंतु या प्रकारात घोटाळा देखील असू शकतो त्यामुळे आपला पैसा आणि वेळ यामागे वाया घालवू नका.

  • जर कधी त्वरित पैशाची गरज असेल तर अशावेळी आपल्या खात्रीच्या बँकेकडून वैयक्तिक कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करा आणि शक्य तितक्या लवकर कठोर परिश्रम करून हे कर्ज फेडण्याची तयारी ठेवा.

  • जरी घोटाळा आणि कुणी घरी हे पैसा मिळवण्याचे वेगवान मार्ग असतील तरीही या दोघांपासूनही दूर राहा. त्याचा विचारही करू नका.

  • आपल्याकडे नवीन कला असतील आणि ते आपल्याला योग्य प्रकारे दुसऱ्यांपर्यंत पोहोचवता येत असतील तर त्या कला गुणांना विकसित करून एक जॉब अपॉर्च्युनिटी तयार करू शकता.

  • युट्युब सारख्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर तुम्हाला येत असलेल्या विषयावर ज्ञान संवर्धन व्हिडिओ बनवून चांगला इन्कम सोर्स तयार करू शकता.

  • ब्लॉग लिहिण्याचे काम सुरू करून सहा ते आठ महिन्यात चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा ठेवू शकता.

आता आपण गुगल चा वापर करून ऑनलाईन पैसे कमवण्याचे मार्ग ( make online money with Google) बघणार आहोत.

गूगल वरुन ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग (Make Money Online with Google)

1. ब्लॉगिंग

आजच्या या धकाधकीच्या जीवनात ऑनलाईन पैसे कमावण्याचा सर्वात सुरक्षित आणि लोकप्रिय मार्ग म्हणजे स्वतःचा ब्लॉग सुरू करणे. या प्रकारात आपण आपल्याला माहित असलेल्या गोष्टींबद्दल आपल्या लेखन कौशल्यातून एक चांगला लेख तयार करून तो आपल्या वेबसाईटवर पब्लिश करू शकतो आणि या मार्गाने आपण चांगले पैसे कमावू शकतो.

blogging/ब्लॉगिंग


उदाहरण - जर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची आवड असेल तर तुम्ही त्यासंदर्भात ब्लॉग लिहून तो लोकांपर्यंत पोहोचवू शकता.

तुम्ही जर शिक्षकी पेशामध्ये असाल तर रोजच्या अभ्यासासाठी लागणारे किंवा कुठल्याही इयत्तेतील जास्तीत जास्त वापरले जाणारे लेखन साहित्य तुम्ही तुमच्या ब्लॉगवर लिहू शकता.

ब्लॉग सुरू करताना कोणत्याही विषयाचे बंधन नसते त्यामुळे तुम्ही कोणत्याही विषयावर माहिती लिहू शकता. जर ब्लॉक द्वारे पैसे कमवण्याचा विचार नक्की झाला असेल तर तुम्हाला असा विषय निवडावा लागेल जो तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता आणि त्यात तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. 

हा विषय निवडताना नेहमी स्वतःची आवड जपा. जर तुम्ही आवडीचा ब्लॉग टॉपिक निवडला तरच तुम्ही त्याच्यावर हवे तितके ब्लॉग लिहू शकता. अशावेळी इतरांचे विचार, त्यांच्या साइटवर लिहिलेले ब्लॉग याकडे जास्त लक्ष देऊ नये. तुम्हाला काय आवडते किंवा तुम्ही कशावर लिहू शकता इकडे लक्ष द्यावे.

जेव्हा आपल्या ब्लॉग वर लोक यायला सुरुवात करतात आणि त्यांना आपले लेख आवडू लागतात, आणि खरंच earning सुरू होते तेव्हा तुमची मेहनत फळाला लागते. आता तुम्ही झोपेत सुध्दा पैसे कमावू शकता. ब्लॉग आपल्याला एक चांगला उत्पन्नाचा स्रोत निर्माण करायला मदत करतो याचबरोबर ऑनलाइन जाहिराती, डिजिटल मार्केटिंग यासारख्या अनेक सुविधा आहेत ज्यांचा वापर करुन आपण वेगवेगळे उत्पन्नाचे प्रवाह तयार करु शकतो.

2. आपली स्वतःची ई-कॉमर्स वेबसाइट सुरू करून

आजच्या आधुनिक युगात कोणताही व्यवसाय करायचा असल्यास तुम्हाला कुठलाही मोठा प्लान, खूप पैसे आणि दुकान उभारण्याची गरज नाही. आपली स्वतःची ई-कॉमर्स वेबसाइट बनऊन त्यावरून आपण आपला business सुरू करू शकतो.  यासाठी फक्त तुमचचा लॅपटॉप आणि इंटरनेट ची सुविधा असली का आपण व्यवसाय आरामात सुरू करू शकतो, इतकच नाही तर तुम्ही ग्राहक देखील ऑनलाइन च मिळवू शकता. 

वेबसाइट वर ऑनलाइन स्टोर सुरू करून तुम्ही फिजिकल प्रॉडक्ट ऑनलाइन विकून चांगला नफा मिळवू शकता. यातच एक नवीन संधी म्हणजे ड्रॉप शिपिंग, ज्यात तुम्ही तुमच्या वेबसाइट वर order घेऊन कोणत्याही खात्रीशीर थर्ड पार्टी manufacturer कडून पूर्ण करून घेऊ शकतो. आपला नफा काढून आपण ग्राहकाला ऑर्डर पोहचवू शकतो. 

3. ऑनलाइन सर्वे


ऑनलाईन सर्वे हा अतिरिक्त पैसे मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. ब्रँड नेम कॉर्पोरेशन आणि मार्केट रिसर्च फर्म उत्पादने आणि सेवांविषयी लोकांची मते जाणून घेण्यासाठी ऑनलाइन सर्वे करतात आणि त्यासाठी ते चांगला मोबदला देतील देतात.

त्यांच्या जटिलतेनुसार, प्रत्येक सर्वेक्षण पाच, दहा किंवा अधिक डॉलर्सचे असू शकतात. यापैकी निवडण्यासाठी बर्‍याच नामांकित सर्वेक्षण कंपन्या आहेत, परंतु आपणास सुरुवातीस स्वत: ला 3 ते 5 सर्वे करण्याची मर्यादा असणे गरजेचे आहे.

आपल्याला बेकायदेशीर कंपन्या देखील टाळायच्या आहेत, कारण हे क्षेत्र घोटाळ्याच्या संधींसह सर्वत्र पसरले आहे जे आपला बराच वेळ घेतील आणि आपल्याला खूप कमी पैसे देतील किंवा देणारच नाहीत. 

4. एफिलिएट मार्केटिंग 


एफिलिएट मार्केटिंग द्वारे तुमची स्वतःची नसलेली उत्पादने सुद्धा तुम्ही विकून कमिशन द्वारे चांगले पैसे कमावू शकता. ऑनलाइन पैसे कमावण्याच्या मार्गात ही संधी देखील तुम्हाला यशस्वी बनवू शकते. यामध्ये तुम्हाला अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट तसेच नेटवर्किंग वेबसाईट, काही ऑनलाईन क्लासेस यांचे Affiliate प्रोग्राम जॉईन करावे लागतील. 

आपण या साइटवर उपलब्ध असलेल्या कोणत्याही प्रॉडक्टची लिंक वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया, आपली स्वतःची वेबसाईट किंवा ब्लॉक द्वारे लोकांपर्यंत पोहोचवून कंपनीकडून कमिशन द्वारे पैसे कमावू शकतो. तुम्ही स्वतःची ई-मेल लिस्ट बनवून करून देखील नेहमीचे कस्टमरचा सातत्याने पाठपुरावा करू शकता आणि त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकता.

या ऑनलाईन उत्पन्न पर्यायाची एक खास गोष्ट म्हणजे आपल्याला स्वतःचे कोणतेही प्रॉडक्ट तयार करण्याची आवश्यकता नाही किंवा कोणतेही कस्टमर सपोर्ट देण्याची देखील आवश्यकता नाही. आपण फक्त प्रॉडक्टची जाहिरात करून एक चांगला कस्टमर बेस मिळवणे गरजेचे असते.

Affiliate मार्केटिंग करताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

  • आजकाल मार्केटमध्ये खुप Affiliate नेटवर्क आहेत त्यामुळे आपण Quality content पोस्ट करणे जास्त गरजेचे असते जेणेकरून लोकांना तुमच्यावर विश्वास बसेल आणि नेहमी खरेदीसाठी ते तुमच्याकडे येतील.

  • कस्टमर बेस चा अभ्यास करुन त्यांच्या गरजा ओळखणे गरजेचे असते त्यामुळे लोकांना आकर्षित करते असेच प्रॉडक्ट निवडा.

  • अनेक ट्राफिक रिसोर्सेस जसे की सोशल मीडिया आणि गुगल अडवर्ड चा पुरेपूर वापर करा.

  • कोणत्याही एका रिसोर्सवर अवलंबून राहू नका. एका रिसोर्स मधून तुम्हाला हवे तितके उत्पन्न मिळाले नाही तर नेहमी दुसऱ्या रिसोर्सचा उपयोग करा.

  • मार्केटचा नीट अभ्यास करून कस्टमर च्या गरजेनुसार डिमांड ओळखून प्रॉडक्ट विकायचा प्रयत्न करा. बऱ्याचदा या गरजा ऋतूनुसार बदलतात.

  • लोकांचा विश्वास बसण्यासाठी नेहमी प्रॉडक्ट विषयी खरी माहिती देण्याचा प्रयत्न करा.

5. ऑनलाइन ई-पुस्तके प्रकाशित करून

जर तुम्हाला वाचन आणि लिखाणाची आवड असेल तर तुम्ही स्वतःचे एखादे पुस्तक किंवा आपल्या स्वतःच्या व्यवसायावर आधारित लेख आणि जीवनशैली विचारत घेतात त्या प्रकारचे पुस्तक लिहून ते ऑनलाईन ॲमेझॉन किंडल माध्यमातून पब्लिश करू शकता. आजपर्यंत ॲमेझॉन किंडल ने हजारो पब्लिश करून देण्याची आणि लोकांना पैसे कमावण्याची संधी मिळवून दिलेली आहे.

ॲमेझॉन किंडल हा केवळ एकटा प्लॅटफॉर्म नाही की जिथे आपण पुस्तके विकून पैसे कमावू शकतो तर आपण आपली स्वतःची वेबसाईट देखील यासाठी वापरू शकतो. पुस्तक आपण त्याचे मूल्य जाणून चांगल्या किमतीत विकून जास्तीत जास्त नफा हे आपण पाहू शकतो.

एकदा पुस्तक लिहून ते पुढे तुम्हाला निष्क्रिय उत्पन्नाचा एक मोठा वाटा निर्माण करून देऊ शकते. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पैसे कमावण्याचा अतिशय खात्रीशीर पर्याय म्हणून ही पुस्तक प्रकाशनाकडे बघू शकता.


गूगल वरुन ऑनलाईन पैसे कमावण्याचे 5 मार्ग ( 5 Ways To Make Money Online with Google )


गूगल वरुन ऑनलाईन पैसे कमावण्याचे 5 मार्ग ( 5 Ways To Make Money Online with Google), गुगल वरून ऑनलाईन पैसे कमवण्याचे 5 मार्ग  ( 5 Ways To Make Money Online with Google) आपण पाहिले ते तुम्हाला कसे वाटले किंवा अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माहिती उपयुक्त वाटली असेल तर मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करायला विसरू नका.

गुगल वरून ऑनलाईन पैसे कमवण्याचे 5 मार्ग  ( 5 Ways To Make Money Online with Google) याबद्दल काहीही चुकीची माहिती वाटली असेल तर नक्की कळवा त्यामध्ये आवश्यक बदल केला जाईल.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या