रक्षाबंधन सणाची माहिती | Raksha Bandhan Marathi 


रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा (Raksha Bandhan Marathi) हा सण भावा बहिणींच्या पवित्र नात्यातील एक अनमोल धागा म्हणून ओळखला जातो. हिंदू पंचांगा मधील एक महत्त्वपूर्ण सण म्हणून ओळख असलेला आणि जगभरातील हिंदू लोकांद्वारे श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जाणारा लोकप्रिय सण म्हणजेच रक्षाबंधन. 

आजच्या या लेखामध्ये आपण रक्षाबंधन सणाची माहिती ( Raksha Bandhan information in Marathi) याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

 रक्षाबंधन | Raksha Bandhan Marathi

 रक्षाबंधन (Raksha Bandhan Marathi) माहिती आणि महत्त्व

राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन (raksha bandhan marathi) हा सण हिंदू संस्कृतीच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. भावा बहिणी मधील दुवा, प्रेम, आपुलकी यांचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन. देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखला जाणारा हा सण पश्चिम भारतात नारळी पौर्णिमा या नावाने साजरा करतात तर उत्तर भारतात यालाच कजरी पौर्णिमा असे म्हणतात. 

या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधून त्याची प्रगती आणि सुखी आयुष्याची प्रार्थना देवाकडे करते तसेच भावाने आपल्याला संरक्षण देण्याचे वचन ती मागून घेते. राखी (Raksha Bandhan chi Mahiti) या शब्दांमध्ये रक्षण कर किंवा सांभाळ कर असा संकेत देण्यात आलेला आहे. या दिवशी बहीण आपल्या रेशमी प्रेमाचा धागा भावाच्या मनगटावर बांधून त्याच्याकडून आपल्या रक्षणाचे अभय घेते. आपल्या नात्याचे रक्षण करणे हाच त्यामागील मतितार्थ होय.

आजकालच्या आधुनिक युगात मुली स्वावलंबी बनत आहेत, स्वतःचे रक्षण करण्यास त्या समर्थ आहेत परंतु तरीही रक्षाबंधन हा सण मोठ्या विश्वासाने साजरा करून त्या राखीच्या माध्यमातून आपल्या भावा वरील प्रेम आणि विश्वास जपतात. आजची स्त्री दुबळी नसून ती भावासोबतच प्रेम आणि आपुलकी दृढ करण्याच्या भावनेतून रक्षाबंधन साजरे करते. एकमेकांमधील संबंध अजून घट्ट करण्याच्या दृष्टीने हा सण साजरा करण्याची एक पवित्र भावना सर्वांच्या मनात असते. 

भावा बहिणीतील नाते एक पवित्रतेचे लक्षण असते, त्यामागे कोणताही स्वार्थ नसतो. ते नाते जितके खोडकर असते तितकेच प्रेमाचे देखील असते त्याचप्रमाणे बांधला जाणारा धागा फक्त धागा नसतो तर त्याला आपुलकीची झालर असते. काळ कितीही बदलला तरी भावा बहिणीच्या या प्रेमाच्या रक्षाबंधन या सणाचे महत्त्व कायम आहे आणि असेच राहील.

काही भागात गरीब लोक आपले पोषण करणाऱ्या धनवंतांनाही राखी बांधून हा सण साजरा करतात. आपल्या कुटुंबाची आणि आपली जबाबदारी त्यांच्यावर आहे अशी कृतज्ञता त्यातून ते व्यक्त करतात. सहसा उत्तर भारतात ही पद्धत रूढ असल्याचे पाहायला मिळते.

श्रावण महिना (Shravan mahina) कथा, सण, उपवास, व महत्त्व – संपुर्ण माहिती

रक्षाबंधनाचे धार्मिक महत्त्व

रक्षाबंधनाचे धार्मिक महत्त्व | Raksha Bandhan Marathi

पुरानात सांगितल्यानुसार हिंदू संस्कृतीमध्ये श्रावणी पौर्णिमेला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. या दिवशी पुरोहित किंवा भटजी यांनी दिलेले आशीर्वाद अत्यंत पवित्र मानले जातात. 

मध्ययुगीन भारतात अनेक आक्रमणांमध्ये महिलांचे अत्यंतिक शोषण केले जात असे. यावेळी या आक्रमणांमध्ये महिलांचे संरक्षण करण्यासाठी रक्षाबंधन या सणाला विशेष महत्त्व देण्यात आले. 

याचबरोबर कोळी बांधवांसाठी रक्षाबंधन किंवा श्रावणी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व असते. महाराष्ट्रातील कोळी बांधव पावसाळा सुरू झाल्यापासून बंद असलेली मासेमारी या दिवशी सुरू करतात. या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा करून नारळ वाहून मासेमारीला सुरुवात करतात. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला श्रावण नक्षत्र असेल तर हा दिवस अत्यंत लाभदायक मानला जातो आणि अनेक चांगल्या कामांची सुरुवात या दिवशी करण्यास हा अनुकूल दिवस मानला जातो. 

याचबरोबर पावसाळा सुरू झाल्यानंतर किंवा सुरुवातीचा पाऊस पडल्यानंतर शेतीच्या कामांना सुरुवात झालेली असते. श्रावण सुरू होईपर्यंत ही कामे जवळपास कमी होतात आणि समाधानी शेतकरी वेद पुराणाची कथा ऐकण्याची उत्सव साजरे करतात. पूर्वीच्या काळी अनेक कामे सुरू करण्याचा एक शुभ मुहूर्त म्हणून श्रावणी पौर्णिमेकडे पाहिले जायचे. 

रक्षाबंधन कथा

दानवांचा राजा वृत्रासुर यांनी देवांचा राजा इंद्र यांना युद्ध करण्याचे आव्हान दिले. देव इंद्र यांनीही हे आव्हान पेलून आपले वचन उचलले आणि ते युद्धास निघाले. त्यावेळी त्यांची पत्नी शुची यांनी भगवान विष्णू यांच्याकडून मिळालेला एक धागा देव इंद्र यांच्या हातावर बांधला. या राखीच्या प्रभावाने इंद्रदेवांना आत्मविश्वास मिळाला याचबरोबर ते युद्धात विजयी झाले अशी श्रद्धा आहे. यात असुराचा पराभव झाला आणि गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणूनच मनगटावर राखी बांधण्याची प्रथा रूढ पडली असे सांगितले जाते.

रक्षाबंधनाचे शास्त्र

रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावासोबत चे नातेसंबंध दृढ करण्यासाठी त्याच्या मनगटावर राखी बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर टाकते. ही राखी हातावर बांधण्याचे देखील एक शास्त्र सांगण्यात आलेले आहे. भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक सणवार साजरा करण्यामागे काहीतरी शास्त्र असते, त्याचप्रमाणे रक्षाबंधनाच्या दिवशी चे देखील एक विशेष शास्त्र सांगण्यात आले आहे.

नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी यमलहरींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येते. या लहरी पुरुषांच्या देहामध्ये जास्त प्रमाणात गतिमान होतात असा समज आहे. यांच्यामुळे सूर्य नाडी जागृत होऊन त्या जीवाला त्रास होतो. अशावेळी राखीचा धागा बांधून या यमलहरींना बंधन घालण्याचे काम बहीण करते असे मानले जाते. एक प्रकारे राखीचे बंधन घालून सूर्यनाडीला शांत करण्याचे काम बहीण करत असते असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. 

श्रावण महिना (Shravan mahina) कथा, सण, उपवास, व महत्त्व – संपुर्ण माहिती

तुम्हाला रक्षाबंधन (Raksha Bandhan Marathi) या सणाची माहिती नक्कीच आवडली असेल अशी आशा आहे. हा लेख कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा असेच नवनवीन लेख वाचण्यासाठी साईटला नक्की व्हिजिट करत रहा. 

वरील माहितीत काहीही चुकीचे आढळल्यास नक्की सांगा त्यात आवश्यक बदल केला जाईल. 

धन्यवाद.