श्रावण महिना (Shravan mahina mahiti) कथा, सण, उपवास, व महत्त्व – संपुर्ण माहिती

 

श्रावण महिना माहिती मराठी व श्रावणाचे महत्त्व (Shravan mahina mahiti marathi) 

मराठी कॅलेंडर नुसार सौर वर्षांमध्ये बारा महिने असतात आणि या प्रत्येक काहीतरी विशेष असल्याचे पाहायला मिळते. त्यापैकीच एक महत्त्वाचा महिना म्हणजे श्रावण (shravan mahina)जो सणांचा महिना म्हणून देखील ओळखला जातो. 

या पूर्ण महिन्यात वेगवेगळ्या सणांची रेलचेल असते आणि त्यामुळे हा महिना सर्वांना खूप आवडतो. आज आपण श्रावण महिना मराठी व श्रावणाचे महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. (shravan mahina mahiti marathi)

shravan mahina

श्रावण महिना माहिती मराठी 
(shravan mahina mahiti marathi)

विविध सणांप्रमाणे हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येक सणाला विशेष महत्त्व दिलेले आहे. श्रावण महिन्यात (Shravan mahina)  येणाऱ्या प्रत्येक दिवसाला आणि सणाला शास्त्रीय आणि धार्मिक कारण असते याचबरोबर हे सर्व सण आपला आनंद द्विगुणीत करतात. श्रावण सरींमुळे निसर्ग बहरून निघतो आणि या महिन्यातील सौंदर्य अजूनच वाढवतो. याच श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांचे अध्यात्मिक आणि शास्त्रीय कारण देखील आपण आजच्या या लेखात बघणार आहोत.

श्रावण महिन्यात प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने दान करण्याला अत्यंत महत्त्व देण्यात आलेले आहे. यामध्ये गरिबांना भोजन देण्याची विशेष प्रथा मानण्यात आलेली आहे. वेगवेगळे देवस्थान आणि मंदिरांमध्ये या संपूर्ण महिन्यात कथा पुराण यासारखे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.

श्रावण महिना (shravan mahina) म्हणजे निसर्ग आणि परंपरा या दोन्हींची सांगड घालणारा एक विशेष काळ. चातुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिला म्हणून देखील याची ओळख आहे. आषाढ महिन्याच्या अमावस्येला दिव्यांची आरास केल्यानंतर श्रावणाची खऱ्या अर्थाने सुरुवात होते आणि व्रतवैकल्यांना सुरुवात करून प्रत्येक जण याचे स्वागत करतो. श्रावण म्हणजे पाऊस, निखळ वातावरण आणि देवाची ओढ यांचं अगदी छान मिळून येणार सूत्र.

रक्षाबंधन सणाची माहिती | Raksha Bandhan Marathi Mahiti

श्रावण महिन्याचे महत्व

श्रावण महिन्याचे महत्व नक्की काय आहे ( importance of Shravan month)  असा प्रश्न कधीही कुणाला पडत नाही कारण आपण सगळे लहानपणापासून या महिन्याचे महत्व बघत आणि अनुभवत आलो आहे. भगवान शिवशंकर यांना अत्यंत प्रिय असलेला महिना म्हणजे श्रावण. या महिन्यात अनेक प्रकारची व्रत करण्यात येतात त्यामुळे वातावरण अधिकच पवित्र बनते. या व्रतांपासून आपण पापमुक्त होतो असाही समज समाजात आहे. या काळात महादेवांची पूजा फलदायी ठरते आणि ऐच्छिक वरदान मिळते अशी मान्यता आहे. 

श्रावणातील सणांमुळे आपल्यासाठी संबंध अधिक दृढ होतात. सर्वत्र उत्साह जल्लोष आणि आनंदात साजरा केला जाणार हा महिना अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे. 

पौराणिक कथा नुसार देवी सती माता यांचा दुसरा जन्म म्हणजेच देवी पार्वती यांनी भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कडक व्रत केले आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले. भगवान प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी देवी पार्वती यांच्याशी विवाह केला. या कथेनुसार धार्मिक दृष्टिकोनातूनही या महिन्याचे विशेष महत्त्व आहे. 

श्रावण महिन्यातील सण उत्सव

श्रावण महिन्याला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या महिन्याला सणांचा महिना म्हणून देखील ओळखले जाते कारण हिंदू धर्मातील महत्त्वाचे सण जसे की नागपंचमी, रक्षाबंधन, पोळा, मंगळागौर या महिन्यात येतात. या सरांसोबतच श्रावण सर्वत्र उत्साह आणि आनंद पसरवतो आणि प्रत्येकास नवचैतन्य प्रदान करतो. श्रावणात प्रत्येक सोमवारी शिवामुठ व्रत करतात ज्यात तांदूळ, तीळ, मुग, जवस, आणि सातू अशा क्रमाने सर्व शंकराच्या पिंडीवर मुठीने वाहतात.

नागपंचमी

श्रावणातील विविध सणांपैकी एक महत्त्वाचा म्हणजे नागपंचमी सण. श्रावण मासाची सुरुवातच या सणाने होते. या दिवशी शेतकरी आपला मित्र साप याची पूजा करून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. यानिमित्ताने मोकळ्या निसर्गाचा आणि प्रकृतीसाठी देखील चांगले असते असे मानले जाते आणि ते झाल्यानंतर झिम्मा फुगडी खेळण्याची प्रथा आहे. स्त्रिया नवनवीन वेशभूषा करून नवीन दागिने परिधान करून वारुळाला जाऊन नागदेवताची पूजा करतात आणि ठिकठिकाणी पुरणपोळीचा प्रसाद करतात.

नारळी पौर्णिमा

श्रावणातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणून संबोधले जाते. कोळी बांधवांसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी त्यांची उपजीविका भागवणाऱ्या समुद्राला नारळ अर्पण करून मासेमारी ला सुरुवात होते. 

रक्षाबंधन

रक्षाबंधन | Rakshabandhan


नारळी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण देखील साजरा केला जातो. हिंदू संस्कृती भाऊ बहिणीच्या नात्यात असणारे महत्त्व अधोरेखित करणारा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी बहीण आपल्या भाऊरायाला ओवाळते आणि राखी बांधते तर राखी म्हणल्यावर भावाकडून मिळणारी ओवाळणी तिला महत्त्वाचे वाटते.

गोपाळकाला / श्रीकृष्ण जन्मोत्सव

भगवान श्रीकृष्ण यांची जयंती म्हणजेच श्रीकृष्ण जन्मोत्सव हा सण अत्यंत जल्लोषात साजरा होतो. या दिवशी दहीहंडी उत्सवाने लोकांच्या आनंदात भर घातली जाते. अनेक तरुण मन मित्रमंडळी एकत्र येऊन दहीहंडी फोडण्यासाठी थर लावून प्रयत्न करतात आणि हा दहीहंडीच्या चुरशीचा खेळ पाहण्यासाठी लोक हजारोंच्या संख्येने गर्दी करतात. वातावरणात एक उत्साह आणि आनंद भरवणारा हा सण मन उल्हासित करतो.

बैलपोळा / पिठोरी अमावस्या

श्रावण महिन्याच्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. याच दिवशी शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा असलेला बैलपोळा सण साजरा केला जातो. शेतीच्या कामात बैल मदत करतो आणि त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजेच बैलपोळा होय. या दिवशी बैलांचा शृंगार करून मिरवणूक काढली जाते आणि पूजा करून नैवेद्य देखील दाखवला जातो.


श्रावण महिन्यातील उपवास आणि पूजा विधी

  • श्रावण महिन्यात पूजा आणि उपवास करण्यासाठी विशेष महत्त्व दिले जाते. 
  • प्रत्येक सोमवारी शंकाराची आराधना आणि उपवास करण्याची पद्धत आहे.
  • प्रत्येक मंगळवारी देवी आणि मंगळागौरीची पूजा करतात.
  • श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी देवीची उपासना करण्याची प्रथा आहे तसेच सत्यनारायण पूजा देखील करण्याची प्रथा रूढ झालेली आहे.
  • चातुर्मासातील सर्वोच्च महिना म्हणून श्रावणाला अत्यंत महत्त्व देण्यात आलेले आहे.

श्रावण महिन्यातील दानाचे महत्त्व

या महिन्यात प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत गरिबांना भोजन देण्याची प्रथा आहे आणि मंदिरांमध्ये तसेच देवस्थानांमध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याचे देखील प्रयोजन केले जाते या कार्यक्रमात अन्नदान केले जाते.


श्रावणी सोमवार व्रताचे महत्व

चातुर्मासात सर्वजण वेगवेगळ्या प्रकारचे व्रत वैकल्य करत असतात. ये उपासना आणि व्रत मधून पापमुक्ती होते असा समज आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगवेगळे आहे. यापैकीच एक दिवस म्हणजे श्रावणी सोमवार. श्रावणी सोमवार हा एक अत्यंत महत्त्वाचा उपवास अनेक भाविक करतात. भगवान शिव शंकरांना प्रसन्न करण्यासाठी देवी पार्वतीने केलेले हे व्रत आहे त्यामुळे त्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी महादेवांची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. 

पार्वती आणि भगवान शिव यांचे एकत्र पूजा केल्यास सौभाग्य लागते आणि कुटुंबातील आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकरांकडे पृथ्वीची काळजी घेण्याची जबाबदारी असते अशी देखील आख्यायिका सांगितली जाते. शिवभक्त कावड घेऊन गंगेच्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करतात आणि ऐच्छिक वर मागतात. भगवान शंकर देखील भक्तांचे सर्व त्रास दूर करत असतात.

श्रावणातील पाऊस

श्रावणातील पाऊस | shravan mahina paus


श्रावणातील पावसाची विविध रूपे आपल्याला बघायला मिळतात. सुरुवातीला रिमझिम पाऊस होतो जो सर्वांनाच खूप हवाहवासा वाटतो. आषाढात पडणाऱ्या धो धो पावसाच्या तुलनेत हा सौम्य पाऊस सुखावून जातो.

कधीतरी अचानक मुसळधार पाऊस पडून क्षणात ऊन पडते. निसर्ग सगळीकडे हिरवी चादर पसरवतो आणि या ऊन पावसाच्या खेळात इंद्रधनुष्य आपले मन वेधून घेतो. पावसाळा सुरू होऊन बरेच दिवस झालेले असतात आणि सृष्टीने हिरवीगार सादर पसरवलेली असते. त्यामुळे अनेक लोक या वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी घराबाहेर पडतात. श्रावण सरी मध्ये भिजण्याचा आनंद काही औरच असतो.


प्रश्नोत्तरे

प्रश्न - श्रावण महिना कोणत्या ऋतूत येतो?

उत्तर - श्रावण महिना पावसाळा या ऋतूमध्ये येतो. हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण हा पाचवा महिना असून या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो म्हणून याला श्रावण महिना असे नाव मिळाले आहे.

प्रश्न - श्रावणातील शनिवारी व्रत का करतात?

उत्तर - शनिपिडेचा त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक श्रावणी शनिवारी व्रत केले जाते.

श्रावणी महिना मराठी माहिती या लेखातून आज आपण श्रावण महिन्याचे धार्मिक पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्व आपण पाहिले. या सणाचा उत्साह काहीतरी निराळाच असतो. सर्वांचा हा आवडता सण असतो. 
तुम्हाला हा श्रावण महिन्याचे महत्व लेख कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. हा लेख आपल्याला आवडला असल्यास आपण मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत शेअर करा, तसेच काही चुकीची माहिती आढळल्यास कमेंट मध्ये सांगा.



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या