Lokmanya Tilak Marathi mahiti | लोकमान्य टिळक मराठी माहिती

Lokmanya Tilak Marathi mahiti | लोकमान्य टिळक मराठी माहिती

भारतीय स्वतंत्र लढ्यास अनेक क्रांतिकारी वीरांनी आणि देशभक्तांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. अशाच महान नेत्यांपैकी एक म्हणजे लोकमान्य टिळक ( Lokmanya Tilak Marathi ) होय. आज आपण अशाच एका महान लेखक, शिक्षक, साहित्यकार, शूरवीर क्रांतिकारक, आणि स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांच्या विषयी अधिक माहिती ( Essay on Lokmanya Tilak) जाणून घेणार आहोत. 

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच." 

अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक भारताचे एक महान नेते होते. सर्वात आधी आपण त्यांच्या बालपणाविषयी माहिती जाणून घेऊयात.


लोकमान्य टिळक मराठी माहिती | Lokmanya Tilak Marathi 

लोकमान्य टिळक यांचे बालपण

लोकमान्य टिळक यांचे मूळ नाव केशव गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म 23 जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक तर आईचे नाव पार्वतीबाई टिळक असे होते. सन १८६६ मध्ये वडिलांची बदली पुण्यात झाली आणि लोकमान्य टिळक आपल्या कुटुंबासोबत पुण्यात राहू लागले. तिथेच त्यांनी मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्या आणि बी.ए. पूर्ण करून पुढे एल.एल.बी. ची पदवी आत्मसात केली.

 शैक्षणिक कार्य

पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करत असताना त्यांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री जमली आणि दोघांनीही आपल्या देशाच्या कार्याला वाहून घेण्याचा संकल्प केला. यात त्यांना विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची मोलाची मदत मिळाली आणि १ जानेवारी 1880 रोजी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. हे कार्य करत असताना असते संस्कृत आणि गणित हे विषय शिकवत होते. महत्त्वाचे म्हणजे शिक्षणाचे हे पुण्याचे काम ते बिना वेतनी करत होते. 

पुढे आगरकर आणि चिपळूणकर यांच्याच मदतीने सण १८८१ मध्ये स्वतःचा छापखाना काढून त्यांनी केसरी आणि मराठा या नावाची दोन वृत्तपत्रे चालू केली. या वृत्तपत्रांच्याच मदतीने त्यांनी लोकांमध्ये शैक्षणिक आणि राजकीय जागृती करणे तसेच ब्रिटिशांच्या शासकीय अन्यायाचा प्रतिकार करणे याबद्दल आपले लिखाण सुरू केले. इंटर सरकारच्या गैरवागणुकीबद्दल आपल्या वृत्तपत्रातून त्यांनी जहरी टीका केली. 

या कार्यासाठी लोकमान्य टिळकांना आगरकरांसोबत चार महिन्याची डोंगरी तुरुंगात राहण्याची शिक्षा सुनावली गेली. परंतु 26 ऑक्टोबर 1882 रोजी त्यांची सुटका झाली. 

इसवी सन 884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि 1885 मध्ये फरग्यूसन महाविद्यालयाची स्थापना करून त्यांनी भारतीय शैक्षणिक कार्याला कलाटणी दिली. 

काळ पुढे सरकत होता आणि लोकमान्य टिळक ब्रिटिशांविरोधी कडाडून आंदोलन करत होते. पुढे डेक्कन एज्युकेशन संस्था सोडून त्यांनी सामाजिक समाजकार्य याच सोबत विविध प्रकारचे हिंदू मुसलमान दंगे यासारखे विषय हाताळले. यातून त्यांचा देशाबद्दलचा अभिमान आणि देशप्रेम तसेच स्वातंत्र्यासाठी लढण्याची ऊर्जा प्रकर्षाने जाणवते. आपल्या वृत्तपत्रातील प्रकरण लेखनाने ते राजकीय पक्षांनी विरुद्ध सतत संघर्ष करून इंग्रजी सत्तेविरुद्ध तसेच त्यांच्या कारभाराबद्दल कडाडून विरोध करायचे. 

तुरुंगवास आणि तुरुंगवासातील कार्य

पहिल्यांदा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर टिळकांनी स्वदेशी चळवळ सुरू केली. आपल्या वर्तमानपत्रातून आणि भाषण द्वारे त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात जाऊन लोकांपर्यंत स्वदेशी चळवळीचा संदेश पोहोचवला. 1906 मध्ये ठेवताना राजद्रोहाच्या आरोपाखाली पुन्हा अटक करण्यात आली. यावेळी घेताना सहा वर्ष शिक्षा सुनावली आणि त्यांना मंडालेच्या कारागृहात घेण्यात आले. या कारागृहात असतानाच त्यांनी आपला मोकळा वेळ लिखाण आणि वाचन करण्यात घालवला. 'गीतारहस्य' हा त्यांचा अजरामर ग्रंथ देखील इथेच लिहिला.

लाल बाल पाल समीकरण

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्याला दोन मतप्रवाह पाहायला मिळतात एक म्हणजे जहाल मतवादी आणि दुसरा म्हणजे मवाळ मतवादी. लोकमान्य टिळक यापैकी जहाल मतवादी विचारांचे होते. 

ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य दिलेच पाहिजे आणि त्यासाठी कोणतेही प्रकारची विनंती करण्याची गरज नाही, कारण स्वातंत्र्य मिळवणे हा भारतीय जनतेचा जन्मसिद्ध हक्क आहे या विचारांचे ते होते. याचप्रमाणे लाला लजपतराय आणि बिपिन चंद्र पाल हे देखील लोकमान्य टिळकांच्या विचारांचे होते आणि त्यांनी सोबत येऊन भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी विशेष योगदान दिले. त्यामुळेच त्यांच्या या त्रिकुटाला लाल बाल पाल असे नाव पडले.

लोकमान्य टिळकांचे योगदान

लोकमान्य टिळक यांनी फक्त भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपले योगदान दिले असे नाही तर याचबरोबर त्यांनी शिक्षणाचा अधिकार जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. ते बालविवाह प्रथेविरुद्ध लढले, विधवांचे विपणन करणे तसेच अनिष्ट रूढी परंपरा आणि चालीरीती यांच्याविरुद्ध त्यांनी कडाडून टीका केली. 

ब्रिटिश सरकारने त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधले परंतु त्यांची स्वातंत्र्य मिळवण्यासाठीची तळमळ, देशप्रेम, निष्ठा आणि सामाजिक कार्य पाहून लोकांनी त्यांना 'लोकमान्य' या उपाधीने सन्मानित केले.

अशा या युगपुरुषाचे 1ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी लोकांपर्यंत पोहोचतात देशभरात शोककळा पसरली आणि दूर पूर्ण वरून लोक त्यांच्या अंतिम दर्शनाला येऊ लागले. त्यांच्या महान कार्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला अमूल्य योगदान मिळाले आहे. 


वरील लोकमान्य टिळक मराठी माहिती Lokmanya Tilak Marathi information कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. वरील माहिती काही चूक आढळल्यास तेही कळवा. माहिती तपासून त्यात नक्की बदल केला जाईल. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या