पुरणपोळी कशी बनवायची | Puranpoli Receipe in Marathi

पुरणपोळी कशी बनवायची | Puranpoli Receipe in Marathi

महाराष्ट्राची शान असलेली, जवळपास सगळेच सण आणि महत्त्वाचे प्रसंग साजरे करताना केल्या जाणार्‍या पुरणपोळी ची | Puranpoli Receipe In Marathi माहिती आपण बघूया.

होळी असुदया किंवा दिवाळी, पाहुणे येणार असुदया किंवा मुलगी सासरी जाणार, पुरणपोळीचा ( Puranpoli receipe in marathi ) बेत होतोच. जणू पुरणपोळी महाराष्ट्राची शानच बनली आहे! आज आपण मऊसूत, पुरणाने गच्च भरलेली, नाजुक पण किंचित जाडसर, सोनसळी रंगाची पुरणपोळी कशी बनवायची, पुरणपोळी रेसेपी, puranpoli receipe in marathi, how to make puranpoli in marathi, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. 

पुरणपोळी | Puranpoli Receipe In Marathi


पुरणपोळी रेसेपी | Puranpoli Receipe in Marathi

महाराष्ट्र राज्याची शान असलेली पुरणपोळी ही आपल्याकडील रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, दसरा, दिवाळी यासारख्या सणांची आकर्षण. मऊसूत वाटलेल्या पुरणाने गच्च भरलेली, किंचित नाजूक परंतु जाडसर लाटलेली सोनेरी रंगाची पुरणपोळी साजूक तुपात खमंग भाजून जेव्हा तव्यावरून ताटात येते तेव्हा घरातील प्रत्येक कोपरा तिच्या सुगंधात न्हाऊन निघतो.

प्रत्येक आजीबाईच्या म्हणण्यानुसार, मुलीला पुरणपोळ्याचा स्वयंपाक सहज जमत असेल तर ती सुगरण. मुलीला बघायला गेल्यावरही स्वयंपाकात पुरणपोळी येते का हा प्रश्न हमखास विचारला जातो. फक्त महाराष्ट्रातच नाही तर गुजरात, केरळ आणि कर्नाटक मध्ये सुद्धा हा पदार्थ बनवला जातो. कर्नाटक मध्ये याला होळिगे म्हणतात तर खानदेशात यालाच मांडे असे म्हणून संबोधले जाते.

प्रांत बदलला की पदार्थ बनवण्याची रीत देखील बदलते. महाराष्ट्राचे चण्याच्या डाळीची पुरणपोळी केली जाते तशी गुजरात मध्ये तुरीच्या डाळीचे पुरण घातले जाते काही ठिकाणी मैद्याच्या पोळ्या बनवतात तर काही ठिकाणी कणीक वापरतात. कोकणासारख्या ठिकाणी मैदा एकत्र करून पोळी बनवतात.

पुरणपोळीचा संबंध थेट ज्ञानेश्वरांसोबत आहे, गावाने वाईट टाकलेल्या भावंडांना मांडे बसण्यासाठी खापर मिळाले नाही म्हणून हिरमुसलेल्या मुक्ताईंचा चेहरा ज्ञानोबारायांना देखील पावला नाही. तेव्हा मुक्ताईने ज्ञानरांच्या पाठीवर मांडे भाजून आपल्या भावनांना जेऊ घातले.

लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता जवळपास सगळ्यांच्याच घरात सणासुदीला बनवला जाणारा पुरणपोळी हा पदार्थ प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार दूध, आमरस, नारळाचे दूध, तूप, श्रीखंड किंवा कटाच्या आमटी सोबत खातात. अनेक जण तर उरलेल्या पोळ्या दुसऱ्या दिवशी शिळ्या झाल्या की चहा सोबत देखील खातात.

सविस्तर वर्णन वाचल्यानंतर आता पुरणपोळीचा घाट घालण्याचा विचार असेल तर खाली लिहिलेली कृती एकदा नजरे खालून घाला.

वेळ : जवळपास एक तास. 

माप: अंदाजे 8-10 पोळ्या 

घरच्या घरी श्रीखंड कसे बनवावे?

साहित्य:

  • एक कप चणाडाळ (कमीत कमी दोन तास पाण्यात भिजवून ठेवावी)
  • एक कप किसलेला गूळ
  • एक कप गव्हाचे पीठ किंवा मैदा
  • १/२ टी स्पून हळद
  • १/४  टीस्पून मीठ
  • ३-४ वेलची
  • एक छोटा जायफळाचा तुकडा
  • १/२ टीस्पून सुंठ पावडर
  • १/२ टीस्पून बडीशेप
  • तेल
  • तूप
  • तांदूळ किंवा गव्हाचे कोरडे पीठ

पुरणपोळी कशी बनवायची | Puranpoli Receipe in Marathi


कृती

  • सर्वप्रथम एका पातेल्यात पाच कप पाणी उकळत ठेवून त्यात भिजवलेली चण्याची डाळ घालून मध्यम मंद आचेवर झाकण घालून शिजू द्यावी.
  • डाळ शिजत असतानाच पोळ्यांसाठी पीठ भिजवावे. त्यासाठी गहू किंवा मैद्याच्या पिठात मीठ आणि हळद घालून छान मिसळून घ्यावे. या मिश्रणात एक टेबलस्पून तेल घालून पीठ चांगले रगडून घ्यावे. असे केल्याने पोळ्या अधिक खुसखुशीत होतात.
  • आता थोडे थोडे पाणी घालून पोळ्यांची कणिक चांगली तिंबून घ्यावी. ही कणी खूप जास्त घट्ट किंवा सैलसर मळू नये. चांगले रगडून मळून शेवटी त्याला तेलाचा हात लावून पुन्हा एकदा मुलायम करून घ्यावे आणि झाकण ठेवून हा पिठाचा गोळा कमीत कमी एक तासासाठी मुरू द्यावा.
  • साधारण अर्ध्या तासात मंद आचेवर चण्याची डाळ छान शिजते. डाळीचा दाणा हाताने दाबून जर पिठूळ झाला तर समजावे की आपली डाळ छान शिजली आहे. आता डाळ चाळणीत काढून तिचे उरलेले पाणी आमटीसाठी म्हणजेच गटासाठी बाजूला ठेवावे. आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे.
  • आता पुरणाला कट देण्यासाठी एका कढईत एक टेबलस्पून तूप घालून त्यात शिजलेली चण्याची डाळ गरम असतानाच घालावी आणि या मिश्रणात किसलेला गूळ घालावा. मिश्रणाचा अंदाज घेत मध्यम किंवा मंद आचेवर गूळ पूर्णपणे वितळू द्यावा. हे होत असतानाच वेलची बडीशेप आणि जायफळाची खलबत्त्यात छान बारीक पावडर करून घ्यावी. 
  • गुळ घातल्यामुळे पुरणाला पाणी सुटते परंतु पुढच्या दहा ते पंधरा मिनिटात पुरण शिजत आले की गुळाचा रस आटत येऊन डाळीत एकजीव होतो. कढईच्या मधोमध एक चमचा उभा करून ठेवला आणि जर तो चमचा न पकडता उभा राहिला तर समजावे की आपले पुरण तयार आहे.
  •  यावर पुरण जास्त शिजवू नये गॅसवर असताना त्यात आपण तयार केलेली सुंठ वेलची पावडर आणि केशर घालून छान एकजीव करून गॅसवरून उतरून थंड होऊ द्यावे. थंड झाल्यानंतर ते पुरण यंत्र किंवा मिक्सरमधून एक सारखे बारीक फिरवून घ्यावे.
  • आतापर्यंत एक तासात आपले पीठ चांगले मुरली असेल त्याला पुन्हा एकदा तेलाचा हात लावून छान मळून घ्यावे. लक्षात ठेवा जितके मुलायमपीठ असेल तितक्याच पोळ्या लाटायला सोप्या असतात. आपल्या अंदाजाने त्याचे गोळे करावेत आणि त्यात पुरणाचा गोळा घेऊन छान दाबून भरावा. तोंडापाशी पीठ चांगले बंद करून चपटा गोळा करून हलक्या हाताने पोळी लाटण्यास सुरुवात करावी
  • तांदूळ किंवा गव्हाच्या पिठीवर किंवा कोरड्या पिठावर पोळी लाटण्यास घ्यावी. आपल्या आवडीनुसार लहान मोठे आकाराच्या पोळ्या तुम्ही लाटू शकता.
  • मध्यम आचेवर तवा छान गरम करून दोन्ही बाजूने तूप घालून पोळी गुलाबी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यावी. छान भाजलेल्या खुसखुशीत पोळ्या पाच ते सहा दिवस बाहेर ठेवून देखील आरामात टिकतात खराब होत नाही.

आज आपण पुरणपोळी ची रेसेपी | puran poli receipe in marathi बद्दल सविस्तर माहिती पहिली. ती तुम्हाला आवडली असेल अशी मला आशा आहे. जर वरील माहीती मध्ये काही चूक असल्यास किंवा काही लिहायचे राहिले असल्यास comment मध्ये नक्की सांगा. तुमचे अभिप्राय वाचायला नक्की आवडतील.


धन्यवाद!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या