परंपरेनुसार आपल्याकडे सणा- सुदीच्या दिवशी काहीतरी गोडाच बनवणे हा एक अलिखित नियंमच आहे जणू.जर या सणवार स्पेशल जेवणात श्रीखंड असेल तर बातच न्यारी ! बहुतेकदा श्रीखंड पुरीच्या बेतासाठी आपल्याला सणाची गरज भासत नाही. अनेकांकडे अगदी रवीवारच्या जेवणात सुद्धा बर्‍याचदा श्रीखंड आवर्जून असते. अनेक घरात घरीच बनवल्या जाणार्‍या श्रीखंडाला पसंती दिली जाते. 

श्रीखंड घरच्या घरी बनवणे हे अगदी सोपे आणि कमी साहित्यात होणारे काम आहे .आज आपण श्रीखंड कसे बनवावे हे अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. चला तर मग पाहुयात  श्रीखंड कसे बनवावे तेही अगदी सोप्या पद्धतीने !

श्रीखंड रेसिपी मराठी | Shrikhand recipe in marathi 


Shrikhand Recipe Ingredients:

साहित्य:

• दही – १०० ग्रॅम
• साखर – १०० ग्रॅम
• वेलची पूड – अर्धा चमचा
• बदाम – पिस्ता – बारीक तुकडे
• पुरण यंत्र 
• दूध ( केशर मिसळण्यासाठी थोडेसे पाव वाटी )
• केशर

How to make shrikhand ? 

कृती:

  • ताजे दही घ्या. ते एका स्वच्छ कापडात काढून घ्या आणि थोडेसे पिळून पाणी काढून त्याला 2 तास लटकवून ठेवा म्हणजे त्यातील सर्व पाणी निघून जाईल आणि घट्ट गोला तयार होईल.
  • आता हा गोला एका भांड्यात काढून घेऊन त्यात  पिठी साखर आणि वेलची ची पूड घाला.
  • आता हे मिश्रण पुरण यंत्रातून फिरवून घ्या किंवा हाताने फेटा. मिश्रण एकदम मुलायम होईपर्यंत असे करा. 
  • आता त्यात आवडीनुसार बदाम आणि पिस्त्याचे काप टाका.
  •  आता एका दुसर्‍या भांड्यात थोड्या दुधात केशर मिसळा. एकसारखा रंग आला की हे केशरचे मिश्रण आधी तयार केलेल्या दहयाच्या मिश्रणात मिसळा
  • आता परत एकदा सर्व एकजीव करून फ्रिजमध्ये ठेवा, थंड झाल्यांनंतर खायला घ्या.


टिप – साखर प्रमाणात असू द्या. अति गोड श्रीखंडाची चव छान लागत नाही.

पुरणपोळी रेसेपी | पुरणपोळी कशी बनवायची?