Ram navami 2023:
श्री विष्णूचा सातवा अवतार म्हणजेच श्रीराम हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. जसे की आपल्याला माहीतच आहे रामायण हे प्रेम आपुलकी संस्कार त्याग इच्छाशक्ती पराक्रम यांचा उत्तम संगम आहे. प्रभू रामांचे महात्म्य इतके अथांग आहे की आपले संपूर्ण जीवन यासाठी दिले तरीही आपल्याला राम समजेलच यात शंकाच आहे. आपल्या संपूर्ण भारतात श्रीराम नवमी हा उत्सव अगदी थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. यंदा सन 2023 मध्ये 30 मार्च रोजी श्रीराम नवमी चा मुहूर्त येत आहे. या मुहूर्तावरच गुरुपुष्यामृत योगासह पाच अत्यंत शुभ योग सुद्धा घेऊन येत आहेत. चैत्र नवरात्राची सांगता होताच प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणून श्रीराम नवमी संपूर्ण देशाभरात अगदी उत्साहात साजरी होते. दरवर्षी साजरा होणाऱ्या श्रीराम नवमी पेक्षा यंदाच्या मुहूर्तावर पाच अत्यंत शुभ योग जुळून आलेले आहेत. श्रीराम नवमीच्या दिवशी चंद्र मिथुन राशीतून निघून कर्क राशीत प्रवेश करता होईल.प्रभू श्रीरामांच्या कुंडलीतही चंद्र कर्क राशीत विराजमान असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर श्रीराम नवमीच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग अमृतसिद्धी योग सर्वार्थसिद्धी योग आणि रवियोग असे पाच शुभ योग जुळून आलेले आहेत. या शुभयोगामध्ये श्रीरामांचे पूजन करणे अत्यंत फलदायी ठरू शकते असे सांगितले जात आहे.
असे करा श्रीरामांचे पूजन इच्छापूर्ती होईल !
यावर्षी सन 2023 मध्ये 29 मार्च बुधवार रोजी रात्री नऊ वाजून सहा मिनिटांनी चैत्र शुद्ध नवमीला सुरुवात होत आहे. तर 30 मार्च 2023, गुरुवार, रोजी रात्री अकरा वाजून 29 मिनिटांनी नवमी समाप्त होत आहे. भारतीय संस्कृती मध्ये सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा प्रचलित आहे. यामुळे तिथीनुसार श्रीरामांचे पूजन 30 मार्च रोजी करण्याचे आवाहन केले जात आहे.. 30 मार्च म्हणजेच गुरुवारी रात्री 10.58 वाजता पासून गुरुपुष्यामृत योग सुरू होत आहे. हा गुरुपुष्यामृत योग दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी 6.36 वाजेपर्यंत असणार आहे. प्रभू श्रीरामांचे पूजन करण्यासाठी गुरुवारी 30 मार्च रोजी सकाळी लवकर उठावे. स्नानादी कार्य उरकून एका चौरंगावर श्रीरामांची प्रतिमा किंवा मूर्ती जे उपलब्ध असेल ते ठेवून श्रीरामांची शोडशोपचारे पूजा करावी. यानंतर आरती म्हणून श्रीरामांना नैवेद्य दाखवावा. जर आपल्याला शक्य असेल तर तुपाचा दिवा लावून रामचरितमानस पठण करावे. असे केल्याने घरात सुख समृद्धी धन वैभव येथे आणि आपली इच्छापूर्ती होते. तसेच या दिवशी ॐ श्रीं ह्रीं क्लीं रामचन्द्राय श्री नम: मंत्राचा 108 वेळा जप करावा यानेही आपली मनातील सुप्त इच्छा पूर्ण होण्याचे योग जुळून येऊ शकतात. भगवान श्रीरामांच्या पूजेबरोबरच माता सीतेची पूजा करणे आवश्यक असल्याचे मानले जाते.पूजा झाली की, शेवटी माता सीता आणि प्रभू श्रीराम यांचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावेत. पूजेसाठी वापरलेले जल घेऊन घरात पडावे. असे केल्याने वास्तुदोष दूर होऊन घरात समृद्धी येते असे मानले जाते.
0 टिप्पण्या