Sant Tukaram Maharaj Information in Marathi – महाराष्ट्राला संतांची भूमी असे संबोधले जाते. या भूमीमध्ये अनेक संत होऊन गेले.त्यांनी अनेक प्रकारची महान कार्ये केलेली आहेत. योग्य वेळेत जनतेला योग्य प्रबोधन करणार्या संतांचा महिमा खरच महान आहे. आज इतिहासाचा विचार करता जर महाराष्ट्राच्या भूमीला संतांची परंपरा लाभली नसती तर अनेक कुप्रथा आजही महाराष्ट्रात असत्या. म्हणून त्यांचे कार्य आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे.
आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला अनेक संतांचे पाय लागले जसे की संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत रामदास, संत निवृत्तीनाथ ईत्यादि. सर्वांनी समाज प्रबोधनाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले. वेळोवेळी समाजाला दिशा देण्याचे काम केले. मला या सर्वांचा नेहमीच अभिमान वाटतो परंतु मला भावलेले संत म्हणजे संत तुकाराम.आज आपण संत तुकाराम यांच्या बद्दल अधिक माहिती बघणार आहोत.
संत तुकाराम माहिती | Sant Tukaram mahiti |
संत तुकाराम हे 17 व्या शतकातील एक प्रमुख वारकरी संत आणि अध्यात्मिक कवी होते. त्यांचा जन्म 16 व्या शतकात महाराष्ट्रातील पुण्याजवळील देहू या गावात झाला. संत तुकाराम यांचे पूर्ण नाव तुकाराम बोललो बोल्होबा अंबिले (मोरे) असे होते. तुकारामांचे लहानपण आई कनकाई आणि वडील बोल्होबा यांच्या देखरेखी खाली गेले. तुकारामांचे कुटुंब जातीने मराठा कुणबी असून त्यांचा वाण्याचा व्यवसाय होता. पंढरीच्या पांडुरंगावर तुकारामांच्या वडिलांची परम निष्ठा होती.आई वडील दोघेही विठोबाचे भक्त असल्यामुळे तुकारामांना घरातच विठ्ठल भक्तीचा वसा मिळाला.
संत तुकारामांचे बालपण अगदी सुखात गेले. घरात नेहमी भजन,कीर्तन, हरी कथा चालू असायचे आणि त्याचे संस्कार तुकोबांवर होत होते. लहानपणापासूनच त्यांच्या मनावर गीता आणि भागवताचा प्रभाव होता. ते सुद्धा घरात सर्वांचे बघून विठ्ठल भक्ती, गीते, भजन, कीर्तन, पूजा करू लागले.
किशोर वयात असताना तुकोबांच्या आई-वडिलांचे निधन झाले आणि त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तुकारामांचे लग्न त्यांच्या वडिलांनी लोहगाव येथील रुक्मिणी यांच्याशी लावून दिले होते परंतु त्यांची पहिली पत्नी म्हणजेच रुक्मिणी दम्यामुळे अकाली मृत्यू पावली. त्यानंतर काही काळात तिचा पहिला मुलगा सुद्धा अकाली मृत्यू पावला. तुकाराम महाराज दुःखाने व्याकुळ झाले.
तुकारामांचे दुसरे लग्न पुणे येथील आप्पाजी गुळवे यांची मुलगी जिजाई तिच्याशी झाले. जिजाई हिचे नाव अवलाई असेही होते. परंपरागत व्यवसायाची जबाबदारी पार पाडत असताना 1629 दुष्काळ पडला. सर्व लोक देशोधडीला लागले. अन्नासाठी दशा करीत दाही दिशा फिरू लागले. या दुष्काळात संत तुकारामांनी आपल्या वाट्याला आलेली कर्जखते नदीमध्ये सोडून दिली आणि लोकांना कर्जमुक्त केले आणि ते परमेश्वराचा धावा करत ईश्वर भक्तीचा मार्ग स्वीकारू लागले.
घरा दारावर आलेल्या संकटामुळे तुकाराम पूर्णपणे होरपळून निघाले होते. आता पांडुरंगा शिवाय आपले दुसरे कोणीही नाही असा ठाम विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला होता. अशा बिकट परिस्थितीत ते अलिप्त राहू लागले. आपल्या जीवनातील उर्वरित आयुष्य त्यांनी भक्ती, उपासना, सामुदायिक कीर्तन, सामुदायिक प्रार्थना, अभंग, कविता रचण्यात घालवले.
ज्ञानभक्ती आणि वैराग्याने परिपूर्ण असलेल्या तुकारामांना अहंकाराचा लवलेशही दिसत नव्हता.आंतरिक दुःखापासून मुक्ती मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे अध्यात्म हे त्यांना माहीत होते. घरापासून दूर देहूच्या परिसरात असलेल्या भंडारा डोंगरावर जाऊन ते चिंतनात रमू लागले. गीता भागवत ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत व इतर ग्रंथांचे वाचन केले. विठ्ठलाचे अखंड नामस्मरण करू लागले.
नम्रतेने आणि शांतपणाने त्यांनी जनसेवा सुरू केली. शांततेचा उपदेश ते लोकांना देऊ लागले. समाजकंटकांनी त्यांना अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याबद्दल मनात कटुता न ठेवता उलट त्यांनाच प्रेम,अहिंसा याची शिकवण दिली. तुकोबांची वाणी कधी मधाळ तर कधी कठोर झालेली आपल्याला दिसते. त्यांना चमत्कार.अंधश्रद्धा याबाबत प्रचंड चीड होती. कर्मठपणा त्यांना कधीही मान्य नव्हता. तुकारामांचे तत्त्वज्ञान हे सर्व सामान्यांच्या कल्याणासाठी होते. मनाचे दरवाजे उघडे ठेवून समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांनी लोकांना दिला.
संत तुकाराम आणि शिवाजी महाराजांची भेट
संत तुकाराम महती आता सर्व दूर पसरू लागली होती. अशीच ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानी ही पडली. संत तुकाराम महाराष्ट्रात राहत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांना मौल्यवान वस्तू भेट म्हणुन पाठवली ज्यात हिरे, मोती,सोने आणि बरेच कपडे यांचा समावेश होता. परंतु संत तुकारामांनी हे सर्व परत पाठवले आणि अगदी विनम्रतेने सांगितले की - " महाराज ही माझ्यासाठी निरर्थक आहे. माझ्यासाठी सोने, चांदी आणि पृथ्वी यांच्यात काहीही फरक नाही. कारण या देवाने मला त्याचे दर्शन दिले असल्याने मी आपोआपच तिन्ही जगाचा स्वामी झालो आहे. या सर्व वस्तू माझ्यासाठी निरोपयोगी असल्याने मी त्या परत पाठवत आहे."
हा संदेश महाराजांना मिळाल्यावर ते तुकारामांना भेटण्यासाठी व्याकुळ झाले. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकारामांची भेट घडून आली.
तुकाराम महाराज वैकुंठ गमन – संत तुकाराम महाराज (sant tukaram maharaj)
ऐतिहासिक पुराव्यानुसार, तुकोबा, फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजेच तुकाराम बीज या दिवशी देहू येथे गोपाळपुर्यातील नांदुरकीच्या झाडाखाली कीर्तन करताना अचानक अदृश्य झाले. स्वतः भगवंत त्यांना नेण्याकरिता वैकुंठाहून आले आणि त्यांना सदेह वैकुंठात घेऊन गेले. हे त्रिवार सत्य आहे; विमानाद्वारे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाचे अनेक पौराणिक संदर्भ आहेत. यामध्ये संत कान्होबा, रामेश्वर भट्ट, संत निळोबाराय या तत्कालीन संतांनी वैकुंठगमनाचे अनेक अभंग लिहून ठेवले आहेत.
0 टिप्पण्या